Monday, 19 September 2016

पोस्ट नः 161 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा ------------------ 6) कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म

पोस्ट नः 161

बुध्द आणि त्यांचा धम्म
तिसरा खंडः भाग दुसरा
------------------
6) कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म
----------------------
1) ह्या पार्थिव जगात एक सुव्यवस्था आहे. खालील घटनांनी ती सिध्द होते

2) आकाशातील ग्रहगोलांच्या चलनवलनात गतीत एक प्रकारची सुव्यवस्था आहे.

3) ऋतुचक्रामध्येही सुव्यवस्था आहे.

4) काही विशिष्ट व्यवस्थेनुसार बींजाचे वृक्ष होतात. वृक्षापासुन फळ उत्पन्न होते आणा फळापासुन परत बीज निर्माण होते.

5) बौध्द परिभाषेत या व्यवस्थेला नियम म्हणतात एकामागुन एक सुव्यवस्थित निर्मिती दर्शविणारया नियमांना ऋतुनियम बीजनियम असे संबोधितात.

6) समाजामध्येही याच प्रकारचा नैतिक क्रम आहे.तो कसा उत्पन् होतो? कसा राखला जातो?

7) जे ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात त्यांना या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. त्याचे उत्तर सरळ आहे.

8) ते म्हणतात, संसाराचा नैतिक क्रम हा ईश्वराच्या इच्छेचा परिणाम आहे. ईश्वराने संसार निर्माण केला आहे. आणि ईश्वर हाच या संसाराचा कर्ता धर्ता आहे तोच भौतिक आणि नैतिक नियमांचा कर्ता आहे

9) त्यांच्या मते नैतिक नियम  माणसांच्या भल्यासाठी असतात. कारण ते ईश्वरी आज्ञास्वरुप आहेत आपल्या निर्मात्या ईश्वराची आज्ञा पाळणे त्यांना क्रमप्राप्त आहे आणि ईश्वराच्या आज्ञेच्या परिपालनाने हा नैतिक क्रम चालु राहतो.

10) जे नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे मानतात त्यांचे विचार वरील प्रमाणे असतात.

11) ही व्याख्या मुळीच समाधानकारक नाही. कारण ईश्वर हा नैतिक नियमांचा जनक असेल ह्या नैतिक नियमांचा आरंभ आणि अंत तोच असेल आणि माणसाला ईश्वराची आज्ञा पाळण्यापासुन सुटका नसेल तर ह्या संसारात इतकी नैतिक अव्यवस्था का आढळते?

12) ह्या ईश्वरी नियमाच्या मागे असा कोणता अधिकार आहे *ईश्वरी नियमांचा व्यक्तीवर काय आधिकार आहे?
हे संयुक्तिक प्रश्न आहेत परंतु जे लोक नैतिक व्यवस्था ही ईश्वरी इच्छेचा परिणाम आहे असे म्हतातात त्यांच्या जवळ या प्रश्नांना उत्तर नाही

13) ही अडचण दुर करण्यासाठी हा सिध्दांत थोडा बदलला गेला आहे

14) असे म्हटले जाते कि परमेश्वराच्या आज्ञेनेच सृष्टी निर्माण झाली हे ही सत्य आहे की ह्या सर्व विश्वाने परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे व मार्गदर्शनाप्रमाणेच आपल्या कार्यास आरंभ केला. हे ही खरे आहे कि त्याने त्या सर्व विश्वाला एकदाच कायमची गती शक्ती दिली आणि तीच त्या विश्वाच्या सर्व क्रियाशीलतेचे मूळ आहे

15) परंतु या उपरांत ईश्वराने सुष्टीला प्रारंभी जे नियम घालुन दिले आहेत. त्या नियमानुसार कार्य करण्याचे स्वातंत्र्य बहाल केले आहे

16) म्हणुनच नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेनुसार घडत नसेल तर तो दोष सुष्टीचा ( प्रकृतीचा ) आहे ईश्वराचा नाही

17) सिध्दांतात असा बदल करुनही वरील अडचण सोडविली जात नाही. या सिध्दांतातील बदलामुळे ईश्वरावर आपल्या नियमाचे परिपालन करण्याचे सृष्टीवर ( प्रकृतीवर ) का सोपवावे?

18) सृष्टीत नैतिक क्रम कसा राखला जातो या प्रश्नाला तथागतांनी दिलेले उत्तर अगदी भिन्न आहे

19) तथागतांचे उत्तर सोपे आहे ते असे नैतिक व्यवस्था ही ईश्वर सांभाळीत नसुन ती कम्म ( कर्म) नियमाप्रमाणे सांभाळली जाते

20) सुष्टीची नैतिक व्यवस्था चांगली असेल अथवा वाईट असेल परंतु तथागतांच्या मते ती माणसावर सोपविलेली आहे इतर कोणावर नाही.

" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न  
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

Sunday, 18 September 2016

पोस्ट नः 160 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 5) सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म

पोस्ट नः 160

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा
 
5) सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म
------------------

1) अनित्यतेच्या सिंध्दांताला तीन पैलु असतात.

2) अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तु अनित्य आहे

3) व्यक्तीगत रुपाने प्राणी अनित्य आहे

4) प्रतीत्य समुत्पन्न वस्तुंचे आत्मतत्व अनित्य आहे

5) अनेक तत्व मिळुन बनलेल्या वस्तुंची अनित्यता बौध्दत्वताचा असंग याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे

6) असंग म्हणतो सर्व वस्तु ह्या हेतु आणि प्रत्यय ह्यामुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतु प्रत्ययांचा उच्छेद झाला की वस्तुंचे अस्तित्व ठरत नाही

7) सजीव प्राण्यांचे शरीर म्हणजे पृथ्वी,आप ,तेज, आणि वायु या चार महाभुतांचा परिणाम होय, आणि ह्या चार भूतांचे पृथ्वकरण झाले कि हा प्राणी प्राणी म्हणुन उरत नाही

8) अनेक तत्वे मिळुन झालेली वस्तु अनित्य आहे ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे

9) सजीव प्राण्यांच्या आनित्यतेचे वर्णन तो नाही ,तो होत नाही ह्या शब्दात करता येईल या शब्दात करता येईल

10) ह्या अर्थाने पाहिले असता जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमानकाळात असु शकत नाही. आणि तोच प्राणी भविष्यकाळात असु शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पुर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पुर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही

11) म्हणजेच मनुष्यप्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तो असु शकत नाही

12) अनित्यतेच्या सिध्दांताचा तिसरा पैलु सामान्य माणसाला समजायला कठीण आहे

13) प्रत्येक सजीव प्राणी केव्हि ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे

14) परंतु ती जिंवत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे

15) हे परिवर्तन कसे शक्य आहे? याला तथागतांचे उत्तर असे " सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे "

16) ह्याच विचारसारणीतुन पुढे शुन्यवादाचा उदय झाला

17) बौध्द शुन्यवाद म्हणजे पुर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे . त्याचा अर्थ ऐवढाच की, ह्या ऐहिक जगात प्रतिक्षणी चालु आहे.

18) शुन्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते शुन्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते . सर्व वस्तुंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसरया वस्तुंचे अस्तित्व अवलंबुन आहे.

19) जर वस्तु सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या तर एका प्रकारापासुन  दुसरया प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण आणि सजीव वस्तुंचा जो विकास चालला आहे त्याला मिळाला असता.

20) जर मनुष्यप्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता तर काय परिणाम झाला असता ? असे झाले असते तर मानवजातीची प्रगती खुंटली असती

21) शुन्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनवस्था उदभवली असती

22) परंतु तसे मानलेले नाही. शुन्य हा एक बिंदुसमान पदार्थ असुन त्याला आशय आहे परंतु त्याला लांबी रुंदी नाही

23) तथागत बुध्दांचा उपदेश असा कि सर्व वस्तु अनित्य आहेत

24) तथागत बुध्दांच्या ह्या सिंध्दातापासुन बोध काय घ्यावयाचा हा अति महत्वाचा प्रश्न आहे.

25) या अनित्यतेच्या सिध्दांतापासुन असा बोध घ्यावयाचा की, कोणत्याही वस्तुसंबधी आसक्ती राखु नका

26) लोकांनी मालमत्ता , मित्र इत्यादीसंबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच तथागत बुध्दांनी म्हटले की, सर्व वस्तु अनित्य आहेत

" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न  
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट नः 159 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 4) तृष्णा - त्याग म्हणजे धम्म

पोस्ट नः 159

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा
 
4) तृष्णा - त्याग म्हणजे धम्म
-----------------

1) धम्मपदामध्ये तथागत बुध्द म्हणतात. सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे संतोष.

2) या संतोषवृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे.

3) कारण तसा अर्थ करणे बुध्दांच्या शिकवणुकीविरूध्द आहे.

4) निर्धन लोक धन्य होत असे बुध्दांनी कधीही  म्हटलेले नाही.

5) पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करु नये . असे बुध्दांनी कधीही सांगितलेले नाही.

6) उलट तो ऐश्वर्याचे स्वागतच करतो, दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने उत्साहपूर्वक प्रयासाने तो परिस्थिती बदलण्याचा तो उपदेश करतो.

7) जेव्हा तथागत बुध्द म्हणतो की, संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय . तेव्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की, माणसाने अमर्याद अशा लोभाच्या आधीन होऊ नये

8) भिक्खू रथपाल म्हणतो, माझ्यासमोर कित्येक श्रींमत मनुष्य आहेत की ते मुर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलावण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलावरुन नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपुर माप कोणाच्याच पदरात पडत नाही

9) महानिदान सुक्तात तथागत बुध्दांने आंनदाला लोभ संयमनाची महती सांगितली आहे

10) आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते. आणि जेव्हा त्या इच्छेने मालमत्ता मिळविण्याच्या इच्छेने पर्यवसान होते. आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळविलेले हातातून निसटू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते तेव्हा त्या इच्छेचे लोभात रुपांतर होते.

11)  लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबधी सतत सावध राहिले पाहिजे

12) ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा? याचे कारण बुध्द आंनदाला सांगतो ते असे कि पुष्कळच वाईट आणि दृष्ट गोष्टींचा त्याच्यांपासुन उदभव होतो. मारामारी आघात झगडे वादप्रतिवाद भांडण ,निंदा असत्य ह्या सर्वाचे मूळ तृष्णा अथवा लोभ यात आहे,

13) वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे यात शंका नाही

14) म्हणुनच तथागत बुध्दांनी लोभ आणि तृष्णा आपल्या काबुत ठेवली पाहिजे या शिकवणुकीवर भर दिला

" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न  
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

पोस्ट नः 158 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे ( iv )

पोस्ट नः 158

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा

 3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे ( iv )
------------------
49) निब्बाण या शब्दाच्या ठिकाणी वरील अर्थ नाही . निब्बाण म्हणजे धम्ममार्गावर वाटचाल करता येईल इतका पुरेसा आपल्या प्रवृत्तीवर ताबा असणे, यापेक्षा निब्बाण शब्दात अधिक अर्थ अभिप्रेत नव्हता.

50) निब्बाण हा निर्दोष जीवणाला प्रतिशब्द आहे हे बुध्दांनी राधला एके ठिकाणी स्पष्ट करुन सांगितले आहे

51) एकदा स्थविर राध तथागतांकडे गेला. तथागतांना आभिवादन करुन त्यांच्या समीप बसुन त्यांनी विचारले. तथागत निब्बाण म्हणजे काय ?

52) तथागतांनी उत्तर दिले " निब्बाण म्हणजे निर्दोष जीवन,

53) तथागत, परंतु निब्बाणाचा उद्देश काय ?

54) राध, निर्दोष जीवन हा निब्बाणाचा उद्देश आहे. निब्बाण हे जीवनाचे ध्येय आणि साध्य आहे

55) निब्बाण म्हणजे मालविणे किंवा नाश नव्हे हे बुध्दांनी सारिपुत्ताला पुढील प्रवचनात स्पष्ट केले आहे.

56) एकदा तथागत श्रावस्तीतील अनाथ पिंडिकाच्या आश्रमात आले होते . सारीपुत्त त्या ठिकाणी राहत होता.

57) भिक्खुना उद्देशुन तथागत म्हणाले , भिक्खुनो ऐहिक संपदेऐवजी धम्माचे तुम्ही दायाद व्हा . तुमच्याविषयी वाटणारया करुणेने तुम्हाला धम्मातील वाटा मिळावा म्हणुन मी तुम्हाला धम्माचे दायाद बनवित आहे.

58) असे बोलुन तथागत आपल्या गंधकुटीत निघुन गेले

59) सारीपुत्त मागे राहिला आणि भिक्षुंनी त्यांला निब्बाणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले.

60) तेव्हा सारीपुत्त म्हणाला, लोभ हा द्वेष आहे , व्देष हा दोष आहे.

61) हा लोभ आणि हा द्वेष घालविण्याचा मार्ग मध्यममार्ग आहे , हा मार्ग आपल्याला पाहायला शिकवतो जाणायला शिकवतो आणि ज्ञान देतो , तो आपणाला शांती , अभिज्ञा बोधी आणि निब्बाण याकडे नेतो

62) हा मध्यममार्ग कोणता? हा मध्यममार्ग म्हणजे अष्टांगमार्ग होय त्याशिवाय दुसरा मार्ग नाही , सम्यक दृष्टी , सम्यक संकल्प, सम्यक वाणी , सम्यक कर्मान्त , सम्यक आजीविका , सम्यक प्रयत्न ( व्यायाम ) , सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी . भिक्षूंनो हा मध्यममार्ग आहे.

63) होय क्रोध, द्वेष, ईर्षा, मत्सर ,कृपणता, लालचीपणा, ढोंग, लबाडी, उध्दटपणा, मोह, प्रमाद हे सर्व दृष्ट विकार आहेत.

64) मोह आणि प्रमाद यांचा परिहार मध्यममार्गाने होतो. त्यांच्या योगाने पहायला दृष्टी मिळते हा मार्ग आपणाला पाहयला शिकवतो आणि ज्ञान देतो आणि आपणाला शांती देतो अभिज्ञा बोधि आणि निब्बाण याकडे नेतो
65) निब्बाण हे दुसरे तिसरे काही नसुन आंष्टागमार्ग आहे

66) अशा रितीने सारीपुत्ताने निब्बाणाचे प्रवचन केले आणि भिक्षूंना हे ऐकुन आंनद वाटला.

67) निब्बाणात जो मुलभुत विचार आहे तो आष्टांगर्माग . अष्टांगमार्गाशिवाय निब्बाणाला दुसरा अर्थ नाही

68) प्रवृतींचा संपुर्ण अच्छेद आणि परिनिब्बाण ही दोन टोके आहेत आणि निब्बाण हा त्यातील मध्यममार्ग आहे.

69) हे लक्षात घेतले असता निब्बाणाच्या कल्पनेसंबधीच्या गोंधळाचा निरास होईल.

" समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न  
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर                         

आरक्षणावर आता चर्चा नको, कृती हवी - शरद पवार


भाजप व संघ आहेत धर्माचे व्यापारी


"त्यांना" लग्नावेळी आरक्षण लपवायचे असते - अजित पवार



नांदेडमध्ये मातंग बांधवाची हत्या करून जाळला मृतदेह, स्मशानभूमी अभावी बौध्द महिलेचे पार्थिव १३ तास पडून


Saturday, 17 September 2016

🌎मराठवाडा मुक्ती संग्राम🌎

🌎मराठवाडा मुक्ती संग्राम🌎
मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे.
मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये
1)औरंगाबाद
2)नांदेड
3)परभणी
4)बीड
5)जालना
6)लातूर
7)उस्मानाबाद व
8) हींगोली
हे 8 जिल्हे, 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत
लोकसंख्या ही जवळपास 2 कोटी आहे. साक्षरता 76% तर लोकसंख्या घनता ही 352 एवढी आहे. लिंग गूणोत्तर 932 एवढे आहे.
दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.
यामध्ये वेरूळ,अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण,तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.

पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात विलीन होता.
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील  जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.

या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.

निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यमूळे ते भारताचे तत्कालीन ग्रहमंत्री होते खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला.
मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद  काबिज केले.
15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या 17 सप्टेंबर रोजी तब्बल 68वर्षे पूर्ण होत आहेत. 68 वर्षांपूर्वी 17सप्टेंबर 1948 रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता.
 या संग्रामाच्या उज्ज्वल  पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्तीनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.
    आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्‍चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ? हा माञ एक पडलेला प्रश्न आहे.

१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाउ लागला.
    💐मराठवाडा मूक्तीसंग्राम दिनाच्या हार्दीक शूभेच्छा💐

काल रात्री उशिरा, उणा आंदोलनाचा हिरो "जिग्नेश मेवाणी" याला गुजरात पोलिसांनी अटक करून गायब केलं आहे.

काल रात्री उशिरा, उणा आंदोलनाचा हिरो "जिग्नेश मेवाणी" याला गुजरात पोलिसांनी अटक करून गायब केलं आहे. मोदिशेठ यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना कोठेही गालबोट लागू नये म्हणून गुजरात पोलिसांनी विशेष सावधानता बाळगत हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

गंमत अशी आहे की, ज्या "जिग्नेश" ला अटक करण्यात आलीय,तो मुलगा  एक दलित ऍक्टिव्हिस्ट असून उणा आंदोलनानंतर गुजरातमध्ये तो जबरदस्त लोकप्रिय बनला आहे. दलित समाजाचा सर्वात मोठा आणि सेन्सिबल लीडर म्हणून त्याच्याकडं पाहिलं जात आहे. कोणतेही भडकाऊ स्टेटमेंट देण्यापेक्षा तो संविधानिक मार्गानं आणि सोबतच पूर्ण अभ्यासानिशि दलित समाजाच्या मागण्या गुजरात सरकारपुढं मांडत आहे.आणि म्हणून दिवसेंदिवस त्याला मिळणारा पाठिंबा वाढतच चालला आहे.

त्यात गायीच्या मुद्द्यावरून भावनिक राजकारण करत "गो-आतंकवाद" ही संकल्पक रुजवू पाहणाऱ्या गो-रक्षकांची तर हवाच जिग्नेशने काढून टाकली आहे. "गाई तुमची माता आहे तर, तिच्या मृत्यूनंतर तिच्या शरीराची विल्हेवाट ही तुम्हीच लावा,यापुढं कोणताही दलित बांधव गायीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावनार नाही" असा आक्रमक पवित्रा जिग्नेशने घेतला.आणि तशी संवैधानिक शपथही त्याने लाखो दलित बांधवांना 15 ऑगस्टला दिली. परिणामी गुजरातमध्ये हजारो मृत गायींचा खच पडला असून, त्यांची विल्हेवाट लावायला कोणतीही गो-रक्षक संघटना पुढे येत नाहीये. जिग्नेशच्या आंदोलनाच हे सर्वात मोठं यश असून, याचा सगळ्यात मोठा धसका मोदिशेठ अन अमित श्या या जोडगोळीने घेतला आहे.
कारण...या आंदोलनांनंतर 2017 मध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुद्द RSS ने केलेल्या सर्वेत, गुजरात बीजेपीच्या हातून जात आहे, असा धक्कादायक तर्क नोंदवला आहे. लगेच जर निवडणुका झाल्या तर बीजेपीला फक्त 60-63 जागा मिळतील अस,संघाचं म्हणणं आहे. सध्या आनंदीबेन पटेल यांनी वयाचं कारण देत  मुख्यमंत्रीपदाचा जो राजीनामा दिला त्याला ही जिग्नेशच आंदोलन हेच खरं कारण असल्याचं बोललं जातय.

आधी हार्दिक पटेलन उभं केलेलं पाटीदार लोकांच आंदोलन आणि आता जिग्नेश मेवाणी ने उभा केलेलं दलित आंदोलन, यान गुजरात मध्ये बीजेपी विरोधात मोठं वादळ निर्माण केलं आहे. लोकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्याचीच परिणीती म्हणजे, अमित श्या ला गुजरातमध्ये स्टेजला जाळ्या लावून सभा घ्यावी लागते आहे,पण तेथून ही भर सभेत त्यांना पळ काढावा लागला. म्हणूनच जे अमित श्या सोबत झालं, तेच मोदीशेठ यांच्या सोबतही व्हायची शक्यता मोठ्या प्रमाणात असल्याने, विशेष खबरदारीचा उपाय म्हणून जिग्नेशला अटक करण्यात आली आहे.

मीडिया किती जरी गुजरातचे गोडवे गात असला तरी, ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. एक जबरदस्त असंतोष सध्या तेथील बहुतांशी लोकांत आहे.
त्यात इथल्या मीडियाला वाढदिवसादिवशी मोदीशेठ आईला भेटायला गेल्याच कौतुक अन इंटरेस्ट जास्त आहे. ग्राउंड रियालिटी दाखवण्यात त्यांना काहीही इंटरेस्ट नाहीये. यामुळ ही लोकांमधील राग वाढतच चालला आहे.

56 इंची छाती आज कितीतरी वजनाचा रेकॉर्डब्रेक केक कापून आपलं वाढदिवस साजरा करणार आहे म्हणे...पण त्याला जिग्नेशच्या अटकेची काळी बाजू हि आहे....!!

भागवत आधुनिक हिटलर : प्रकाश आंबेडकर

भागवत आधुनिक हिटलर : प्रकाश आंबेडकर
नवी दिल्ली- "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आधुनिक काळातील हिटलर आहेत," अशा शब्दांत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भागवत यांच्यावर घणाघाती टीकास्त्र सोडले.

देशभरातील दलित अत्याचारांच्या विरोधात आज (शुक्रवार) दिल्लीत भारिप बहुजन पक्षाच्या वतीने प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित स्वाभिमान संघर्ष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्यासह सीताराम येचुरी, माजी खासदार वृंदा करात, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार डी. राजा, सरचिटणीस सुधाकर रेड्डी यांची भाषणे झाली.
अनुसूचित जाती-जमातींच्या रक्षणार्थ अॅट्रॉसिटीचा कायदा आणखी कडक करण्यात यावा. दलितांवर हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हे दाखल करावेत. गोरक्षकांवर बंदी घालावी. तसेच, खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करावे, आणि संघाच्या विभाजनवादी अजेंड्याला व सांस्कृतिक राष्ट्रवादाला सरकारी पातळीवरून खतपाणी घालू नये, या मागण्या यावेळी करण्यात आल्या.

आंबडेकर म्हणाले, "आता देशातील दलितांनी याचा निर्णय करावा की, त्यांना राज्यघटना हवी की वामनाची पूजा करणारा मनुवाद याची निवड त्यांनी करावी."
आंबेडकर यांनी भागवत यांच्यासह पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. रामदास आठवले यांच्यावरही आंबेडकर यांनी यावेळी निशाणा साधला.


‘मोदी काळातले मनुवादी हे प्राचीन मनुवाद्यांपेक्षा भयंकर आहेत‘ असा सूर सभेतील इतर वक्त्यांनी आळवला.                         

आज सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर आणि पेरियार इ.व्ही. रामस्वामी यांच्या जयंती दिनी त्रिवार अभिवादन.

सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर 17 सप्टेंबर,चैत्यभुमी चे निर्माते, बौद्धाचार्यांचे जनक, भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष. सुर्यपुत्र ,भैयासाहेब ऊर्फ यंशवतराव भिमराव आंबेडकर यांच्या 39 व्या स्मुर्तीदीनानिम्मीत विनम्र अभिवादन

" सूर्यपुत्र यशवंत ( भय्यासाहेब )आंबेडकर "
भय्यासाहेब यांचे खरे नाव यशवंत यांचा जन्म १२| १२| १९१२ रोजी मुंबई येथे झाला त्यांचे लग्न १९ एप्रिल रोजी मीराताईंशी झाले .
भय्यासाहेबांनी कधीही बाबासाहेबांच्या नावाचा फायदा घेतला नाही. त्यांनी स्वतःचे आयुष्य स्वतःच घडविले .त्यांनी सिमेंटचा कारखाना काढला. त्यानंतर मुंबई विमानतळाच्या परिसरात बांधकाम करणे हा नवीन उद्योग सुरु केला . त्यात त्यांनी कोणालाच वाटेकरी घेतले नाही .हा व्यवसाय सुरळीतपणे चालला होता.
नंतर त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत भाग घेण्यास सुरुवात केली . त्यांनी भारतभूषण प्रिंटींग प्रेस हा छापखाना सुरु केला नंतर ह्या प्रेसचे बुद्धभूषण प्रिटींग प्रेस असे नाव झाले. १९४४ पासून बाबासाहेबांच्या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते. जनता प्रबुद्ध भारत यांचे ते सर्वे सर्वा होते.
बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस मध्ये बाबासाहेबांचा " Thoughts on pakistan" हा इंग्रजी ग्रंथ भय्यासाहेबांनीच छापला बाबासाहेबांनी हा ग्रंथ भय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचा दुसरा एक ग्रंथ " federation versus freedom " हाही ग्रंथ भय्यासाहेबांनी आपल्या छापखान्यात छापला " Thoughts on linguistic states " हा ग्रंथ सुद्धा भाय्यासाहेबांनी छापला .
त्यानंतर बाबासाहेबांच्या आदेशानुसार वा. गो. आपटे लिखित " बौद्धपर्व " हा ग्रंथही भय्यासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला. भय्यासाहेबांचे लिखाण अत्यंत तर्कशुद्ध आणि विचारगर्भ असे. त्यांच्या लिखाणातील व भाषणातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे म्हणी आणि वाकप्रचार यांचा मोठया प्रमाणावर वापर.
भय्यासाहेबांनी बाबासाहेबांची अनेक स्मारके उभारली . १ ले स्मारक त्यांनी मुंबई येथे बांधले डॉ.आंबेडकर या सभागृहाचे भूमिपूजन दि.२-४-१९५८ ला व उद्घाटन २२-६-१९५८ ला झाले. मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले .भय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम मह्पौरांना दिली. व ठरल्याप्रमाणे २६- जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले. चवदार तळे क्रांतीचे स्मारक म्हणून जेथे मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. त्या जागेवर अशोक स्तंभाच्या धर्तीवर क्रांतीस्तंभ उभारण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला . चैत्यभूमीच्या रूपाने बाबासाहेबांचे स्मारक व्हावे म्हणून भारतीय बौद्ध महासभेने दि.२०-३- १९५७ रोजी BMS कडे ४० बाय ४० ची जागा मागितली BMS ने ८ बाय ८ ची जागा मंजूर केली. परंतु मागणीपेक्षा एक इंचही कमी जागा घेणार नाही असा पवित्रा भय्यासाहेबांनी घेतला . अखेर BMS improvement committee ने ४० बाय ४० ची जागा मान्य केली . s/c federation आणि R.P.I पक्ष एकसंघ होता तो पर्यंत या स्मारकांना गती येत होती. जनताही आपला पै पैसा देत होती. जनता स्टेट बँकेसमोर रांगा लावून पैसे भरत होती. स्टेट बँकेत भरणा करावा म्हणून भय्यासाहेब कुलाबा ते दहिसर व कल्याण पर्यंत फिरफिर फिरले १९६६ साली डॉ. बाबासाहेबांचा ७५ व वाढदिवस येत असल्यामुळे हा जन्मदिवस " अमृत महोत्सव " म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचे भय्यासाहेबांनी ठरविले . या अमृत महोत्सव प्रसंगी डॉ. बाबासाहेबांचे जीवन कार्याचे प्रतिक म्हणून " भीम -ज्योत " "महु ते मुंबई " काढण्याचे ठरविले व २७-३-१९६६ रोजी "भीम -ज्योत " भारताचे मजूर मंत्री ना. जगजीवनराम यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली व ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार दादासाहेब गायकवाड होते.
भीम-ज्योत महू हून इंदौर ,भोपाळ ,होसिंगाबाद ,बैतुल,नागपूर ,पुलगाव ,औरंगाबाद ,येवला,नाशिक ,हरेगाव नगर ,संगमनेर ,देहू रोड, पुणे, सातारा वणी, पंचगणी ,महाबळेश्वर ,खेड ,मंडणगड ,दापोली, महाड ,पेण, पनवेल, कल्याण ,ठाणे मुलुंड ,राजगृह व चैत्याभूमिला आली. व ह्या भीमज्योत मध्ये मिळालेल्या धम्मदानातून चैत्यभूमी स्मारक उभारण्यात आले.
बाबासाहेबांच्या महापारीनिर्वाणानंतर भय्यासाहेब भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. "भारत बौद्धमय करीन " हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भय्यासाहेबांनी काम सुरु केले. त्यांनी धम्मदीक्षेचे अनेक कार्यक्रम घेतले. धम्मपरिषदा भरविल्या धम्ममेळावे सर्वत्र होत होते. प्रचार सर्वत्र जोरात सुरु केला भय्यासाहेब आमदार असतांना त्यांनी विधानपरिषदेत बुद्धांच्या दलित समाजाच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली बुद्धांच्या सवलती विषयी ते पंतप्रधान मोरारजी देसाईंना भेटले होते. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी सिलोन, थायलंड ब्रम्हदेश ,सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या . खेड्यापाड्यात बौद्धविहारांचे उद्घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्मपरिषद भरविण्यात आली.व प्रमुख पाहुणे म्हणून दलाई लामा यांना बोलविण्यात आले. व ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. त्यात म्हणजे संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली. " बौद्ध जीवन संस्कार पाठ " या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. भय्यासाहेब हे बौद्धाचार्या चे जनक आहेत
धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनी भय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेराची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्याभूमितच राहत होते. त्यांचे नाव "महापंडित काश्यप " असे ठेवण्यात आले होते.
१९५९ मध्ये संघरक्षित लंडनहून आले होते. त्यांनी भय्यासाहेबांची भेट घेतली होती. आणि त्यांना सांगितले " आपण जे धार्मिक कार्य करता ते न करता आपण ते आमच्याकडे सोपवा " आपण आमच्यासोबत काम करावे आम्ही त्याची योग्य ती किमंत देऊ .
स्वाभिमानी भय्यासाहेबांना हे रुचले नाही त्यांनी संघरक्षितांना सुनावले " मी माझ्या बापाची संस्था विकणार नाही आपणास जर काम करायचे असेल तर आमच्या संस्थेत येऊन करा .
भय्यासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या सेवेसाठी झोकून दिले.
अशा ह्या सूर्यपुत्राच्या स्मृतिदिन  विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम...
! जय भीम ! !!जय भारत !! !!! नमो बुद्धाय !!!



पेरियार इ.व्ही. रामस्वामी

सभी साथियों को पेरियार ई०वी० रामास्वामी की 137 वीं जयंती की बहुत-बहुत शुभकामनाएँ🙏🏻💐🙏

आज के दिन हमारे समाज के क्रान्तिकारी महामानव पेरियार ई.वी.रामासामी नायकर का जन्म 17 सितम्बर 1879 ईo मे हुआ था। 

और आज के ही दिन क्रान्तिकारी भारत की प्रथम महिला स्वतंत्रता सेनानी विरांगना भीमाबाई होलकर जी का जन्म भी 17 सितम्बर 1795 ईo मे हुआ 

पेरियार ई.वी.रामासामी नायकर जी ने धर्म, अन्धविश्वास, पाखंडवाद, ब्राम्हणवाद,ऊच नीच, छुआछूत ,भेदभाव, जातिवाद के बहुत बडे विरोधी थे,
वो हर समाज मे समता, समानता , मानवता का रूप लाना चाहते थे,

पेरियार नायकर जयंती एंव विरांगना भीमाबाई होलकर जयंती की बहुत ढेर सारी हार्दिक बधाई व शुभकामनाएँ देती हू,

महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. श्री. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र याचा अर्थ "महारांची भूमी" असा होतो.

महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. श्री. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र याचा अर्थ "महारांची भूमी" असा होतो.

