Thursday, 30 June 2016

पण इथून पुढे जय भीम मात्र करू नकोस !!!!

पण इथून पुढे जय भीम मात्र करू नकोस !!!!
हा video कोणी तयार केला आहे माहित नाही पण मस्त आहे नक्की पहा .

Wednesday, 29 June 2016

Give missed call to connect International Buddhism Festival


दादार आजचा मोर्चा यशस्वी जवळपास 15000 हजार भिमसैनिकांनी !

दादार कालचा मोर्चा यशस्वी
जवळपास 15000 हजार भिमसैनिकांनी !⭕⭕⭕
दिली सलामी //// मोठ्या प्रमाणात दादार ///
बंद संपूर्ण दादार परिसर सुनसान //
जय भिमराव// जय भिमराव
जय भीम // जय बाबासाहेब🙏🙏🙏

डॉ. आंबेडकरांची वास्तू जशी उद्ध्वस्त केली तशीच म गांधी, सरदार पटेल, बाळ गंगाधर टिळक यांच्या पण वास्तू उद्ध्वस्त करून तेथे नवीन अत्याधुनिक गगनचुंबी स्मारक बांधणार काय???

डॉ. आंबेडकरांची वास्तू जशी उद्ध्वस्त केली तशीच म गांधी, सरदार पटेल, बाळ गंगाधर टिळक यांच्या पण वास्तू उद्ध्वस्त करून तेथे नवीन अत्याधुनिक गगनचुंबी स्मारक बांधणार काय???
मूळ वास्तू हेरिटेज म्हणून जतन करायचे असते, ते उद्ध्वस्त करायचे नसते किंवा ते उद्ध्वस्त करून नवीन बांधायचे नसते. दिल्ली अलीपुर स्थित डॉ.आंबेडकर यांचे निवास्थान जेथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले ते, दादर स्थित डॉ. आंबेडकर यांचे निवासस्थान व प्रेस जमीनदोस्त करून डॉ.आंबेडकर यांच्या स्मृती मिटवून डॉ. आंबेडकरकर यांच्या अनुयायींच्या भावनांशी खेळणे तर सुरु केलेले नाही??
नव्या वास्तूशी तो जिव्हाळा ती आपुलकी कोठून येईल?
गौतम नागवंशी

आपण आंबेडकरवादी लोक म्हणतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन मधील वास्तव्य केलेली वास्तू ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करायची.

आपण आंबेडकरवादी लोक म्हणतो की
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी   लंडन मधील वास्तव्य केलेली वास्तू  ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन करायची.

पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी   मुंबई  मधील वास्तव्य केलेली वास्तू चळवळीचे  प्रमुख केंद्र असलेली बुद्ध  भूषण  प्रेस व आंबेडकर भवन या ऐतिहासिक वास्तू जतन न  करता पाडून टाकायची.

यावर आंबेडकरवादी लोकांनी काय
केले  पाहिजे ....आता तरी विचार करून योग्य निर्णय घ्याला हवा.

(संदर्भ झी न्युज २४ तास चर्चा दी.२८.०६.२०१६)..🔥🔥🔥 रत्नाकर गायकवाड कुठे पांग फेडशील रे; ह्याच समाजानी तुला घडवीला; वीसरु नको🔥🔥🔥🔥

(संदर्भ झी न्युज २४ तास चर्चा दी.२८.०६.२०१६)..🔥🔥🔥 रत्नाकर गायकवाड कुठे पांग फेडशील रे; ह्याच समाजानी तुला घडवीला; वीसरु नको🔥🔥🔥🔥

आत्ताच झी न्युज २४ तास वरील आंबेडकर भवनासंदर्भातली चर्चा ऐकली; व रत्नाकर गायकवाडांची प्रतीक्रीया व त्याला सपोर्ट करनारी बीजेपी ची दलाल झी न्युज यांचा फास जवळुन बघीतला... मन छीन्नबीछीन्न; सुन्न-सुन्न झालंय..."

चर्चेत आनंदराज आंबेडकर; अर्जुन डांगे; न्यायमुर्ती कोळसे पाटील व गायकवाड ही व्यक्ती समावीष्ट होती..

