Friday, 27 May 2016

*पाप..,*

*पाप..,*

पाप धुण्यासाठी
यांनी
साऱ्या नद्या
घाण केल्या
त्याच नद्या
पुढं वाहत
आमच्या
गावात आल्या

चांगलं पाणी
गढूळ केलं
तेच पाणी
आम्ही पिलं
कित्येक वर्ष
या भामटयांचे
हे  पाप
आम्ही गिळलं

साधू ,संत,
म्हणवणारे हे
यांच्याकडून
पाप कसे होते
अन्
एका डुबकीने
साऱ्या आयुष्याचे
पाप
साफ कसे होते..?

रवींद्र कांबळे 9112143360
व्हाट्सप क्र.  9970291212

No comments:

Post a Comment