मुख्यत: महाराष्ट्रात रहात असल्याने महारांची मातृभाषा मराठी आहे
महार या जातीचे लोक महाराष्ट्रात कोकण, नागपूर, वर्धा, भंडारा, चांदा इत्यादी ठिकाणी आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. आर्य लोक [[भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. महार जातीत इतर काही जातींप्रमाणे पोटभेद नाहीत. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्णानंतर (?) महार जातीतच ब्राम्हणांनी (?) भेद तयार केले आणि या भेदांत लग्न जुळवत नाही. महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. महार आपण पांडवाच्या वंशांतले आहोत असे म्हणवून घेत. त्यांचे विशिष्ट देव म्हणजे विठोबा, म्हसोबा, खंडोबा, ज्ञानोबा, चोखोबा, भवानी, मरीआई, सटवाई इत्यादी होत. वर्‍हाडप्रांतामध्ये ग्रॅबिएल, अझ्रेल, मायकेल, अनांदीन या नावाच्या देवतांची महार लोक पूजा करतात असे रसेल व हिरालाल सांगतात.

महार कोण होते

१. महार समाजाचे वास्तव्य गांवकुसाबाहेर होते.
२. महार समाज हा ग्रामरक्षणाचे कार्य करत होता. गावात चोरी झाली तर चोराला शोधणे आणि सापडला नाही तर चोरी गेलेल्या मालाची नुकसान भरपाई महारांनाच द्यावी लागत असे.
३. चोरांचा माग काढणे, गावात येणार्‍या जाणार्‍याची नोंद घेणे, संशयित व्यक्तींना वेशीवर चौकशीसाठी रोखणे हे त्यांचे काम होते.
४. शेतीच्या वा गावाच्या सीमांबाबत तंटे उद्भभवले तर महाराचीच साक्ष अंतिम मानली जात असे.
५. महारांची स्वतंत्र चावडी असे व तिचा मान गाव-चावडीपेक्षा मोठा होता.
६. व्यापारी जेव्हा आपले तांडे घेऊन निघत तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी महारांची पथके नियुक्त करत.
७. महार हे लढवय्ये (मार्शल रेस) आहेत ही नोंद ब्रिटिशांनी करून महार रेजिमेंटच बनवली. पेशवाईच्या अस्ताचा बहुमान महारांच्याच पराक्रमाकडे जातो.
८. पेशव्यांनीही अंगरक्षक/पहारेकरी म्हणून आधी महारांनाच प्राधान्य दिले होते.
९. महार हे ग्राम/नगर/राज्य परिप्रेक्षात गुप्तहेराचे काम करत. काहीही संशयास्पद वाटले तर त्याची खबर पाटलाला वा नगराध्यक्षाला देत असत. एवढेच नव्हे तर भटक्या जातींचे लोक, उदा० नंदीवाले, गावाच्या परिसरात अल्पकाळासाठी वास्तव्यास आले तर त्यांची संपूर्ण माहिती घेणे व गाव पाटलास देणे हे त्यांचे कर्तव्य होते.
१०. महार समाज अस्पृश्य गणला गेलेला होता.
११. महारांवर शेतसारा/खजिना योग्य ठिकाणी पोहोचवण्याची तसेच सरकारी आज्ञा/संदेशादीं दळणवळणाचेही काम होते.

 ९-१० व्या शतकानंतर (म्हणजे स्मृतिकाळ संपल्यानंतर) कधीतरी या जातींना अस्पृश्य बनवले गेलेले दिसते.
मग प्रश्न असा उद्भवतो की "महार" ही मुळात जात होती काय?
महार हे सगळेच नागवंशी वा सोमवंशी आहेत काय?
महार समाजातील प्रमुख आडनावांमध्ये अवचट, अहिरे, आडसुळे, आढाव, आराक, इंगळे, उबाळे, कदम, काळफात, कांबळे, काळमात, खैरकर, गायकवाड, झिने, थोरात, पगारे, पवार, पाठक, बावस्कर, भिंगार, भिलंग, भेडे, भोसले, मोहिते, विवेकर, शिंदे, शेजवळ, शेळके, सपकाळ, सरकटे, साळवे, हिवाळे, इत्यादी आडनावे आढळतात. या आडनावांवर नजर टाकली तर स्पष्टपणे हे लक्षात येते ते म्हणजे यातील बरीच आडनावे उच्चवर्णीयांतही (ओबीसींसह) प्रचलित आहेत. 

सुरुवातीला तरी या पथकांचा प्रमुख "महारक्षक" पद भूषवीत असणे स्वाभाविक आहे, परंतु महारट्ठी (रट्ठांचे प्रमुख) जसे नंतर मराठा या एका जातीत परिवर्तित झाले तद्वतच महारक्षक हीच एक जात बनली व संक्षेपाने तीच जात महार म्हणून ओळखली जाऊ लागली असे दिसते. (मराठा जातीचाही कसलाही उल्लेख श्रुति-स्मृति-पुराणांत मिळत नाही त्याचे हेच कारण आहे.)

महार ही एक मार्शल रेस आहे असे ब्रिटिशांनी का नोंदवून ठेवले असेल याचे हेच कारण आहे की परंपरागतच मुख्यत: संरक्षणाचेच कार्य ते करत असल्याने लढवैय्येपणा, चिकाटी हे मूलभूत गुण त्यांच्यात होते आणि वेळोवेळी ज्ञात इतिहासातही त्यांनी हे गुण दाखविले आहेत. ग्रामव्यवस्थेचे रक्षण करून त्यांनी हजारो वर्ष जे अतुलनीय कार्य केले आहे ते कसे हे खालील मुद्दे पाहिल्याखेरीज लक्षात येणार नाही.
१. तत्कालीन स्थितील प्रत्त्येक गावाभोवती तटबंदी/कोट असत व रात्री मुख्य दरवाजा बंद केला जाई. याचे कारण म्हणजे सत्ता कोणाचीही असो, गावे सुरक्षित नसत. शिवाय सातत्याने आक्रमणे/परकीय आक्रमणे वाटेत येतील त्या गावांत लुटालूट-जाळपोळ हा आक्रमकांचा (आणि दरोडेखोरांचाही) प्रमुख धंदाच होता. गावाच्या आत राहून गाव रक्षिले जाईल अशी सोय उत्तरोत्तर कमी होत गेली. महार मात्र जिवाचा धोका पत्करून उघड्यावर स्वत: व स्वत:चे कुटुंबे असुरक्षित ठेवत गावांचे रक्षण करत राहिली आहेत. सर्वच वेळी त्यांना यश मिळणे शक्य नव्हते...अशा वेळीस प्राणांचे बलिदान त्यांना द्यावे लागले असणार.

मराठा समाज पूर्वी महार हॉते है सत्य आहे

महार लोग सुर विर महापराक्रमी 
महार नावा वरुण महाराष्ट् है नाव देण्यात आले
महाराष्ट् है महार लोकाचि भूमि आहे

Thursday, 15 September 2016

पोस्ट नः 157 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे iii

पोस्ट नः 157

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा

 3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे iii

32) माणसाला दग्ध करणारे आणि त्याला असुखी करणारे असे दुःखाचे मूळ कशात आहे हे वरील प्रवचनात स्पष्ट झाले आहे माणसांच्या रागाद्वेषावर अग्नीचे रुपक योजुन बुध्दांनी येथे माणसाच्या असुखाचे परिणामकारक स्पष्टीकरण केले आहे

33) रागद्वेषाच्या आधीन होण्याचे मनुष्य दुःखी होतो राग द्वेष हे विकार म्हणजे  मनुष्याच्या निब्बाणास्थितीपर्यत पोहोचण्याच्या मार्गात अडचणी निर्माण करणारया शृंखलाच आहेत.ज्या क्षणी मनुष्य ह्या विकारापासुन मुक्त होतो त्या क्षणीच तो निब्बाण मार्ग आक्रमु लागतो

34) तथागत बुध्दांच्या मते ह्या विकारांचे तीन प्रकारचे  वर्ग आहेत.

35) पहिल्या वर्गात तृष्णेतुन उदभवणारे कामुकता आणि लोभ हे विकार येतात

36) दुसरया वर्गात वितृष्णेतुन उदभवणारे घृणा क्रोध आणि द्वेष हे दोष येतात

37) तिसरया वर्गात अविद्येतुन उदभवणारे जडता मुर्खता आणि मूढता हे दोष येतात.

38) पहिल्या व दुसरया अग्नीचा संबंध भावना आणि दुसरया संबंधीचा दृष्टीकोन आणि भूमिका यांच्यांशी निगडीत आहे. तर तिसरया प्रकारचा अग्नी मोह हा जे सर्व विचार सत्यापासुन भिन्न असतात त्यांच्याशी निगडीत आहे.

39) तथागत बुध्दांच्या निब्बाण सिंध्दांतासंबंधी काही गैरसमजुती आहेत

40) निब्बाण शब्दाच्या व्यत्पतीदृष्ट्या अर्थ फुंकर घालुन विझविणे किंवा मालविणे असा आहे

41) या शब्दाचा व्युत्पतीचा आधार घेऊन टिकाकारांनी निब्बाणसिंध्दांत अर्थहीन बनविला आहे

42) ते असे मानतात कि निब्बाण म्हणजे सर्व मानवी विकार मालविणे आणि ही क्रिया मृत्युसमान आहे.

43) असा वाकडा अर्थ लावुन त्यांनी निब्बाणसिंध्दांत हास्यास्पद बनविण्याचा प्रयत्न केला आहे

44) टीकाकार लावतात तसा निब्बाणाचा अर्थ तथागतानां अभिप्रेत नव्हता हे जो कोणी अग्नी प्रवचना ( अग्निस्कंधोपम सूक्ताचा ) भाषादृष्टया अभ्यास करतील त्यांच्या लक्षात येईल,

45) अग्नीस्कंधोपम सूक्तात जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यु म्हणजे तो मालविणे असे म्हटलेले नाही, तिथे म्हटले आहे की रागाग्नी द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहेत,

46) सर्व प्रकारच्या प्रवृतीना पुणपणे मालवुन टाकावे असे अग्नीसूक्त म्हणत नाही ते एवढेच म्हणते की पेटत्या ज्वालेला अधिक इंधन पुरवु नका

47) दुसरी गोष्ट अशी की , टिकाकार निब्बाण आणि परिनिब्बाण यात भेद न करण्यात चुंकले आहेत.

48) उदानात असे सांगितले कि जेव्हा शरीर नाश पावते.  वाहाणे थांबते संज्ञा नाहीशा होतात चलन वलनादी क्रिया थांबतात चेतना जाते तेव्हा परिनिब्बाण घडते परिनिब्बाण म्हणजे पुर्णपणे मालविणे,  नाहीसे होणे


क्रमशः
      रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म

पुढील पोस्ट मध्ये वाचा

 निब्बाण प्राप्त करणे हा  धम्म आहे( ii)

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
           विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

तर झी 24 तास चँनल 100 वर्ष मागे .... हर्षल बागल

तर झी 24 तास चँनल 100 वर्ष मागे ....
                           हर्षल बागल
    झी 24 तास च्या ऊदय निरगुडकरला " बहुजन नेते प्रकाश आबेंडकरांचा " करारा जवाब ......रात्री झालेल्या चर्चेतील ऊदय निरगुडकरचा मराठा दलित वाद लावण्यासाठी किती आटापिटा होता हे दिसुन आले.
झी 24तास चा प्रश्न
 @ मराठा क्रांती मोर्चामुळे दलित समाज भयभीत झाला का ?
प्रकाश आबेंडकर - दलित समाजातील कोणता कार्यकर्ता म्हणाला का या मोर्चाचीभिती वाटते,  मराठा समाजाचे मोर्चे हे मुक मोर्चेत त्यामुळे कोणाला भयभित होण्याचा प्रश्नच नाही. ऊलट झी 24 तास सारख्या चँनल ने या प्रश्नावर चर्चा घडवुन समाजात वाद लावु नये ... ज्याची लायकी असते चर्चा करायची त्याच्याबरोबरच चर्चा करावी,  मी समाजाबरोबर चर्चा करतो, भाजप व आर एस एस च्या पायात गुलाम झालेल्यांशी कसली चर्चा करताय.

झी 24 तास
  जय भीम के नामसे दलितोंका खुण बहता है तो बहने दो हे स्टेटमेंट रामदास आठवलेंनी केलं ते योग्य आहे का?  यावर तुम्ही काय बोलाल.

प्रकाश आबेंडकर - या चर्चेत तुम्ही त्यांनाच बोलवा ना,  त्यांनाच विचारा,  कोणत्यातरी दोन प्यादेंना चर्चेला बोलवायचं त्यांच्याशी काय चर्चा करणार.  गुलाम झालेल्यांशी काय चर्चा करणार,  असल्या फालतुक चर्चा घडवुन दोन समाजात वाद घडवुन डाँ ऊदय निरगुडकर आपण आपल्या चँनलची महाराष्ट्रात बदनामी करत आहात त्यामुळे थेट आक्का ला डायरेक्ट चर्चेला बोलवा,  प्यांदेंना बोलुन काय ऊपयोग,  मला परत असल्या चर्चेला बोलवु नका,  आणी तुम्ही या मराठा मोर्चांच भाडंवल करुन वाद लावु नका .. ( प्रकाश अाबेंडकर ऊठुन जातात)
  (झी 24 तासचे ऊदय निरगुडकर घाम पुसत अ अ.अं. करित होते. )

झी 24 तास ने पुन्हा चर्चेचा प्रश्न भाजप खासदार साबळेंना विचारला
प्रश्न - मराठा मोर्चे ना प्रतिऊत्तर म्हणुन दलित मोर्चे काढले जात आहेत का?
खासदार साबळे - दलितांनाही मराठ्यांप्रमाणे मोर्चे काढण्याचा अधिकार आहे.
( म्हणजे भाजप च्या खासदाराचे म्हणने आहे की मराठा विरोधात दलित मोर्चे काढले पाहिजेत,  कारण मराठ्यांनी सरकारला नाकेनऊ आणले,  मराठ्यांचे मोर्चे हे सरकार विरोधात असतानाही सरकार व आर एस एस हे मराठा मोर्चे मिडीयामधुन सतत दलितांच्या विरोधात दाखवत आहे. अशा दंगलखोर सरकारची व त्यांच्या चेल्यांचा माज या चर्चेत प्रकाश आबेंडकरांनी चांगलाच ऊतरवला. )

झी 24 तास
प्रश्न - प्रविण दादा गायकवाड आपणाला काय वाटते की अँट्रासिटी बद्दल का रद्द करावी वाटते?
प्रविण दादा गायकवाड - सर्वप्रथम एक लक्षात घ्या की मराठा क्रांती मोर्चात जी निवेदने सरकारला दिलीत त्यामध्ये कोठेही अँट्रासिटी रद्द करा अशी मागणी सकल मराठा समाजाची नाही. पहिली गोष्ट हे मोर्चे मुक आहेत.  व ते कोणत्याही समाजाच्या विरोधात नाहीत. विशेष म्हणजे हे मोर्चे राजकारणी पुढारी विरहीत आहेत. याला समाज नेतृत्व आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मागण्या ह्या कोपर्डी नराधमांना फाशी,  आरक्षण अशा मागण्या घेऊन समाज सरकारविरोधात रस्त्यावर ऊतरला.

नेहमीच आपल्या चँनलवर चर्चा घडवत असताना संघ व भाजप हिताने चर्चा करायची व मराठ्यांना व दलितांना सतत बदनाम करायचे हे काम आजपर्यंत झी 24 तास चँनलने केले आहे. त्या निरगुडकरांना आज प्रकाश अाबेंडकरांनी जी जबरदस्त चपराक दिली व समज दिली की मराठा विरोधी निघाणारे मोर्चे हे भाजप व संघ प्रणित असतील ते दलितांचे नसतील ते भाजप च्या समर्थकांचे असतील ते कधीच डाँ बाबासाहेब अाबेंडकर यांच्या विचाराने चालणाऱ्या कार्यकर्त्याचे नसतील. मराठ्यांच्या मुक मोर्चांना प्रकाश आबेंडकरांनी शब्बासकी दिली आहे. एका युगनायकाच्या युग पुत्राकडुन हिच अपेक्षा होती. प्रकाश आबेंडकर तुम्हीच खरे बहुजन समाजाचे न्यायमंत्री आहात तुम्हाला समाजमान्यता आहे. तुमच्या भुमिकेचं स्वागत तमाम मराठा समाज एकदिलाने करित आहे.