चर्चा सुरु असतांना गायकवाड नी आल्या आल्या "आंबेडकर भवन हे गुंडाचे आश्रयस्थान आहे" अश्या शब्दात सरसकट आंबेडकरी चळवळीचा अपमान केला..

अ.अरे ज्या ईमारतीला बाबासाहेबांनी स्वताच्या पैश्याने स्वकष्टाने सामाजीक प्रभोधनासाठी नीर्मान केली;

ब. ज्या ईमारतीत दलीतांची; शोषीतांची चळवळ ऊभी राहीली..

क. पैश्यांने जागा कीरायाने घेन्यास गरीब; असमर्थ पन ईमानदार आंबेडकरी कार्यकर्तांना; सामाजीक संघटनांना; राजकीय पार्ट्यांना फार शुल्लक पैश्यात कींबहुना बंहुतांश वेळी मोफत ईमारतीमध्दील हॉल देन्यात येऊन चळवळीला बळकट देन्याचे काम भुतकाळात करन्यात आले.

ड. जी ईमारत रीपब्लीकन मोव्हमेंन्ट चा प्रवास असो की दलीत पँन्थर चा गजर; की मास मोव्हमेन्ट चा यलगार की मुंबईतुन देशभरात रोवल्या जानार्या आंबेडकरी संघटना असो त्याचा साक्षीदार राहीला आहे. मोठे मोठे नीर्नय भवनातुन नींघुन ते भारतवर्षात अमलात आनले गेलेले आहेत..

५. ह्याच ईमारतीत झालेल्या हजारो संभामध्दुन दादासाहेब गायकवाड; बँरास्टर खोब्रागडे; राजा ढाले; नामदेव ढसाळ; जे.व्ही पवार; प्रकाश आंबेडकर; रामदास आठवले; अरुन कांबळे; भाई संघारे; अर्जुन डांगे व अशी कीतीतरी शेकडो आंबेडकरी चेहरे तयार झाले; प्रगल्भ झाले व समाजात रुजले..

आणी..आणी हा बीकाऊ नौकरशहा ज्याचा स्वभाव व क्रुतीवरुन आंबेडकरी चळवळीला बदनाम करुन बाद करन्याचा डाव दीसुन येतो.. "येवढ्या घानेरड्या शब्दात बांबासाहेबांचा वास्तुलाच डाग लावतोय" हे फार वेदना दायक आहे.."

महत्वाचे म्हनजे झी न्युज वरील संपुर्ण चर्चा ही सुनीयोजीत रीत्या वीषयाला भरकटवीनारी व आंबेडकरी समाजात संब्रम नीर्मान करनारी वाटत होती..!! गायकवाडच्या स्पीकरचा वॉलुम जानुनबुजुन जास्त केलेला होता.. तो जेव्हा बोलत होता तेव्हा आंनदराज; डांगे व कोळसे पाटील यांचा आवाज वारंवार मुट करन्यात आला. जनु फक्त गायकवाडचाच आवाज जनतेपर्यंत जावा हाच हेतु चँनल बाळगुन आहे की काय याची स्पष्ट प्रचीती होत होती...!!

या ऊलट जेव्हा जेव्हा आंनदराज; डांगे व पाटील यांनी खरी भुमीका मांडन्याचा प्रयत्न केला त्यांना गायकवाडनी मध्दात जोरात जोरात ओरडुन डीस्टर्ब केले व त्यावेळी झी न्युज ने ते घडु दीलं. गायकवाड चा स्पीकर म्युट केला नाही..!! दादागीरी तर ही की प्रवक्ताने/ एन्करने खरी परीस्थीती सांगत असतांना त्या पासुन गायकवाड वगळता ईतरांना पराव्रुत्त केले व नेमके सत्य काय? हे लोकांसमोर येन्यापासुन हेतुपुरस्सर मज्जाव केला..!!

न्युज वर गायकवाडाला सुसाट सोडल्यामुळे जो आपल्या समाजवीघातक क्रुतीला जस्टीफाय करु शकत नसतांनाही व कोनत्याही प्रश्णाचे ज्याचाकडे ऊत्तर नसतांनाही; तो  कुठले ते पञ घेऊन आंबेडकरी घरान्याला संपुर्ण मीडीयावर बदनाम करन्या़चा प्रयत्न करु लागला..