मिडीयाने व अध्यक्ष महोदय चँनलवर व वर्षावर कितीही बैठका कितीही चर्चा घडवा काही ऊपयोग होणार नाही. कारण चर्चा करायला कोणीही आणलं तरी समाज त्याचं एेकणार नाही. तुम्ही कितीही नेते मँनेज करा पण सकल मराठा याआधीही संभाजी राजेंच्या मनुस्म्रुती ग्रंथानुसार हत्या केल्यानंतर तमाम मराठा फौजा स्वराज्य रक्षणासाठी कोणतही नेतृत्व नसताना लढल्या आज साडेतीनशे वर्षानंतर पुन्हा मराठा एकत्र कोणत्याही नेतृत्वविना हक्कासाठी लढत आहे. त्यामुळे तुम्ही कोणाला खासदारकी दिली कोणाला आमदारकी दिली कोणाला कँबिनेट मंत्री पदे देऊन आजवर फडणवीसांनी विविध समाजाची प्रमुख आदोलंन पंक्चर केली. ज्यांना पदं दिली त्यांच्या तोडांतुन एक शब्दही समाजासाठी निघत नाही. असो अशा लालची नेत्यांना समाज ही मानत नाही.  एकमेकांच्या विरोधात ग्रामपंचायतची निवडणुक लढवणारा मराठा एका गाडीत समाजाच्या भावी पिडीसाठी गावोगावं फिरु लागला. गावगाड्यातला विखुरलेला मराठा एकत्र आला.  सकल मराठ्यांची  हि एक क्रांती आहे. डाँ बाबासाहेब आबेंडकारांनी त्यावेळी सांगितले की शिका संघटित व्हा व संघर्ष करा ... तेव्हा दलितांनी एैकलं व त्यांनी संघर्ष केला... आज तोच संदेश मराठा एैकत आहेत आज मराठे शिकत आहेत संघटित होत आहेत व संघर्ष करित आहेत तर झी 24 तासच्या पोटात दुखायचं कारणं नाही....
म्हणुनच मराठा क्रांती मुक मोर्चांचा अपप्रचार करणाऱ्या झी 24 सारख्या वृत्तवाहिन्या एक पाऊल पुढे नाही तर 100 वर्ष मागे नेऊन ठेवु... हा सकल मराठा समाजाचा व दलित समाजाचा झी 24 तास च्या ऊदय निरगूडकरला हा इशारा समजावा...
         हर्षल बागल
 सकल मराठा क्रांती मुक महामोर्चा

Tuesday, 13 September 2016

पोस्ट नः 155 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे ( I)

पोस्ट नः 155

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा

 3) निब्बाण प्राप्त करणे हा धम्म आहे ( I)
*********
1) निब्बाणासारखे परमसुख दुसरया कशातही लाभत नाही असे तथागत बुध्दांचे वचन आहे

2) तथागत बुध्दांनी शिकवलेल्या सर्व सिंध्दांताचा निब्बाण हा केंद्रंवर्ती सिंध्दांत आहे.

3) निब्बाण म्हणजे काय ? बुध्दप्रणीत निब्बाण हे बुध्दपूर्व लोकांनी सांगितलेल्या निब्बाणापेक्षा अर्थाने आणि आशयाने वेगळे आहे

4) बुध्दपुर्व लोक निब्बाण म्हणजे आत्म्याचा मोक्ष असे मानीत असत

5) चार प्रकारचा मोक्ष पूर्वी मानला जात असे. पहिला लौकिक म्हणजे खा प्या मजा करा या जड स्वरुपाचा दुसरा यौगिक तिसरा ब्राम्हणी आणि चौथा औपनिषदिक

6) ब्राम्हणी आणि औपनिषदिक निब्बाण कल्पनेत एक साम्य होते, या दोनही कल्पनात आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानले जाई. तथागत बुध्दाने या सिध्दांताचा निषेध केला आहे, म्हणुन निब्बाणविषयक ब्राम्हणी आणि औपनिषदिक शिकवणुकीचे खंडन करणे तथागत बुध्दांना कठीण गेले नाही

7) निब्बाणाची लौकिक कल्पना ही अत्यंत जड स्वरुपाची असल्यामुळे तथागत बुध्दांस ती कधीच प्रिय नव्हती. कारण या लौकिक कल्पनेत माणसाच्या प्राणी म्हणुन ज्या इंद्रिय भुका असतात त्यांचे शमन करणे ह्यापलीकडे दुसरा आशय नाही त्यात आध्यात्मिक असे काहीच नव्हते

8) असली निब्बाणाची कल्पना मान्य करणे म्हणजे बुध्दांच्या मते मानवाची अत्यंत हानी करण्यासारखे आहे

9) कारण इंद्रिय भुकांचे शमन करणे म्हणजे अधिक भूका निर्माण करण्यासारखे आहे अशा प्रकारचा जीवानमार्ग कोणत्याही प्रकारचे सौख्य मिळवुन देऊ शकत नाही. उलट त्याने येणारया सुखाने अधिक दुःख निश्चितपणे वाट्यास येते.

10) योगातील निब्बाण कल्पना म्हणजे एक केवळ तात्पुरती अशी व्यवस्था होती, त्याने मिळणारे सुख हे नकारात्मक स्वरुपाचे होते. आणि ते मिळवण्यासाठी सर्व संसार पराडमुख व्हावे लागते त्यांच्या योगाने वेदना टाळता येतात. परंतु सुख मिळत नाही आणि सुख मिळालेच तर ते योग चालु आहे तोपर्यंतच. ते स्थायी स्वरुपाचे नव्हते. अस्थायी स्वरुपाचे होते.

11) तथागत बुध्दांची निब्बाणविषयक कल्पना त्यांच्या पूर्वीच्या मतप्रणालीपेक्षा वेगळी होती

12) त्याच्या निब्बाण कल्पनेत तीन विचारांचा अंतर्भाव होतो

13) आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार.

14) जिंवतपणी ह्या सर्व संसारात असताना सुख हा दुसरा विचार . आत्म्याचा मोक्ष आणि मृत्युनंतर आत्म्याला मोक्ष मिळणे हे दोन विचार बुध्दांच्या निब्बाण कल्पनेला अगदी अपरिचित आहेत.

15) तथागत बुध्दांच्या निब्बाण कल्पनेतील मूल आधार असा तिसरा विचार म्हणजे सदैव प्रज्वलित असणारया विकारांच्या ज्वलावर निग्रह साधणे.

16) गयेत राहत असताना बुध्दांनी भिक्खुंना जे प्रवचन दिले त्याचा मुख्य विषय राग आणि द्वेष हे प्रज्वलित अग्निसारखे होत हा आहे

17) भिक्खु, अखिल संसार हा म्हणजे एक पेटता अग्नीच आहे आणि संसारातील कोणकोणत्या वस्तु जळत आहे

क्रमशः
       रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म".
पुढील पोस्ट मध्ये वाचा

 "निब्बाण प्राप्त करणे हा  धम्म आहे" ( ii)

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
       विश्वरत्न
    डाँ.बाबासाहेब आंबेडकर

        INDIA THAT IS BHARAT

पोस्ट नः 154 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा 2) जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय

पोस्ट नः 154

  बुध्द आणि त्यांचा धम्म
   तिसरा खंडः भाग दुसरा

 2) जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म होय

1) तीन प्रकारच्या पुर्णता असतात

2) कायिक, वाचिक आणि मानसिक .

3) मानसिक पुर्णता कोणत्या प्रकारची असते?

4) आसवे अथवा चितमल पुर्ण नष्ट होऊन ह्या जीवनात संपुर्ण चित्त विमुक्तीचा अनुभव घेणे प्रज्ञेने आसवांपासुन विमुक्ती मिळवुन त्याच अवस्थेत सतत वर्तने ह्यासच मानसिक पुर्णता म्हणतात.

5) आणखीही पारमिता आहेत, आणि तथागत बुध्दांने त्या सुभूतीला सांगितल्या

6) सुभूति बोधिसत्वाची " दान पारमिता " कोणत्या प्रकारची असते?

7) तथागत बोधिसत्व चित्ताच्या अवस्थांची जाणीव ठेवुन अंतर्बाह्य वस्तुंचे दान करतो आणि त्या सर्व प्राणीमात्रांना दिल्यावर बोधि ला त्या अर्पण करतात. दुसरयांनाही तो तसे करण्याची प्रेरणा देतो. कुठल्याही वस्तुबद्दल त्यांच्या मनात आसक्ती नसते. ह्या अवस्थेला दान पारमिता म्हणतात.

8 सुभुति बोधिसत्वाची  " शील पारमिता " कशी असते?

9) तथागत या पारमितेत तो स्वतः सदाचाराची दहा पथ्ये पाळीत असतो आणि इतरांना तसे करण्याची प्रेरणा देतो.

10) तथागतः बोधिसत्वाची " क्षान्ति- पारमिता " कशी असते?

11) तथागतः या पारमितेत तो स्वतः  क्षमाशील होऊन इतरांना तसे होण्याची प्रेरणा देतो,

12) सुभितिः बोधिसत्वाची
 " वीर्य पारमिता "कशी असते?

13) तथागतः या पारमितेत तो पाचही पारमितांच्या परिपूर्तीत अखंड मग्न राहतो आणि इतरानांही तसेच करण्याची प्रेरणा देतो

14) सुभितिः बोधिसत्वाची  "समाधी ही पारमिता " कशी असते?

15) तथागतः या पारमितेत कौशल्याने तो ध्यान साधतो तथापि तो तत्संबधित रुप लोकात पर जन्म घेत नाही , आणि इतरानांही तो तसेच करण्याची प्रेरणा देतो,

16) सुभूतिः बोधिसत्वाची  "प्रज्ञा - पारमिता " कशी असते?

17) तथागतः या पारमितेत तो कोणत्याही एका धर्मात ( भौतिक अथवा आधिभौतिक ) मग्न न राहता सर्व धर्माच्या अभिजात स्वरुपाचे चिंतन करीत असतो आणि तसे करण्यास इतरांना प्रेरणा देतो

*18) अशा पारमिता अंगी बाणविणे यालाच धम्म म्हणतात.

क्रमशः
रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म ".
पुढील पोस्ट मध्ये वाचा

 निब्बाण प्राप्त करणे हा  धम्म आहे

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात "सकाळी"  गेलेच पाहिजे "
*******
        विश्वरत्न
    डाँ.बाबासाहेब आंबेडकर

INDIA THAT IS BHARAT
         9922047333

पोस्ट नः 153 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा १) धम्म म्हणजे काय ? ( ग )

पोस्ट नः 153

 बुध्द आणि त्यांचा धम्म
  तिसरा खंडः भाग दुसरा

१) धम्म म्हणजे काय ?
       ( ग )
3) 1) पाच प्रकारच्या दुर्बलता आहेत. त्या साधनेला बाधक ठरतात त्या कोणत्या ?

2) जीवहिंसा ,चोरी , काममिथ्याचार, असत्य भाषण आळस वाढविणारया मद्याचे सेवन

3) ह्या पाच दुर्बलता साधनेतील अपयशाची पाच कारणे आहेत.

4) साधनेतील या पाच बाधा दुर केल्यानंतर चार प्रकारच्या सावधानतेच्या ( स्मृती - उपस्थानांचा ) मनात उदभव घडेल असे वागले पाहिजे

5) पहिल्या सावधानतेत भिक्षु ऐहिक जीवनातील सर्वसामान्य असा लोभ आणि असंतोष यावर विजय मिळवुन , प्रयत्नपुर्वक जागरूकपणे आणि स्वाधीन चित्ताने कायेला ती केवळ काया असे मानुन ( कायानुपश्यना करीत ) जीवन व्यतीत करतो,

6) वेदनांना त्या केवळ वेदना आहेत असे मानुन ( वेदनानुपश्यना करीत ) जीवन व्यतीत करतो

7) चित्त हे चित आहे असे मानुन ( चित्तानुपश्यना करीत ) जीवन व्यतीत करतो

8) चित्ताच उत्पन्न होणारे विचार ते केवळ चित्तधर्म आहेत असे मानुन ( धर्मानुपश्यना करीत ) प्रयत्नपुर्वक जागरुकतेने आणि स्वाधीनतेने सर्वसामान्य लोभ आणि असंतोष यांच्यावर विजय मिळवतो

9) तेव्हा साधनेतील पाच दुर्बलता दुर होतात , चार सावधानतांचा ( स्मृती उपस्थानाचा ) उदय होतो.

 4) घ
1) घात ( अपयश ) तीन प्रकारचे आहेत शीलघात , चित्तघात , आणि दृष्टीघात

2) शीलघात म्हणजे काय ? जीवहत्या,  चोरी, कामभोगासंबधी , मिथ्याचार , असत्य भाषण ,निंदा , कटु भाषण व्यर्थ बडबड हे सर्व शीलघातात अंतर्भुत होतात.

चित्तघात कोणत्या प्रकारचे असतात.

4) लोभ आणि दृष्टपणा हे चित्तघात होत

5) दुष्टीघात कोणत्या प्रकारचे असतात

6) दृष्टीघातामुळे मनुष्य असा विकृत दृष्टीकोन स्वीकारतो की दान त्याग परित्याग यामध्ये काहीच गुण नाही. सदाचार आणि दुराचार यांना काही फल नाही कि त्यांचा परिणामही घडत नाही , इहलोक नाही कि परलोक नाही आई नाही कि बाप नाही आणि प्राणी स्वोत्पन्नही नाही या जगामध्ये ज्यांनी अतुच्च्य शिखर गाठले आहे . पुर्णता मिळवली आहे. ज्यांना आपल्या आंतरिक शक्तीने या ऐहिक जगापलीकडच्या जगाचा साक्षात्कार झाला आहे , आणि जे त्या जगाच्या अस्तित्वाची घोषणा करु शकतात असे श्रमण आणि ब्राम्हण या जगात नाहीत, असे जे समजतात त्या लोकांच्या ठिकाणी भिक्षुहो दृष्टीघात झाला आहे असे समजावे

7) भिक्खुंणो ! शीलघात , चीत्तघात , दृष्टीघात या तीन घातांमुळे प्राण्याला मरणानंतर दुर्गती प्राप्त होते, असे हे तीन घात आहेत

8) भिक्खुंनो लाभ तीन प्रकारचे असतात , ते म्हणजे शीललाभ दृष्टीलाभ

9) शीललाभ म्हणजे काय ?

10) हिंसा चोरी मिथ्याचार असत्य भाषण निंदा कटु भाषण निंदा व्यर्थ बडबड यांच्यापासुन परावृत्त होणे म्हणजे शीललाभ होय,

11) चित्तलाभ म्हणजे काय ?

12) लोभ आणि दृष्टपणा यापांसुन दुर राहणे म्हणजे चित्तलाभ होय.

13) दृष्टीलाभ म्हणजे काय

14) दान त्याग परित्याग यामध्ये काही पुण्य आहे. सदाचार आणि दुराचार यांची फळे आणि परिणाम भोगावे लागतात, इहलोक आणि परलोक आहे, आईबाप आणि स्वोत्पन्न प्राणी आहेत, ज्यांना या जगापलीकडील दुसरया जगाचा साक्षात्कार झाला आहे आणि जे तशी त्याची घोषणा करु शकतात आसे श्रमण आणि ब्राम्हण आहेत अशी दृढ समजुत म्हणजे दृष्टीलाभ , भिक्षुनों या समजुतीला दृष्टीलाभ म्हणतात,

15) या तीन लाभांमुळेच प्राण्याला शरीरनाशांनतर दैववान स्वर्गीय सुगती लाभते भिक्खुंनो असे हे तीन लाभ आहेत,

क्रमशः
रोज वाचा
बुध्द आणि त्यांचा धम्म
पुढील पोस्ट मध्ये वाचा

 " धम्म म्हणजे काय"

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात " सकाळी "  गेलेच पाहिजे "
*******
         विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर

INDIA THAT IS BHARAT
       9922047333

पोस्ट नः 152 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा १) धम्म म्हणजे काय ? 1) जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म ( क )

पोस्ट नः 152

बुध्द आणि त्यांचा धम्म
 तिसरा खंडः भाग दुसरा

१) धम्म म्हणजे काय ?

1) जीवन शुचिता राखणे म्हणजे धम्म
             ( क  )

1)  जीवन शुचितेचे तीन प्रकार आहेत.  देहशुचिता, म्हणजे काय?

2) माणसाने हिंसा , चोरी आणि मिथ्याचार यांच्यापासुन विरत होणे याला देहशुचिता म्हणतात.

3) वाकशुचिता म्हणजे काय?

4) वाकशुचिता म्हणजे असत्य भाषणापासुन विरत होणे

5) आणि मनःशुचिता म्हणजे काय ?

6) मनःशुचितेत भिक्षुला कामवासना झाल्यास कळते की, आपल्यामध्ये वैषयिक कामवासना उत्पन्न झाली आहे आणि जर तशी उत्पन्न झाली नसेल तर तेही त्याला कळते . त्याप्रमाणेच आता उत्पन्न न झालेली कामवासना कशी उत्पादन होते. आणि तशी उत्पन्न झाल्यावर तिचा त्याग कसा करता येतो आणि अशी कोणत्या प्रकारे पुढे कधीही उत्पन्न होणार नाही हे सर्व त्याला कळते.

7) त्याच्या ठिकाणी द्वेष
 ( व्यापाद ) उत्पन्न झाल्यास त्याला  कळते

8) त्यांच्या ठिकाणी आळस तंद्रा ( स्त्यान मृध्द) उध्दतपणा शंका गोंधळ उत्पन्न झाल्यास त्याची त्याला जाणीव होते. त्याप्रमाणेच या सर्व मानसिक दुःस्थितीचा उदगम कसा होतो . त्याचा त्याग कसा करता येतो आणि तद्विरहीत चित्ता कशी साधायची असते यांचे ज्ञान असणे म्हणजेच मानसिक शुचिता

9) जो काया वाचा मन शुध्द पवित्र आहे जो निष्पाप स्वच्छ आणि पावित्र्ययुक्त आहे

10) त्याला लोक निष्कलंक म्हणतात

        ( ख )
1) शुचितेचे तीन प्रकार आहेत, कायेची ,वाचेची आणि मनाची शुचिता .

2) कायेची शुचिता म्हणजे काय?

3) कायाशुचितेत मनुष्य हिंसा चोरी काम मिथ्याचार यापांसुन परावृत्त होतो, याला कायाशुचिता म्हणतात

4) वाकशुचिता म्हणजे काय ?

5) वाकशुचितेत मनुष्य असत्य आणि व्यर्थ बडबड यापासुन दुर राहतो. त्याला वाकशुचिता म्हणतात,

6) मनःशुचिता म्हणजे काय ?

7) मनःशुचितेत मनुष्य लोभ आणि ईर्षा यापांसुन परावृत्त होऊन सम्यक दृष्टी धारण करतो ,याला मनःशुचिता म्हणतात, शुचितेचे हे तीन प्रकार आहेत,

क्रमशः
रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म ".
पुढील पोस्ट मध्ये वाचा

 " धम्म म्हणजे काय "

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे"
*******
           विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर
INDIA THAT IS BHARAT
9922047333

Friday, 9 September 2016

✍🏻🌹 बघ तुला माझा आभास होतो का ? 🌹✍🏻 ✍🏻_अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर.🌹

✍🏻🌹 बघ तुला माझा आभास होतो का ? 🌹✍🏻
✍🏻_अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर.🌹

कालपरवा पर्यत मी शांत होतो,
तु ही व्यस्त होतीस कामात,
नव्या भारताच्या निर्मितीचे, नवे धोरण ठरविण्यात...
तेवढ्यात...
पेटलेली चेतना, विझलेली आग,
झालेली राख, उध्वस्त झालेली मायेची काख,
किंकाळी ऐकू आली,
मोर्चा निघाला...
खैरलांजी व्हाया मुंबई, कोपर्डी दिल्ली...
चल ! सामिल हो, तू पण...
मी आहे मोर्चाच्या पहील्या टोकावर...
पिडीतांच्या दुःखाचे ओझे वाहत.
पण तुला मात्र मध्यंतरीतला मोर्चा सांभाळावा लागेल.
गोंधळ माजवलाय म्हणते, मधातल्यांनी...
जातीच्या नावाने, अॅट्रोसिटीच्या नावाने,
कालच्या व आजच्याही शूद्रांनी...
मराठ्यांची आर्ची पळविली म्हणते...
तूच सांग त्यांना...
शरदाचे चांदणे, भोसल्यांचे उदयन, ठाकऱ्यांचे 'राज'कारण पुरते बोंबलले...
मी सांगणार नाही तुला
बंदूका घ्यायच्या की तलवारी...
पण हा हल्ला तुलाच करायचा.
'स्त्री'च्या योनिला जात लावणाऱ्यांवर...
कुस्करल्या त्या साऱ्याच पाकळ्या तुझ्या होत्या हे दाखविण्यासाठी...
या मधातल्यांनी माणुसकीच्या दिशेने निघालेला मोर्चा...
मध्येच अडवून धरलाय जातीश्रेष्ठत्वासाठी...
तो तुला परत मार्गान्वित करायचाय.
पिडीतांच्या दुःखांचे भांडवलदार संपवून...
माणुसकीचा प्रवाह गतिमान करायचाय.
जातीचे, पंथाचे कठडे तोडून,
तुला सैराट पळायचे,
माणुसकीचे झाड रोवण्यासाठी...
बघ ! तो मोर्चा निघालाय त्याच माणुसकीच्या दिशेेने...
त्या मोर्चाला बघून...
बघ ! तुला माझा आभास होतो का ?
✍🏻_अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर.🌹

दलित अत्याचाराविरुद्ध २०० संघटनांची 'मोट'


( पोस्ट नः 151) बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग दुसरा इतरांच्या मते बुध्दांनी काय शिकविले ?

( पोस्ट नः 151)

    बुध्द आणि त्यांचा धम्म
    तिसरा खंडः भाग दुसरा

इतरांच्या मते बुध्दांनी काय शिकविले ?
*******
1) तथागत बुध्दांची शिकवणुक कोणती?

2) त्या प्रश्नासंबंधी त्यांच्या कोणत्याही दोन अनुयायांत किंवा बौध्द धम्माच्या अभ्यासाकांत एकमत नाही

3) काहीच्या मते समाधी हा त्यांच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे

4) काहीच्या मते त्यात विपश्यना ( एक प्रकारचा प्राणायाम ) महत्वाचा आहे

5) काहीच्या मते बौध्द धम्म म्हणजे केवळ दिक्षितानांच सांगावयाचा गुप्त मंत्र आहे .तर इतरांना तो एक सर्वाना उद्देशुन उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो

6) काहीच्या मते ती एक रुक्ष दर्शनपध्दती आहे

7) काहीच्यामते ते एक एहिक जीवनापासुन स्वार्थी पलायन आहे

8) काहीच्या मते तो केवळ गूढवाद आहे

9) काहीच्या मते ह्रदयातील सर्व वासना आणि भावना यांचा पध्दतशीर विरोध शिकविणारे ते शास्त्र आहे

10) बौध्द धम्मासंबंधीचा आणखी पुष्कळच भिन्नमतांचा संग्रह करता येईल

11) ही मत भिन्नता आश्चर्यकारण आहे

12) यापैकी काही मते एकांगी विचारवंतांची आहे असे लोक म्हणजे ज्यांना बौध्दधम्माचे सार समाधी विपश्यना किंवा दिक्षितांना प्राप्त होणारया गुप्त मंत्रात आहे असे वाटते ते लोक

13) दुसरी मते प्राचीन भारतीय इतिहासाच्या अभ्यासकांनी बौध्दधम्मासंबंधी जे लिहिले त्या बहुसंख्य लेखकांच्या लेखनाचा परिणाम होय. या लेखकांचा बौध्द धम्म हा मुळ आभ्यासाचा विषय नसतो त्यांचा या विषयाचा अभ्यास केवळ आकस्मिक आणि नैमित्तिक स्वरुपाचा असतो

14) त्यांच्यापैकी कोणीही बौध्द धम्माचे अभ्यासक नसतात

15) धम्माचा उगम आणि विकास यांचा विचार करणारे जे मानवशास्त्र त्यांचेही ते अभ्यासक नसतात

16) प्रश्न असा उदभवतो की तथागत बुध्दांना काही सामाजिक संदेश सांगावयाचा नव्हाता काय

17) या प्रश्नाचे उत्तर देण्याचा आग्रह धरला असता बौध्द धम्माचे विद्यार्थी दोन मुद्यांचा हवाला देतात ते म्हणतात

18) तथागत बुध्दांनी अहिंसा शिकवली

19) तथागत बुध्दांनी शांती शिकवली

20) त्यांना आणखी असा प्रश्न केला कि तथागत बुध्दांने त्याशिवाय दुसरा काही सामाजिक संदेश दिला काय ?

21) तथागत बुध्दांनी न्याय शिकविला काय ?

22) तथागत बुध्दांनी प्रेम( मैत्री) शिकवली काय ?

23) तथागत बुध्दांनी स्वातंत्र्य शिकविले काय ?

24) तथागत बुध्दांनी समता शिकविली काय ?

25) तथागत बुध्दांनी बंधुता शिकविली काय ?

26) तथागत बुध्द कार्ल मार्क्सला उत्तर देऊ शकतात काय ?

27) बौध्द धम्माची चर्चा करताना हे प्रश्न क्कचितच उपस्थित केले जातात

28) माझे असे उत्तर आहे कि तथागत बुध्दाला एक सामाजिक संदेश द्यावयाचा होता, तो वरील सर्व प्रश्नाची उत्तरे देतात, परंतु ही सर्व उत्तरे आधुनिक लेखकांनी आपल्या लेखनांत अगदी गाडुन टाकली आहेत

तथागत बुध्दांनी स्वतः केलेले वर्गीकरण
*******
1) तथागत बुध्दांनी आपल्या धम्माचे एक वेगळेच वगीकरण केले आहे

2) पहिल्या वर्गाला त्यांनी धम्म ही संज्ञा दिली

3) त्यांनी एक नवा वर्ग निर्मिला आणि त्याला अधम्म असे नाव दिले, तथापि तो धम्म ह्याच नावाने ओळखला  गेला

4) त्यांनी तिसरा एक वर्ग निर्मिला त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली

5) हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव होय

6) तथागत बुध्दांचा धम्म , अधम्म  आणि सद्धम्म ह्या तीनही वर्गाची ओळख करुन घेतली पाहीजे,

क्रमशः
रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म "

पुढील पोस्ट मध्ये वाचा

 " धम्म म्हणजे काय "

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "
*******

       विश्वरत्न
डाँ.बाबासाहेब आंबेडकर
INDIA THAT IS BHARAT
9922047333

पोस्ट नः 150 बुध्द आणि त्यांचा धम्म तिसरा खंडः भाग पहिला 3) तथागत बुध्दांनी स्वतःसंबंधी अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही. त्यांचा धम्म माणसाने माणसासाठी शोधुन काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरुपाची नाही

पोस्ट नः 150

बुध्द आणि त्यांचा धम्म
 तिसरा खंडः भाग पहिला

 3) तथागत बुध्दांनी स्वतःसंबंधी  अथवा आपल्या धम्मासंबंधी अपौरुषेयतेचा दावा मांडला नाही. त्यांचा धम्म माणसाने माणसासाठी शोधुन काढलेला आहे. तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरुपाची नाही
*******

1) प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणुक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे.

2) मोझेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही. परंतु आपल्या शिकवणुका मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे. त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे कि दुधामधाच्या प्रदेशात ज्यांना जावयाचे असेल त्यांनी ही शिकवणुक मान्य केली पाहिजे, कारण ती जिव्होवाची म्हणजे ईश्वराचीच शिकवण  आहे,

3) येशु ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतःच सांगुन दैवीपणावर हक्क सांगितला आहे, स्वाभाविकपणे त्याची शिकवणुकही दैवी झाली आहे

4) कृष्ण तर म्हणत असे मी स्वतः देव आणि गीता हा माझा शब्द आहे

5) तथागत बुध्दांनी मात्र आपल्या शासना संबधी किंवा स्वताः संबंधी कधीही असा दावा मांडला नाही

6) तथागत असे म्हणत असे कि आपण इतर माणसांसारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजेच एका माणसांने आपणास दिलेला एक संदेश आहे

7) आपला संदेश प्रमादातील आहे असे त्यांनी कधीच म्हटले नाही

8) तथागत म्हणतात माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्य मार्ग आहे

9) त्यांचे अधिष्ठान म्हणजेच जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव

10) तथागत असे म्हणतात कि त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्या संबंधी कोणतेही प्रश्न विचारायला आणि त्यांचे परिक्षण करायला सर्वाना स्वातंत्र्य आहे

11) कोणाही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आवाहन दिलेले नाही असे तथागत म्हणतात

क्रमशः
रोज वाचा
" बुध्द आणि त्यांचा धम्म "

पुढील पोस्ट मध्ये वाचा
 इतरांच्या मताने तथागत बुध्दांनी काय शिकवण दिली.

1) " समतेच्या विचारांच्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक रविवारी बुध्द  विहारात सकाळी  गेलेच पाहिजे "
*******
        विश्वरत्न
   डाँ.बाबासाहेब आंबेडकर
INDIA THAT IS BHARAT
9922047333

गद्दारांचे चेहरे दिसतील.......

गद्दारांचे चेहरे दिसतील.......
१२५ वी जयंती साजरी केलेले निळे हात आज गुलालाने लाल होतील,
चौकाचौकात उभारून मंडप वर्गणी मांगत फिरतील
तो येतोय...तो आलाय...कटआउट बँनर लागतील
आणी तेंव्हा भीमसैनिका तूला गद्दारांचे चेहरे दिसतील........
त्रिशरण पंचशील अडखळत बोलणारे
तासभराची डोळेबंद करून आरती म्हणतील
सार्वजनिकतेंच्या नावाखाली स्वतचा नवस फेडतील
महाप्रसादाच्या अनुषंगाने सत्यनारायणही घालतील
आणी तेंव्हा भीमसैनिका तूला गद्दारांचे चेहरे दिसतील........
ढोलताश्याच्या गजरात बेफाम होवून नाचतील
पुढच्या वर्षी लवकर या म्हणत ऊर बडवतील
आणी खुल्या झालेल्या मंडपात
पुन्हा नऊ दिवसाची तयारी करतील
अशी भीमविचारांची कत्तल करणारी जागोजागी दिसतील
आणी तेंव्हा भीमसैनिका तूला गद्दारांचे चेहरे दिसतील.......

🔷आरक्षणावरील लेख🔷 आरक्षणावरील लेख संवेदनशील वाचकांनी जरुर वाचावा... 🔸वृत्तरत्न 🔸 "🔹दै जनतेचा महानायक🔹" दि.2 सप्टेंबर 2016 चा संपुर्ण महाराष्ट्रात गाजलेला लेख " आरक्षण : एक विश्लेषण "

🔷आरक्षणावरील लेख🔷


आरक्षणावरील लेख संवेदनशील वाचकांनी जरुर वाचावा...
        🔸वृत्तरत्न 🔸
"🔹दै जनतेचा महानायक🔹"
    दि.2  सप्टेंबर  2016 चा
        संपुर्ण महाराष्ट्रात
          गाजलेला लेख                  " आरक्षण : एक विश्लेषण "
 
  लेखक : विशाल जाधव...