अरे आंबेडकरांच्या घरान्यावीषयी एवढी गरड ओकन्याची ब्राम्हनशाहीची हीम्मत झाली नाही आणी तु समाजकंठका दुश्मनांच्या अस्तीनात राहुन वीष ओकायला लागलास..!!

खरचं गायकवाड ची वागनुक बघुन व आंबेडकरी समाजावीषयी व चळवळीवीषयी त्याचा मनात असलेला अनादर पाहुन मनं व्याकुळ झालं...

हे अशे आपल्या समाजाचे वॉईट कॉलर्ड ज्यांना समाजाच्या भावनांची; आंबेडकरी चळवळीची; नीळ्या अस्मीतेची तीळभर सुध्दा कदर नाही ही लोकं ज्यांनी साध्या एक आंदोलनात कधी सहभाग घेतला नाही; ही..ही.. चळवळ बांधतील ..ईमारत बांधुन.. !! जे चळवळीलाच मरनाचीत्त करुन ईमारतीचे स्वप्ण भोळ्या बाभळ्या जनतेला दाखऊन " आंबेडकरी चळवळीचे स्मारक" बांधु ईच्छीतात..!!??!!

आंबेडकरी चळवळीला डाग लावन्यार्या व बीजेपी आनी वर्तमान प्रशासनाच्या ओंझळीने पाणी पीनार्या गायकवाडाने चळवळीच्या बालकील्याला गुंडाचे आश्रयस्थान म्हनुण आपला डीएनए ब्राम्हनशाहीच्या ऊदरातुन समाजाची अस्मीता वीकुन स्व:तात संचारऊन/ईंन्जेक्ट करुन घेतला आहे यात काही शंका ऊरलेली नाही त्याची वागनुक बघुन...!!

अरे.. कुठं फेडशील हे पांग; ह्याच समाजानी तुला घडवीला; वीसरु नको..!!व जर वेळ आली तर तुझ्या सारख्या बईमान शञुला समाज तुझी जागा दाखवील्याशीवाय राहनार नाही..!! ध्यानात ठेवं...!!
---- एकच म्हनावस वाटंत---- की तु गायकवाड... आंबेडकरांची औलाद होऊच शकत नाही.. ती तुझी लायकी नाही...!!

ऊपरोक्त कारनामुळे रत्नाकर गायकवाड व झी न्युज यांचा जाहीर नीषेध...

नीस्वार्थ आंबेडकरी कार्यकर्ता...
(Forwarded post)

Monday, 27 June 2016

"रिपब्लिकन चळचळीच महाराष्ट्रातल केन्द्र उध्वस्त-समाज मात्र कृतघ्नच"