आरक्षण हा विषय खुपच जोर धरत आहे.लोक काय वाट्टेल ते याविषयी बोलत आहेत.काही लोक म्हणतात आरक्षण बंद करा,काही म्हणतात आरक्षण आर्थिक आधारावर द्या,काही म्हणतात धर्मावर द्या,काही म्हणतात आम्हाला नाही दिलं तर कोणालाच देउ नका ! अशी आरक्षणाच्या मागणीची ओरळ सुरु आहे.याविषयी घेतलेला विश्लेषणात्मक आढावा.
     मुळात आरक्षण म्हणजे काय?याचा लोक सरळसरळ अर्थ लावतात " राखीव जागा " म्हणजे अर्थातच आरक्षण .! यातच ते लोक गोंधड करतात .ते स्वत संभ्रमित असतात आणि ईतरांनाही संभ्रमित करतात. "आरक्षण " याचा सोपा आणि खरा अर्थ " किमान प्रतिनिधित्वाची संधी होय " ( minimum opportunity for representation ) प्रतिनिधित्व कोणाचे? तर त्या लोकांचे ज्या लोकांना हजारो वर्षे त्यांच्या मुलभुत हक्कांपासुन,विकासापासुन,वंचित ठेवले त्यांच्या उत्कर्षाची संधी जी नाकारली गेली तो उत्कर्ष साधण्यासाठी दिलेली संधी होय.
      मुळात आरक्षणाची सुरुवात कोणी केली? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी?अज्जिबात नाही!,शाहु महाराजांनी?बिलकुल नाही.महात्मा फुलेंनी ?कदापि नाही.तर याची सुरुवात केली हिंदु धर्माचा शिल्पकार मनुने...! किती टक्के?तर १००%.ब्राम्हण,राजे,उच्चवर्णीय या सर्वांसाठी संपुर्ण आरक्षण होते.१००% राज्यसत्ता यांची,१००% धर्मसत्ता यांचीच,१००% शेतजमिनी यांच्याच ताब्यात,१००% व्यापार यांच्या तावडीत,१००% संपत्ती यांच्या मालकीची.असे सर्व अधिकार आणि संपत्ती याची मिरासदारी यांच्याकडे हजारो वर्षे होती.आणि बाकिचे लोक ईतके मागासलेले,ईतके अञानी राहीले कि त्यांच्या शेकडो पिढ्या तशाच राहील्या.त्यांना स्वाभिमान काय असतो,शिक्षण काय असते,मानवी मुल्ये काय,जगण्याचा हेतु काय ? हेच कळलं नाही.आणि याचा परिपाक असा झाली कि एकुण संपुर्ण जातीच्या जाती वंचित राहील्या.गुलाम बनल्या..!
    आर्थिक आधारावर आरक्षण मागने मुर्खपणाचे आहे.!आरक्षण हा गरीबा हटावचा कार्यक्रम नाही.(Reservation is not for the bread and butter,but it is for the participation in administration.policy making and decision making.आरक्षण हा भाजी भाकरीचा खेळ नाही.तर प्रशासनामध्ये सहभागासाठी आहे.योजना आणि निर्णय घेण्यामध्ये.आजचा गरीब उद्या श्रीमंत होउ शकतो तर आजचा श्रीमंत उद्या गरीब होउ शकतो.जे गरीब आहेत त्यांच्या उत्कर्षासाठी ईतर मार्ग आहेत.त्याच्यासाठी वेगळ्या रंगाचे रेशनकार्ड आहे,कमी किमतीत धान्य मिळते,सबसिड्या आहेत,जिवनदायी योजना आहेत,कमी उत्पन्नावर आधारीत शिष्यवृत्याही आहेत,अश्या अनेक योजना आहेत.आणि हवे असल्यास शासन आणखी राबवु शकतो.पण हे सर्व मागण्याचा मार्ग आरक्षण नाही.
     डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वाक्य येथे खुप काही सांगुन जाते." तुम्ही गरीब आहात म्हणुन अस्पृष्य नाही आहात तर तुम्ही अस्पृष्य आहात म्हणुन तुम्ही गरीब आहात.गरीब तर समाजात ब्राम्हणही असतो.कधी कोण त्याच्यावर अन्याय करण्याची हिम्मत करतो का? "म्हणुन आरक्षण हे व्यक्तीकेंद्री म्हणजे एका विशिष्ट माणसाला नाही तर एका विशिष्ट जातीला दिले आहे.काही मुर्ख म्हणतात कलेक्टरचा मुलगाही आरक्षण घेतो.अरे.! जातीची संपुर्ण टिम, लॉबी असते,एक वर गेला याचा अर्थ पुर्ण जात वर गेली असा त्याचा अर्थ होत नाही.माणुस कितीही मोठ्या पदाला गेला तरी अवहेलना येतेच वाट्याला येतेच.उदा.एखाद्या कार्यालयात जसे दलित असतात तसेच दलित्तेतरही असतात.एखादा फडके,बापट,साने,गोखले, चुकी करत असेल तर लोक त्या त्या व्यक्तीला दोष देतात पण एखादा,कांबळे,पडांगळे,वगैरे चुका करत असेल तर " ये साला जातही ऐंसा है .! " असं म्हणुन सरसकट संपुर्ण दलित  समाजाची निंदा केली जाते यामागे दडलेली जातीयतेची सुप्त भावना असते.म्हणुन गरीब श्रीमंत बनु शकतो.मात्र दलित कितीही मोठा बनु द्या तो दलितच राहतो.
      आर्थिक आधारावर आरक्षण हे दिलेलेच आहे ओबीसींनी.ओबीसीमध्ये साळी,कोळी,याचबरोबर माळी,कुणबी या शेतकरी जातीबरोबरच दैवेञ ब्राम्हण या उच्चवर्णीय जातीचासुद्धा समावेश आहे.ओबीसींना आरक्षणाचा निकष सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक मागासलेपण हा आहे.त्याला क्रिमीलियरची अट लावली आहे.कारण जर ओबीसींची सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक उत्थान झाले तर यांना वगळता येते.अशाप्रकारे उच्च जातीनाही आरक्षण दिले आहे.तरीही आरक्षणचा बैजो लोक वाजवत आहेत.एससी आणि एसटीचे निकष अस्पृष्यता आणि शोषण आहे.कारण ते कितीही मोठ्या पदावर गेले तरीही उच्चनिच्चतेची त्यांच्याद्दलची भावना जात नाही.
      लोक म्हणतात ते सर्व सोडा आरक्षण कधी संपणार? मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व.मग प्रतिनिधित्व संपायला पाहीजे का? लोक याच्या खोलवर जात नाहीत आणि नंतर मुर्खात निघतात.समजा १०० जागा आहेत भरायच्या नोकरीच्या.यामध्ये प्रत्येक जातीचे लोक यायला पाहीजे.पण दुदैवाने या पदावर दलितांची पदे भरली जात नाही.कारण उमेदरवार निवडणारेच उच्चवर्णीय असतात..!आणि म्हणुनच मागासलेल्या जाती आणखीनच मागास राहतात.
     दिल्लीत कँबीनेट सचिवांच्या ९६ पदे( posts) आहेत.यात sc किती तर १ फक्त एक?obc किती? तर ४म्हणजे उरलेल्या जागा उच्चवर्णीयांच्या ताब्यात!मग मली सांगा अनुशेष ( backlog) भरला जात नाही आणि वरुन म्हणतात आरक्षण बंद करा? अगोदर अनुशेष भरा मग बोला.
     काही माणसं(?) म्हणतात स्वातंत्र्याची एवढी वर्षे झाली तरी लोक आरक्षण घेतात.मात्र हे लेक तेव्हा जाणिवपुर्वक विसरतात कि एवढ्या वर्षांनीही हे लोक जातियता पाळतात.अन्याय-अत्याचारांच्या घटनांत घट होण्याऐवजी वाढच होत आहे.उत्तर प्रदेशमध्ये एका मागासवर्गीय मुलीची फक्त सावली पाण्यावर पडली म्हणुन तिला मारलं,नुकतचं लातरमध्ये शेतात चांगलं पिक आलं म्हणुन जनावरे घातली शेतात.विरोध केला तर मारहाण केली जबर,पी.एच.डी.करणारा हुशार विद्यार्थी रोहीत वेमुला याला त्रास देउन आत्महत्येस प्रवृत्त केले,एके ठिकाणी संपुर्ण मागासवर्गीय कुटुंबाला जाळलं ,निष्पाप मले बळी पडली,पंजाबमध्ये दलिताना ट्रँक्टरखाली चिरडुन मारले,फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्याची रिंगटोन म्हणुन शिर्डीत तरुणाला मारलं नंतर रिक्षा अंगावरु  नेली,रोज बहिष्कार घातले जात आहेत.शासन प्रशासन काही करत नाही.कारण त्यामध्ये यांचेच लोक असतात.!आणि म्हणुनच मोक्याच्या ठिकाणी बहुजनांनी,मागासवर्गीयांनी जायला हवे.म्हणुनच आहे आरक्षण.
      आरक्षण आपल्याच देशात नाही तर ईतरही देशात आहेत.अमेरिकेच्या अफेर्मेटिव अँक्शन पॉलिसीमध्ये श्वेत अमेरिकेनबरोबर अश्वेत अमेरिकन,ई.यांनाही प्रतिनिधित्वाची संधीची तरतुद केलेली आहे.आरक्षणाच्याबाबतीत नेहमीच गुणवत्तेचा बाउ केला जातो.जसकाही गुणवत्ता ही  मिरासदारी आहे.अरे.!जरी आरक्षण असलं तरी त्याला शिक्षण घ्यायलाच लागते.एखादी पोस्ट असली आणि आरक्षण आहे म्हणजे केणत्याही अडाणी माणसाला नाही निवडत.त्यालाही शिक्षण पुर्ण करावं लागतं.तोही त्याच शाळेत शिकतो ज्या शाळेत उच्चवर्णीय शिकतो,तोही तोच अभ्यास करतो जो उच्चवर्णीय करतो,त्यालाही तेच शिक्षक शिकवतात जे उच्चवर्णीयाला शिकवतात,तोही तिच परिक्षा देतो जो उच्चर्णीय देतो, पास होतो,मगच निवडला जातो.असे असुनही जर कोणी गुणवत्तेचा बाउ करत असेल तर ते बालिश आणि मुर्खपणाचे आहे असं मला वाटते.मेरिटचा प्रश्नच येत नाही.उदा.समजा घोड्यांची शर्यत चालु आहे.पण एक घोडा लंगडा आहे.तगड्या घोड्यांनी जाणिवपुर्व लंगडं केलं त्याला .मग कशी होणाल शर्यत?मेरीट माय फुट ! त्या घोड्याला रेषेच्या थोडं पुढे उभ करावं लागेल तरच शर्यत होईल खरी.यालाच म्हणतात आरक्षण.
     जाती नष्ट व्हायवा पाहीजे.तरच आरक्षण नष्ट होईल.आरक्षण हे जरी कृत्रिम असलं तरी एकप्रकारे त्याला नैसर्गिकच म्हणावे लागेल.कारण आरक्षणामुळे नैसर्गिक मानवी हक्क मिळतात.आरक्षण दुसरं तिसरं काहीच नसुन फक्त प्रतिनिधित्व्ची संधी आहे.आरक्षणामुळे देश मागे जात आहे अशी ओरड आरक्षणविरोधी लोक करतात.खरंतर आरकिषणामुळेच देश पुढे जात आहे.कारण त्या लोकांनाही संधी मिळत आहे जे लोक हजारो वर्षापासुन वंचित होते.देश कोणत्या गोष्टीमुळे मागे जात आहे तर जातियतेमुळे.
     आरक्षण हे ५०% पेक्षा जास्त नसते.म्हणजे यी देशातले ८५-९० % लोकांमधुन फक्त ५०% लोक निवडतील आणि उरलेल्या ५०% जागेवरती जे अल्पसंख्येने आहेत ते सर्व निवडतील..! अलिकडेच वाचणात आलं कि एससीच्या त्याच्याकडे संपुर्ण गुणवत्ता असुनही केवळ त्याने ओपनमधुन फॉर्म भरला आणि मुलाखतीमध्ये त्याला सांगितलं अस करता येणार नाही म्हणुन.बघा ही मानसिकता.
      रात्रच नाही दिवसही  तर प्रत्येक क्षण वैर्याचा आहे.प्रतिकारासाठी तयार रहा.आज आपल्या संरक्षणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाहीत.पण त्यांची शिकवन "  शिका ,संघटित व्हा,आणि संघर्ष करा" ही आपल्यासोबत आहे.याचा आपण प्रत्येकाने गांभीर्यपुर्वक अंगिकार केला पाहीजे.आजच्या सुशिक्षित तरुनांनी समाजात याविषयी जागरुकता निर्माण करायला हवी.लाचाराने नाही जगायला पाहीजे.आरक्षण हे कोणाच्या बापाने नव्हे तर सर्वांचा बाप डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात अंतर्भुत केले आहे.त्यांच्यामुळेच आपण आहोत.हे कायम लंक्षात ठेवायला पाहीजे.नाहीतर परत कमरेला झाडु आणि गड्यात मडकं...!

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

विशाल जाधव सर.
8286223097
 (Mumbai)

🔵🔷🔵🔷🔵🔷🔵🔷🔵
👆👆👆👆👆👆👆👆👆
वरील आरक्षणावरील विशाल सरांचा लेख  प्रत्येकाने वाचा. कधी वेळ आलीच जर त्या लोकांचे तोंड बंद करण्याची तर घाबरु नका.हिमतीने त्यांना सामोरे जा.......
🔵🔴🔷🔶🔶🔷🔴🔵

🎞अनुसूचित जाति मधे 125 जाती येतात.

🎞अनुसूचित जाति मधे 125 जाती येतात.

🎞यात बौद्ध समाज सोडून इतर जाती फुकट 13% आरक्षण चा लाभ घेत आहेत.

🎞लोक फक्त बौद्ध समाजाला टारगेट का करताता

✴मला प्रश्न पडला आहे कि, मागासवर्गीय अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा काय फक्त बौद्ध समाजालाच लागु होतो का ?

✴मागासवर्गीय / दलित म्हणजे बौद्धचं आहेत का ?

➡अक्षेर
➡अनमुक
➡आरेमाला
➡आरवा माला
➡बहना

➡बहाणा
➡भाकड
➡बंट
➡बलाही
➡बलाई

➡बंसोर
➡बुरुड
➡बांसोर
➡बासोंडी
➡बेंडाजंगम

➡बुडगाजंगम
➡बेडर
➡भांबी
➡भांभी
➡असादुरु

➡असोदि
➡चामडीया
➡चमार
➡चमारी
➡चांभार

➡चमगार
➡हरळ्या
➡हराळी
➡खालपा
➡माचीगार

➡मोचींगार
➡मादर
➡मादिग
➡मोची
➡तेलंगू मोची

➡कामाची मोची
➡राणीगार
➡रोहिदास
➡नोना
➡रामनामी

➡रोहित
➡समगार
➡सतनामी
➡सुरजबंशी
➡सलगारा

➡चर्मकार
➡परदेशी चर्मकार
➡भंगी
➡मेहतर
➡ओलगाना

➡रुखी
➡मलकाना
➡हलालखोर
➡लालबेगी
➡सुराज्यरामनाम

➡बाल्मीकी
➡करोर
➡झाड़गल्ली
➡कोरार
➡झाडमल्ली

➡हेल्ला
➡बिंदला
➡ब्यागरा
➡चलवादी
➡चन्नया

➡चेन्नदासर
➡होलया दासर
➡होलेया दसारी
➡डक्कल
➡डोकल्लवार

➡ढोर
➡कक्कया
➡कंक्कया
➡डेहोर
➡डोम

➡डुमार
➡येल्लमलवार
➡येल्लमलेवडलू
➡गंडा
➡गंडी

➡गरोडा
➡गारो
➡घासी
➡घासिया
➡हल्लीर

➡हलसार
➡हसलार
➡हुलसवार
➡हुसलवार
➡होलार

➡व्हला
➡होलय
➡होलेर
➡होलिया
➡होलेया

➡कैकाडी
➡कटिया
➡पथरिया
➡खंगार
➡कनेरा

➡मिरधा
➡खाटिक
➡चिकवा
➡चिकवी
➡कोलपुल वँडाळू

➡कोरी
➡लिंगडेर
➡मादगी
➡मेहरा
➡तराळ

➡धेगु-मेगू
➡माह्यावंशी
➡धेड
➡महार
➡वनकर

➡माला
➡माला दासरी
➡माल हन्नाई
➡माला जंगम
➡माला मस्ती

➡माला साले
➡नेटकानी
➡मालासन्यासी
➡मांग
➡मातंग

➡मिनीमादिग
➡दखनी मांग
➡मांग म्हशी
➡मदारी
➡गारुडी

➡राधेमांग
➡मांग गारोडी
➡मांग गारुडी
➡मत्रे
➡मस्ती

➡मेघवाल
➡मेंधवार
➡मिठा
➡अयलवार
➡मुक्री,

➡नाडीया
➡हादी
➡पासी
➡सांसी
➡शेणवा
➡चेनवा

➡सेडमा
➡रावत
➡चिंडोल्लू
➡सिंधोल्लू
➡तिरगार

➡तिरबंदा
➡तुरी

🎞इत्यादी जाती काय  सवर्ण आहेत का ?

🍀समजत जरी असले तर त्यांनी आरक्षण किंवा अन्य सवलती नाकाराव्यात.

🍀ही वरील मंडळी स्वतः जयभीम वाले किंवा आम्ही बौद्ध नाहीत हे मात्र छाती ठोक सांगतात

🍀जयभीम वाले ते नसून बौद्धचं फक्त जयभीम वाले आहेत हे मात्र इतरांना न चुकता ते सांगतात

🍀प्रत्येकवेळी आपणच का पेटून उठायचे ?

🛢रस्त्याची लढाई आपण रस्त्यावर उतरून करतो.

🛢आणि दुश्मनी फक्त बौद्ध घेतो व फायदे सर्व मागासवर्गीय / दलित फुकट फायदा घेतो

🍀समाजतील वरील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती १३% आरक्षणाचा फायदा घेतात.
----------------------------------------
याला एकच कारण आहे. ते म्हणजे या देशातला बौध्दच फक्त ब्राम्हणवादाला विरोध करतो.बाकी सर्व आजून त्यांच्या गुलामगिरीतच आहेत.त्यांना आजून आंबेडकरवाद आणि ब्राम्हणवाद समजलेला दिसत नाही.

जात नष्ट होत नाही तोवर ॲअट्रॉसिटी कायदा रहाणारच- राजकुमार बडोले

जात नष्ट होत नाही तोवर ॲअट्रॉसिटी कायदा रहाणारच- राजकुमार बडोले

सातारा दि. २६ (प्रतिनिधी) ः समाजातून जोवर जात नष्ट होत नाही तोवर  देशातून ॲऑट्रॉसिटीचा कायदा रद्द होणार नाही, हे माझेच म्हणणे नाही तर देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याचेही तेच म्हणणे आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर हा कायदा अधिक बळकट करून, पिडीताला नुकसान भरपाईची रक्कम साडे आठ लाख करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेऊन आपण अनुसूचित जातींच्या मागे भक्कमपणे असल्याचे सिध्द केले, असे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.

आज सातारा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या ऐतिहासिक श्री. छ. प्रतापसिंह हायस्कूल आणि भिमाई स्मारकाला  बडोले  यांनी भेट दिली. त्यानंतर येथील सर्किट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य जयंती निमित्त त्यांच्या जीवनाशी संबंधित पन्नास स्थाळांचे संवर्धन आणि विकास करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला असून यात या शाळेचा समावेश करण्यात आला  आहे. मात्र  ही इमारत हेरिटेजमध्ये समाविष्ट असल्याने वेगळे काही करता येणार नाही.  शाळेने किंवा जिल्हापरिषदेने कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, तरीही येथे सुसज्ज ग्रंथालय देणार असे त्यांनी सांगितले. सोबतच भिमाई स्मारकाच्या विकासाचाही समावेश करण्यात आलेला आहे, असेही बडोले म्हणाले.

आज सकाळी त्यांनी भिमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला भेट देऊन पाहणी केल्याचे सांगत सदरील जागेवरील अतिक्रमण लवकरच हटवले जाईल, डॉ. बाबासाहेब दरवर्षी एक जानेवारीला या विजयस्तंभाला आवर्जून उपस्थित रहात. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचाही विकास करण्यात येईल, असेही बडोले यावेळी म्हणाले.

राज्यात जात पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आली असून आवश्यक पदांना मंजूरीही मिळाली आहे. त्यामुळे आजवर ३६ समित्या स्थापन करण्यात आलेल्या असून त्यातील काही पदांमुळे कार्यरत झालेल्या नाहीत.  मात्र पूर्वीच्या पंधरा समित्या कार्यरत असून काही अपवाद वळगळता प्रत्येक जिल्ह्याला समिती आहे. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांची संख्याही बरीच कमी झालेली असल्याचे ते म्हणाले. यावेळी दैनिक सम्राटचे संपादक बबन कांबळे माजी आमदार डॉ. येळगावकर आदी उपस्थित होते.

..................................

Wednesday, 7 September 2016

🏃 चलो दिल्ली 🏃 🏃 चलो दिल्ली 🏃

🏃 चलो दिल्ली 🏃     🏃 चलो दिल्ली 🏃

✍🏻 भारत के दलितों जाग जाओ ! ✍🏻

✍🏻 1) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (RPI) 2) दलित शोषीत मुक्ती मंच ३) अखिल भारतीय केथ मजदूर युनियन ४) नॅशनल कॅम्पेन कॉन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ दलित राईट्स और अन्य तकरीबन २०० संघटन मिलकर मा. अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर जी के नेतृत्व मे भारतभर मे चल रहे दलित अन्याय और अत्याचारों के विरोध मे हो रहे आंदोलनों को संघटीत करके दिल्ली मे सांझा फ्रंट (United Front) तैय्यार किया जा रहा है, जिसका मुख्यालय (Headquarter) दिल्ली रहेगा ! और वही से देशभर मे आरएसएस और बिजेपी सरकार द्वारा दलितोंपर हो रहे अन्याय अत्याचार को रोकने का संघटीत प्रयास किया जाएगा ! जिसके लिए देश के तमाम राज्यों के दलित संघटनों से वार्तालाप आयोजकोद्वारा किया जा रहा है ! और आरएसएस और बिजेपी सरकार द्वारा दलितों पर किए जाने वाले अन्याय अत्याचारों का निषेध करने के लिए

16 सप्तेंबर 2016 को संसद मार्ग, नई दिल्ली मे धरना कार्यक्रम का आयोजन किया गया है !

✍🏻 अब वक्त आ चुका है की आरएसएस और बिजेपी के सांस्कृतिक राष्ट्रवाद का पुरजोर विरोध करके देश के तमाम मानवतावादी और परिवर्तनवादी लोगों के सामने सुरक्षित पर्याय उपलब्ध करके सामाजिक परिवर्तन के द्वितीय चरण का आगाज कराया जाना जरूरी है ! जिसके लिए 16 सप्तेंबर 2016 को नई दिल्ली मे संसद मार्ग पर धरना दिया जा रहा है !

✍🏻 भारत के सभी राज्यों के सभी दलित, समाजवादी, मॉर्क्सवादी, मानवतावादी और समविचारी लोगोंको और संघटनों को गुजारीश की जा रही है की सभी संघटन इस *धरना प्रदर्शन में सभी कार्यकर्ताओं के साथ सामिल हो जाए !* व्यक्तीगत स्वतंत्रता को कुचलकर लष्करशाही भाजप सरकार देश में अराजकता फैला रही है, जिसका विरोध करके देश मे असुरक्षितता महसूस करनेवाले सभी भारतीयों को सुरक्षितता प्रदान करना हमारा सभी का कर्तव्य है ! इसलिए लष्करशाही भाजप सरकार का विरोध किया जाए !

✍🏻 हम सभी संघटन, उनके प्रमुख, और कार्यकर्ताओंको गूजारीश करते है की आप सभी 16 सप्तेंबर २०१६ के धरना कार्यक्रम मे बडी संख्या मे शामिल हो जाए !

धरना कार्यक्रम स्थल :- संसद मार्ग, नई दिल्ली.

दिनांक :- 16 September 2016

प्रमुख उपस्थिती :- मा. अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर

🗣 धरना कार्यक्रम मे सामिल हो कर एक आवाज मे सब मिलकर कहे...

🗣 अब हम नही सहेंगे भाजप और आरएसएस की लष्करशाही सरकार की तानाशाही...
🗣 अब हम नही सहेंगे सांस्कृतिक राष्ट्रवाद के नाम पर चल रही तानाशाही...
🗣 अब हम नही सहेंगे देश में दलित और अल्पसंख्यक लोगों के उपर हो रहे अन्याय और अत्याचारों को...
🗣 अब हम देश के दलित हमारे उपर किसी तरह का अन्याय, अत्याचार होने नही देंगे, और न ही सहेंगे...
🗣 अब हम देश मे चल रहे दलित, अल्पसंख्यक वर्ग के उत्पीडन को मान्यता नही देंगे...
🗣 अब हम देश के दलित साथ में मिलकर एक आवाज मे कहेंगे...
     "भारत में भारतीयों को सुरक्षित करो, वरना दिल्ली का तख्त खाली करो..."

___समन्वयक___
अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर
#prakashambedkar
#support_to_protest_against_atrocity_at_delhi
___शब्दांकन____
_अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर...

" पैलवान जिवाजी महार "

" पैलवान जिवाजी महार "

उमरठ हे गाव तसं ३५० वर्षापूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे हे गाव.
गावात चारचौकी वाडा होता तान्हाजीरावांचा.


आज गावाची यात्रा भरली होती.गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती.


राजांची आणि तान्हाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची.मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.

आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची ,त्यांचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.


आणि त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे..हा हिरडस मावळातला ..वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल.

वास्तविक सर्वजन शिवाजी राजाना पाहायला जमणार होते, आणि का नाही जमणार.??
लेकीसुना, संत सज्जन ,गाइवसरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे .स्वराज्य आणले होते ..!

मैदान खचाखच भरले होते.लहान मोठ्या कुस्त्याला प्रारंभ झाला.

आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले.
राजीयानी पांढरा अंगरखा घातला होता..

कृष्णा घोडीवर स्वार होते,आणि कमरेला  तलवार बांधली होती..जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते.


राजे खाली उतरले ..

तान्हाजीराव आपल्या फौजेसह राजाना भेटायला वाटेतच थांबले होते.रजानी तान्हाजीरावना मिठी मारली.

तितक्यात खबर आली कि ,बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता .त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला .

वाघाने त्यांच्या पायाला जबर दुखापत केली.
मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने .


हे ऐकून मैदान शांत झाले.खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन मैल आले होते.

आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते

'' मंडळी,लखू बेराडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे.म्हणून तो आज लढू शकत नाही.


या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल.असेल तर समोर या.''


हि घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चीमेकडे कुजबुज सुरु झाली.


एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता.सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून.
राजे सर्व पाहत होते.


तितक्यात कोणतरी किंचाळला


''आरं आला रं जीवामहार आला ''
राजांनी चौकशी केली तान्हाजीरावान्पाशी ..
तान्हाजी म्हणाल..''राज ,ह्यो जिवाजी ,आपल्या हिकडचाच हाय,कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा.दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय ..याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होत..



निजामशाहीचा दंगा झाला तव ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला..तेनच याला तयार केलाय.""
राजांच्या चेहर्य्यावर एक तेज आले होते.


कुस्तीची सलामी झडली .


भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जीवाला नमवण्याचा प्रयत्न केला ,पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता.डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला.

भिकाजी ने उसन्या अवसानान पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला ,पण सावध जीवा ने फिरवून बाहेरची टांग लावली...भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.


सगळ प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले.जीवाला अक्षरश डोक्यावर घेवून नाचू लागले
तितक्यात शिंगे -करणे गरजू लागली ..खुद्द राजे येत होते,


पटापटा सर्व बाजूला झाले.
राजीयानी हासत हासत जीवाला मिठीच मारली..मनात काय राजकारण होते माहित नव्हते मात्र राजे जाम खुश झाले होते..
राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जीवाला बक्षीस दिले..आणि विचारले..


जीव काय करतोस ??
जीव उद्गारला ,'' काय नाय वरातीत पट्टा फिरवतो..दंगलीत कुस्त्या खेळतो''



राजे हसले आणि म्हणाले ..''येशील आमच्या सोबत ...!!
पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमान्च्यासोबत..!!
आहे कबुल ..??

जीवा हासला...होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला.


आणि हाच तो जीवाजीराजे महार ज्याने अफजलखानाच्या अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
  आज जिवाजी महार यांची  ३०६ वी  पुण्यतीथी. जिवाजी महार यांच्या पराक्रमास मानाचा मुजरा ...!!!  

म्हणतात ना होता जीवा,
 म्हणून वाचला शिवा....                                                                    
🙏 जय जिवाजी जय शिवाजी asha aahe maza shivaji aani tyach mavale....

माजी न्यायमूर्तींचे भाषण रोखणाऱ्या दीडदमडीच्या मनुवादी विचारसरणीच्या गुंडांचा जाहीर निषेद!!

माजी न्यायमूर्तींचे  भाषण रोखणाऱ्या दीडदमडीच्या मनुवादी विचारसरणीच्या गुंडांचा जाहीर निषेद!!
-------------------------
आदरणीय कोळसे पाटील यांनी एबीपी माझा वरून मराठ्यातील दिशाभूल करणाऱ्या लोकांच्या विरोधात प्रखर भूमिका मांडली होती. बी. जी. कोळसे पाटील हे एकमेव बहुजनवादी मराठा आहेत कि ज्यांनी आपली भूमिका आंबेडकरवादी असल्याचे दाखवून दिले आहे. आज पुण्यात मराठा मोर्चा संदर्भातील बैठकीत त्यांचे भाषण रोखण्यात आले. हे भाषण रोखणारे मनुवादी आरएसएस वादी व शरद पवारांचे चमचे आहेत. शरद पवार आणि मोहन भागवतचे सुपारी घेतलेले गुंड आहेत.
आदरणीय कोळसे पाटील यांच्या सारखे भरपूर पुरोगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते आहेत ज्यांची भूमिका ऍट्रॉसिटी विरोधात नाही. त्यांची भूमिका कित्येक वर्ष सरकारमध्ये राहून महाराष्ट्र लुटून खणाराच्या विरोधात आहे. पण त्यांनाही या मनुवादी आतंकवादाची भीती वाटत आहे. त्यामुळे उघड-उघड भूमिका मांडायला कोणी तयार नाही.
अजित पवार, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी हजारो कोटी रुपये भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला या संदर्भात कोणी बोलले तर त्यांचे भाषण रोखण्यात येते, सहकरसम्राट, कारखानदार, जिल्हा बँक लुटणारे चोर, शैक्षणिक संस्था चालवणारे भामटे कोण आहेत याबद्दल कोणी बोलले तर त्यांना वेगळे करण्यात येते. "चोर आणि वरून शिरजोर" अशी अवस्था झाली आहे. त्याच्याच विरोधात बी. जी. कोळसे पाटील बोलत आहेत. काही विचारसरणी जाणीवपूर्वक दलित - मराठा अशा वाद निर्माण करून महाराष्ट्रात दंगली घडून आणण्याचे काम करत आहे.
हा डाव हणून पाडण्यासाठी बी. जी. कोळसे पाटील यांच्या सारख्या तमाम पुरोगामी बहुजन विचारसरणीच्या नेत्यांमागे, तरुणांमागे आंबेडकरवादी जनता उभी आहे.
आदरणीय न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आम्ही आपल्या पाठीशी आहोत आपण प्रखरपणे आपली भूमिका मांडली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. सगळेच मराठे एकसारखे नसतात हे आपण दाखून दिले. खरा  गुंड ओळखुन त्याला झोडून काढणारा मराठा तरुण निर्माण होऊन त्यांनी बहुजनाच्या मूलभूत प्रश्नावर लढा आपण सगळ्याने मिळून लढावं हीच अपेक्षा...!!!