"रिपब्लिकन चळचळीच महाराष्ट्रातल केन्द्र उध्वस्त-समाज मात्र कृतघ्नच"
आजवर रिपब्लिकन चळचळीच्या वेळोवेळी भुमीका जिथून देशभरात जात होत्या,हजारो बैठका मधून रिपब्लिकन चळचळीला याच भुमीतुन नवि दिशा मिळत होती तेच ‪#‎आंबेडकर‬भवन आज अस्ताव्यस्त अवस्थेत पाहण्याचा षंढपणा करणारा करणारा समाज कृतघ्नच ना ??? बाबासाहेबाच्या चळचळ उभारनित मुद्रित शिदोरी पुरवणारी बुद्धभुषण प्रिटींग प्रेस आज भग्न झाली आहे सोबतच भारतीय बौद्ध महासभा,रिपब्लिकन सेना,भारिप बहुजन महासंघ यांचे कार्यालय देखील काल रात्री 2:30 वाजता बेकायदा रित्या जातीयवाद्यांची दलाली करणार्याचा हस्तक रत्नाकर गायकवाड याने खाजगी गुंड व जेसीबी लावून जमिन दोस्त केली वर्षानुवर्षे आंबेडकरी जनतेला मुंबईत आधार वाटणारे आंबेडकर भवन आता सत्ताधारी व दलालांच्या पोटपाण्यासाठी नेस्त नाबुत झाल्याचं पाहण्याची नामुष्की आज आपल्यावर ओढावली आहे.आंबेडकर भवनाशी नाते असणारे आज प्रचंड अस्वस्थ झालेत,परंतु ज्यांना आंबेडकर भवन,राजगृह कोणत्या दिशेला आहे हे माहित नसणारे घरात बसुन पुढच्या घटनेची वाट पहात आहेत.
आज आंबेडकर भवन उद्या औरंगाबाद,महाड,पुणे यांच्यासह देशातील अनेक स्फुर्ती स्थळं आपल्या कृतघ्नते मुळे लयास जातील पण आपल्याला त्याच काय???उद्या राजगृहातले उपरे 'राजगृहा' वर देखील डोळा ठेवतील...
एखाद्या वस्तीवर शासनाची नजर पडली,एखाद्या पेपर टायगर नेत्यांच्या अतिक्रमणावर बडगा आला,कारवाईत घरे गेली की निळे झेंडे घेवून न्यायासाठी रस्ते अडविणारे आज मात्र घरात झेंडा गुंडाळून बसलेत.
कारण,आमची घरे दारे अजून शाबुत आहेत पण बाबासाहेबांच्या सहवासाचा सुगंध असणारे एकेक स्थळ तुडवत दलाल आपली पोळी भाजुन घेताहेत.
पण लक्षात ठेवा यातूनच तुमच्या सहनशीलता तपासल्या जात आहेत आणि आता तर आपल्या जाणीवा बधीर झाल्यात हा दावा करण्याचं धाडस दलालांच्या घोळक्यास झाल्यास नवल वाटु नये एवढी सहनशीलता आपण वाढवली आहे.
बाबासाहेब म्हणायचे की,"सहनशीलतेची मर्यादा जिथे संपते,तिथे क्रांतिचा उदय होतो."पण आपली मर्यादा मात्र संपत नाहीये त्यामुळे या वांझोट्या माणसीकतेत क्रांतिचा जन्म होईल???
आजपर्यंत पुस्तके,पक्ष,माणसे संपवली आता तुमच्या स्फुर्ती स्थळांची बारी आहे.
समाजातील दलाल डोक्यावर घेवून मिरवतो पण बाबासाहेबांच कुटुंब वार्यावर सोडून मोकळा होणारा,जाणीवा बधिर झालेला,दलालांच समर्थन करणारा,चळचळीला कमकुवत करणारा,तोंडाने 'बाबासाहेबांना बाप म्हणणारा' पण बाबासाहेबांच्या कुटुंबाशी असलेलं नातं व त्यांच्या प्रतीचे कर्तव्य विसरणारा समाज कृतघ्न नाही तर कोण???
भलेही राजकीय दृष्या आंबेडकरी कुटुंबाला न स्विकारण्याची कारणं उभी केली जातात, शेकडो अफवा पसरवल्या गेल्यात पण बाबासाहेबांच रक्त म्हणून त्यांचे उपकार विसरणारे कृतघ्नच आहेत.
आपण आपल्या बाप-जाद्यांच्या संपत्तीला जिवापाड जपतो,त्यावर अधिकार दाखवतो,प्रसंगी हाणामार्या,कोर्ट कचेरी करतो,हक्क गाजवतो अन् त्यांची अवहेलना झाल्यास हळहळतो तश्याच भावना आंबेडकर कुटुंबाच्या पिई सोसायटी,पिपल्स ईम्प्रूमेंट ट्रस्ट,बौद्धजन पंचायत समिती,राजगृह व बाबासाहेबांच्या ईतर संस्था व समाजाच्या बाबतीत आहे पण स्वतःला चळचळीचे वाहक समजणारे मात्र आंबेडकर कुटुंबाला या सर्व वास्तुपासुन वंचित ठेवून बाबासाहेबांच्या उपकारचे चांगलेच पांग फेडत आहेत. होय ना??परंतु बाबासाहेबांच्या पुण्याईने जगण्यास समर्थ झालेला सुशिक्षीत समाज आज बाबासाहेबांना धोका देणाराच ठरला आहे हे कडु सत्य आहे अर्थात कृतघ्नच ठरतोय पण आंबेडकर कुटुंबा सोबत असणारा प्रत्येक भिम सैनिक सदैव जिवावर उदार होऊन त्यांचा पाठीशीच राहतो प्रसंगी प्राण पणास लावतोय- लावत राहिल, स्वमग्न लोक मात्र कृतघ्नच राहतील.
-सचिन निकम.
रिपब्लिकन विद्यार्थी सेना,औरंगाबाद
मो.9270049458/8975823580/9096281181

"पाऊले चालती बौद्ध विहाराची वाट" या मध्ये काल भाग घेतलेल्या बौद्ध बांधवांची एक झलक आणि आभार.