- दीपक केदार
पॅन्थर सेना महाराष्ट्र प्रमुख
९९२३२४५०१०

न्या . बि . जी . कोळसे पाटिल.⚡⚡⚡⚡ "माझ्या मराठा बहिणी-भावांनो,कृपया काळजीपूर्वक वाचा व पटलं तर सर्वाधिक शेअर करा"

न्या . बि . जी . कोळसे पाटिल.⚡⚡⚡⚡
"माझ्या मराठा बहिणी-भावांनो,कृपया काळजीपूर्वक वाचा व पटलं तर सर्वाधिक शेअर करा"
सर्वसमावेशक आपली मराठा जात संघटित होत आहे,ही फारच चांगली गोष्ट आहे.प्रत्येंक जातीनें, जातीयता अस्तित्वांत असें पर्यंत,आपापल्या जातीच्या विकासासाठी संघटन करण्यांत कांहीच ग़ैर नाही.मुठभर मराठा नेत्यांनीच, त्यांच्याच घरांत कायम सत्ता असावी या लोभानें,आपणां सर्वांना संघटित होऊ दिलं नाही.आणि ते आपली दररोज मान कांपतांत हे माहिती असून देखील आपण त्यांचाच वर्षानुवर्षें जयजयकार करण्यांत धन्यता मानली.याचे आज आम्ही पूर्ण व कायम भान ठेवूंन व पुन्हां फसवणूक होऊं देणार नाही,अशी खबरदारी घेतलीच पाहिजें.मात्र आम्ही संघटित होतांना दुसरी कुठलीही जात सुध्दां शत्रु करून घेतां कामा नये.आपल्या मागण्यां देखील संविधानाच्याच चौकटींतच असाव्यांत, नाहीतर आंदोलनें फ़ेल होतांत व समाज नाराज़ होतो.आम्ही,न्या सावंत पी.बी. यांच्या मार्गदर्शनाखालीच,आपल्या या मागण्यावरही वेळो वेळी राज्यसरकारला सल्ले दिलेले आहेंत.प्रश्न सुटण्यासारखेच आहेंत.पण आम्हाला नेहमी आमचे नेतेच मोठ्ठे वाटले व आम्ही त्यांच्याच मागे लागून समाजाचे अपरिमित नुक़सान करून घेतलेले आहे. उदा: हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी,पण संविधान विरोधी आंदोलनासारखें, देशांत भयानक अराजक माजवूंन चालणार नाही,ती संघाची खेळी होती.हे कदाचित अण्णांला देखील माहिती नसेल.अण्णा स्वत:प्रधानमंत्री झाले तरी ते मांगत होते तसा"जनलोकपाल"अस्तित्वांत आणणें शक्य नव्हतें कारण ती त्यांची मागणी देशाला लोकशाही कडून हुकूमशाहीकडे नेणारी व संविधानविरोधीच होती.आम्हा सर्व भारतीयांचा प्रमुख शत्रु,संघाला नेमकं श्रमिकांत विभागणी हवी असते व तीच खरी संघाची ताक़त असतें.देशभर ज्या ज्या जाती संख्येंनें जास्त आहेत,त्या डोईजड होऊंच नयेंत म्हणून संघ त्या त्या अल्पसंख्यांक जातींना हाताशी धरून,ती जात संपविण्यांत संघ यशस्वी होत आहे.सर्व श्रमिक संघटित होऊच नयेंत हेच संघाचे कायम ध्येय राहिलेले आहे. सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचा देखील अभ्यास करा म्हणजें काय दिसते?तर ते कसें मराठा विरोधी आहे.आमच्या दैवतांची,छ.शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजामातेची बदनामी करणारा त्या हरामखोर,नीच,कपटी,क्रुर पुरंदरेल मुद्दाम,केवळ मराठ्यांना डिवचण्यासाठीच,महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणारे आमचे उद्दाम,माजलेले मुख्यमंत्री बघा.त्यांची दररोजची आम्हांला संपविणारी कपटी, धोरणात्मक वाटचाल बघा.तशी या ब्राम्हण्यवादी व्यवस्थेनें आमची अनेंक वर्षें, मराठा म्हणजें  खलनायक,रांगडा,मागासलेल्या विचारांचा,अडाणी, अशिक्षित, सत्तालोलूप नीतीहीन,शीलहिन, बलत्कारी इ.इ.अनेंक विशेषणें लावून बदनाम केलं.अन्न, वस्र, निवारा,आरोग्य व शिक्षणांपासून वंचित ठेवलं.आमचा सर्वांर्थानें कोंडमाराच केला व रात्रंदिवस अवहेलनाही केली."बलत्काराचा गुन्हां कुठल्याही जाती-धर्मांतील आरोपींनी, कुठल्याही जाती-धर्मांतील स्रीवर केला तर त्याविरुध्द देखील सर्व जाती-धर्मांतील समाजानें सर्व ताकतिनिशी उठलंच पाहिजें व त्याचा निषेधही केलाच पाहिजें.याबद्दल कुणाचंही दुमत असूंच शकत नाही."हा सर्व उद्रेक आतां या शिस्तबध्द,शांतता,संयमपूर्व आंदोलनानें बाहेर पड़त आहे.ही देखील फार अभिमानाची गोष्ट आहें.
मराठा बहिणी-भावांनो एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षांत ठेवा की,भारत देशांत एकाच जातीची एवढी मोठ्ठी संख्या असणारी आपलीच मराठा ही एकमेव जात आहें,या संख्येंचा आपण सदुपयोग करूं या.छ.शिवाजी,संभाजी,शाहू,सयाजीराव यांचा आदर्श समोर ठेऊन सर्वजाती धर्मांच्या बहिणी-भावांना बरोबर घेऊन, अगदी आईच्या मायेनें किंवा थोरल्या भावांच्या भूमिकेंतूनच व आपण सत्ताधारी म्हणून,सर्वांचे एकसंघ संघटन करूं.सर्व जाती-धर्मांतील बहिण-भावांना त्यांचे  आमचे सध्याच्या व्यवस्थेचे गुलाम नेत्यांना बांजूला ठेऊन, त्यांना संघटित करूं या.एक खरे धरमनिरपेक्ष,जातीनिरपेक्ष आमचे मित्र मधु लिमये,नेहमी आम्हाला सांगत की,"कोळसेपाटील,मी सर्व देशांचा इतिहास-भूगोल जाणतो,मला मराठ्यांइतकी,सर्वसमावेशक व नेतृत्वगुण असणारी जात,भारतांत दुसरी कुठली दिसली नाही व एकाच जातीची एवढीं मोठ्ठी संख्या असणारी जात देखील दुसरी कुठली देशांत दिसली नाही.फक्त तुमच्या अप्रामाणिक व विश्वास घातकी नेतृत्वानें तुमच्या जातीला बदनाम केलेले आहे."मित्रांनो खरोखरच १९७८ सालांत ज्यादिवशी आमच्या एका नेत्यांनें वसंतदादांचा विश्वासघात करून, जनसंघासारख्या अत्यंत विषारी, कपटी विचारांच्या पक्षां बरोबर सरकार केलं,तो दिवस पुरोगामी महाराष्ट्रच्या स्वच्छ राजकारणातील काळाकुट्ट दिवस होय.केवळ त्यामुळे त्या नेत्याची व मराठ्यांची भारतीय राजकारणांतील विश्वासहर्तता संपली व ते कर्तबगार पण विश्वास घातकी नेतृत्वही संपले.हा कलंक आता आम्हां सर्वांनाच धुवून काढावाच आहे व मराठा या देशाचे सक्षमपणें नेतृत्व करूं शकतो हे सिध्द करावयाचे आहें.हे लक्षांत ठेवा.परंतु हे सर्व करतांना कुठल्याही इतर जातींचा द्वेष करूं नका,तरच ही देशपातळीवरील आमची ही उड़ी १००% शक्य होईल याची आम्हाला खात्री आहें.

जातीयवाद..आता धुरळा तर उडणारच...

जातीयवाद..आता धुरळा तर उडणारच...
आजकाल कोपर्डी प्रकरणाचे निमित्त लावून मराठा मुक मोर्चा निघताहेत. खरोखरच त्या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चे, आंदोलने झालीच पाहिजेत. त्या पिडीत मुलीच्या कुटूंबियांना न्याय मिळालाच पाहिजे पण लोकशाहीने मोर्चे आंदोलने काढण्याचा अधिकार दिला म्हणजे असे नाही की आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या खचलेल्या पिचलेल्या धनगर आणि दलित समाजाचे घटनेनं दिलेले अधिकार हिसकावून घ्यायची ही तुमची भाषा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची नसून घरात बसून शतरंजचा (Chess) खेळ खेळणाऱ्या मराठा समाजाच्या नेत्यांची ही चाल आहे. त्याचे कारण असे की कधी नव्हे इतिहासांत पहिल्यांदाच धनगर समाजातील दोन नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर दलित समाजातील एक कॅबिनेट मंत्री झाला  शिवाय भारताच्या इतिहासांत पहिल्यांदाच धनगर समाजाचा एक खासदार राज्यसभेवर गेला म्हणून त्या घरात बसलेल्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागले. मग वजीरांना (बिनडोक मराठा अभ्यासक ज्याच्याशी फोनवरून माझे बोलणे झाले होते त्यांना) सांगून प्याद्यांना रस्त्यावर उतरवून दलित समाजाचा अधिकार असलेल्या ॲट्राॅसिटी कायद्याचे हक्क रद्द करण्याची मागणी म्हणजेच शिवरायांच्या राज्यात केलेला जातीयवाद आहे हे विसरू नका. जर या ॲट्राॅसिटी कायद्याचा कोणी गैरवापर करत असेल तर संबंधितांना शिक्षा आणि दंड करण्याची तरतूद जरूर केली पाहिजे कारण जर कोणी या कायद्याचे उल्लंघन करत असेल तर होणाऱ्या शिक्षेस त्याला पात्र राहावे लागेल. ॲट्राॅसिटी रद्द करून सर्व आदीवाशी व दलिंतांवर टांगती तलवार ठेवू नका. शिवाय त्या मराठा अभ्यासकाबरोबर (???) माझी बाचाबाचीही झाली कारण तो म्हणत होता की धनगर समाजाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळावे म्हणून धनगर समाज अनुसुचित जमातीचे म्हणजेच आदीवाशींचे आरक्षण मागतोय ही त्या बिनडोकने केलेली बिनबुडाची भाषा होती. पुढे तो हे पण म्हणाला की या लढाईमद्ये आदीवाशींच्या बाजूने मराठा समाज ठामपणे उभे राहणार असून धनगर समाजाच्या आरक्षणाला आम्ही विरोध करू. पण मराठा समाजातल्या कोणत्याही नेत्यांना जाऊन विचारा की बाबांनो मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता तेव्हा धनगर समाज तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता आणि आजही मराठा समाजाच्या पाठीशी ठाम आहे. मग आम्ही आमच्या हक्काचे मागतोय जे आम्हाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत दिले आहे. त्या अनुसुचित जमातीच्या सवलतींचा अंमल झाला नाही त्या सवलती आम्हाला लवकरात लवकर लागू केल्या तर धनगर समाजाच्या पुढच्या पीढीवर अन्याय सहन करायची वेळ येणार नाही. आम्हाला ॲट्राॅसिटीचे संरक्षण मिळायला पाहिजे म्हणून आम्ही आरक्षण मागतोय यातला विषय नाही. अरे तुम्ही "ख्वाडा" चित्रपट पाहिलाच असेल जातीवरून शिवीगाळ केली किंवा अन्याय केला तर आम्ही काय करू शकतो ते त्या चित्रपटाच्या माध्यमातून शिकून घ्या. एकतर आजपर्यंत मी मराठा समाजाच्या नव्हे तर कोणत्याच समाजाच्या विरोधात बोललो नव्हतो कारण माझा मित्रपरिवार हा मराठा समाजातील सुद्धा आहे त्यामुळे मी लिहलंही नव्हते पण तुमच्याच मराठा समाजातले बिनडोक अभ्यासक मला लिहायला भाग पाडताहेत. पुढे त्या मराठा समाजाचे अभ्यासक मला म्हणतात की धनगर समाजातील नेत्यांना जातीचा फायदा करून घ्यायची सवय आहे म्हणूनच धनगर समाजाच्या नेत्यांना खासदार व मंत्रीपद दिले जाते. मग मराठा समाजाचे अभ्यासक म्हणवून घेणाऱ्या बिनआकलेच्या कांद्यांनो आजपर्यंतचा इतिहास काढून बघा महाराष्ट्र राज्याचे जेवढे मुख्यमंत्री झाले त्यातील एक-दोन सोडले तर सर्वच मराठा समाजाचे होते मग बाकीच्या खात्यात मराठा समाजाचे कीती मंत्री होते याचा आकडा तुम्हीच काढा मग सांगा की महाराष्ट्र राज्यात जातीयवाद कोणी केला?? आज जरी तुमच्या (जातीयवादी) नेत्यांनी घरात बसून शतरंजचा खेळ मांडला असेल तर मांडू द्या कारण आम्ही पण शतरंजच्या खेळात माहीर आहोत. कोण कशी चाल करतोय याची खबर ना खबर आम्हाला असते. कारण जगजेत्या सिकंदराला पराभूत करणाऱ्या आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य , राजा सम्राट अशोक, थोरले मल्हारराव होळकर , राष्ट्रमाता अहिल्याई होळकर, अजिंक्यवीर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या जमातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी आहोत आणि स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या नादाला लागू नका. नाद केला तर बाद करायला आम्हाला वेळ लागणार नाही. आज तुम्ही कोपर्डीच्या प्रकरणाचे निमित्त लावून जरूर एकत्रित या कारण लोकशाहीने तुम्हा-आम्हाला अधिकार दिला आहे पण आमच्या विरोधात जर तुम्ही आमच्या दलित बांधवाचे व धनगर समाजाचे हक्क हिसकावून घेऊ पाहू इच्छित असाल तर माझा एक धनगर समाजबांधव उद्या रस्त्यावर उतरू शकतो हे लक्षात ठेवा.
आजपर्यंत माझा धनगर समाज आणि दलित समाज मराठा समाजातील नेत्यांच्या मागे-पुढे करत होता आजही धनगर समाजाचे नेते मराठा समाजाच्या समाजातील नेत्यांची चमचेगीरी, हुजरेगीरी करत आहेत पण आता इथून पुढे ते शक्य नाही. पण बांधवांनो मराठा समाजातील नेत्यांनी प्यादे रस्त्यावर उतरवून स्वता घरात बसून वजीरांच्या साह्याने धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात चाल खेळली, दलित समाजाची ॲट्राॅसिटी काढून घेण्यासाठी चाल खेळली पण ही चाल खेळून त्यांचाच म्हणजेच मराठा समाजातील नेत्यांच्याच पराभव झाला त्यामुळे तुम्ही आम्ही जिंकलो आहोत. पण आता इथून पुढे षंढ बसू नका प्रस्तापित यंत्रणा जातीयवाद करत तुमच्या आमच्या विरोधात आवाज उठवत आहेत मग डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणेच "थंड राहून षंढ बसण्यापेक्षा अन्यायाविरोधात बंड करून गुंड झालेलं बरं" या सल्ल्याप्रमाणे बंड करायला पुढे यावे नाहीतर त्या गोडबोल्या औलादी सुखाने जगू देणार नाहीत. बांधवांनो ज्याप्रमाणे मराठा समाज गट-तट, पक्षभेद, संघटना भेद बाजूला ठेवून एकत्रित येत असेल तर मग तुम्ही-आम्ही सुद्धा पक्षभेद, मनभेद, मतभेद, गट-तट बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात बंड करायला पुढे यावं हीच नम्र विनंती.
टीप:- आम्हाला पण काय काम-धाम नाही म्हणून मराठा-धनगर वाद आम्ही पेटवतोय असे काही नाहीये. तर मराठा समाजातील बिनडोक (अभ्यासक??) लोक जातीयवाद पेटवताहेत आणि  जातीयवादाला चालना देत आहेत. त्यांना अगोदर सुधारा कारण धनगर समाज ही एक आग आहे आग आणि या आगीबरोबर खेळल्यावर भडाकाच होणार आणि उडणार नुसता धुरळाच आणि पडणार ती म्हणजे राख विषय संपला.
जय मल्हार। जय अहिल्या।। जय यशवंत।।
 जय भीम।। जय ज्योती।। जय शिवराय।।
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com