लोकराजा विश्वभुषण ,आरक्षणाचे जनक  छत्रपती शाहू महाराज यांची जयंती रविकिरण शिक्षक प्रसारक मंडळ परभणी संचलित न्रुसिंह निवसी अस्थिव्यंग अपंग विद्या लय सेनगाव  जिल्हा हिंगोली साजरी करण्यात आली. त्यावेळी प्रतिमेस अभिवादन करीत आसताना समाज भुषण प्राप्त तथा सामाजिक कार्यकर्ते भिमराव प्रधान व इतर कर्मचारी वर्ग.





========================================================================
Aurangabad madhun  ravi kamble sir  sushil mhaske sir yanni aapala sahabhag dila thy baddhal tyanche hi dhanyawad.
 =======================================================================

dadar chaitya bhumi Mumbai madhil activity sandeep jamkar, sandeep Kautikar aani rajesh sonvane sir yani par padhali tya baddhal dhanyawad aani aapala sahabhag asach bhetat rahava hi vinanti.
======================================================================


खोपोली boudh vihar  नितीन मोरे सर खूप छान कार्यक्रम घेतला  आपण सुद्धा ।धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल
======================================================================


Shau college laxmi nagar pune
Pune maddhun santosh sirsat, shilwant satpute,kapil gait,vijay survade,shantaram tupe, nagsen gaikead yanhi sahabhag ghetala tyanche hi dhanyawad.
======================================================================

"तुम्ही बाबासाहेब विकू शकलात, पण मी तोही विकू शकत नाही. कारण नातू आहे."

एका आंबेडकरांनी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) इतिहास बदलला तर दुसरा आंबेडकर (अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडर) भविष्य घडवेल या भितीपोटी प्रकाश आंबेडकरांच्या सभोवताल टिका, विरोध, संशय इ. चे वलय उभे केेले गेले. आपल्यातलेच विरोधक उभे करून प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व समाजाला स्विकारू दिले नाही. त्यांना बदनाम केले गेले. त्यांचे नेतृत्व समाज स्विकारणार नाही याची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे एका वैचारिक, खंबीर व स्वाभिमानी नेतृत्वापासून समाज वंचित राहीला. तरीही प्रकाश आंबेडकर हे सातत्याने सामाजिक लढे लढत राहीले.
प्रकाश आंबेडकरांच्याच शब्दात सांगायचे तर, "तुम्ही बाबासाहेब विकू शकलात, पण मी तोही विकू शकत नाही. कारण नातू आहे." या एका वाक्यात ते खूप काही सांगून जातात.

बाळासाहेबांचे विरोधक जेवढे आपले आहेत तेवढेच प्रस्तापितही आहेत. कारण बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकरांचे प्रस्थापित होणे म्हणजे व्यवस्थेला हादरे बसने निश्चित आहे. एक आंबेडकर इथल्या प्रस्थापितांना पेलवता आला नाही तर दुसरा आंबेडकर यांना सळो की पळो करेल या भितीने बाळासाहेबांचे विरोधक अधिक तयार झाले. त्याचा लाभ घेऊन प्रस्थापित सर्वच राजकीय पक्षांनी समाजाचा राजकीय लाभ घेत आलेत.
समाजातले मोहरे हेरून त्यांनाच प्रकाश आंबेडकरांचे विरोधक म्हणून प्रेसेंट करून समाज विस्कळीत केला गेला. दलित मतांचा बाजार हा प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात समाजात पेरले गेलेल्या संशयाचा परिणाम आहे. अन्यथा आज दलित मतांचा बाजार करण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती. कॉग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, बिजेपी ला दलित मतदार भेटला नसता. आंबेडकरी-दलित समुह हे लक्षात घेणार आहे का ? समाज जितक्या लवकर हे ओळखेल त्यावेळेस समाजाला प्रकाश आंबेडकरांच्या रूपात वैचारिक, प्रबळ, खंबिर, विद्वान व स्वाभिमानी नेतृत्व मिळेल. व दलित मतांचा प्रस्थापितांकडून होणारा बाजार थांबेल.
---डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अनुरूप आंबेडकरी चळवळीचे लढे अॅड. प्रकाश आंबेडकर विरोधकांच्या भाऊगर्दीतही तितक्याच स्वाभिमानाने लढत आहेत. व पुढेही लढत राहतील...
___अॅड. डॉ. संदीप नंदेश्वर, भारिप...
___टिप :- प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व समाजाने का स्विकारले नाही ? अशी टिका करणाऱ्यांनी याचे गांभिर्याने चिंतन करावे.


reff : https://www.facebook.com/sandeepnandeshwar/?fref=ts 

27/06/2016 Headline


अंबेडकर भवन गिराने पर सोशल मीडिया पर लोगों का फूटा गुस्सा, जमकर हुई सरकार आलोचना 

अंबेडकर भवन गिराने पर सोशल मीडिया पर लोगों का फूटा गुस्सा, जमकर हुई सरकार आलोचना
Written by : निर्मलकांत विद्रोही
Date : 2016-06-26
मुंबई। मुंबई के दादर इलाके में स्थित अंबेडकर भवन शनिवार तड़के बुल्डोजर से गिरा दिया गया। पीपुल्स इंप्रूवमेंट ट्रस्ट व डा. अंबेडकर के परिवार वालों के बीच नया विवाद पैदा हो गया है। बाबा साहेब के पोते प्रकाश अंबेडकर ने ट्रस्ट के खिलाफ एफआईआर दर्ज करवाई है।
सोशल मीडिया पर लोगों ने विध्वंश की इस शर्मनाक घटना पर तीखी प्रतिक्रिया दी हैं..
संजय कुमार लिखते हैं, ''कल रात के रात 2 और 3 बजे के दौरान मुंबई में दादर के आंबेडकर भवन और बाबा साहेब द्वारा स्थापित ऐतिहासिक बुद्ध भूषण प्रेस को गिरा दिया गया । फड़नवीस साहब आप बाबा साहब के विचारो से असहमत हो सकते है पर यह इमारत तो राष्ट्र धरोहर थी .... इसे क्यों गिराया ? इससे पता चलता है की मोदी जी बेसक बाबा साहब की मूर्ति के आगे फूल चढाते हो और यह कहते हो की आज वे जो कुछ है बाबा साहब की वजय से है पर असल में यह सब दिखावा है ।
असल में बाबा साहब के लिए आज भी उतनी ही घृणा है जैसे पहले थी।''
वरिष्ठ पत्रकार दिलीप चंद्र मंडल ने लिखा, आज की ताजा खबर यह है कि महाराष्ट्र की पेशवाई सरकार ने मुंबई के दादर में स्थित आंबेडकर भवन को तोड़ दिया है. बाबा साहेब ने यहां अपना प्रिंटिंग प्रेस बनाया था, जो कल तक मौजूद था. यह स्थान राष्ट्रीय धरोहर है. पिछले साल मैं इस प्रिंटिग प्रेस के दर्शन के लिए गया था..... धिक्कार है मोहन भागवत और धिक्कार है देवेंद्र फड़नवीस. महंगा पड़ेगा.
अविनाश गडवे ने लिखा, ''राष्ट्रभक्तों की सरकार ने दादर स्थित आम्बेडकर भवन गिराया ! शर्म करो कायरो !!''
दिल्ली से ओम सुधा ने अपनी फेसबुक पोस्ट में लिखा, ''ये आपने ठीक नहीं किया मोदी जी..मेरी इस बात को गाँठ बाँध कर रख लीजिए की यह आपलोगों को महगा पडेगा.. बाबा साहब से जुडी हर चीज़ राष्ट्रिय धरोहर है। आपको सम्भाल कर रखना चाहिए। देश के करोडो लोगों की भावनाओं से जुडी है हर चीज़। आपने मुंबई के दादर में बने आंबेडकर भवन को ढहा दिया है। बाबा साहब ने वहाँ अपना प्रेस खोला था. प्रेस का महत्त्व आप समझते हैं मोदी जी ? नहीं समझते होंगे। दुनिया का सबसे जाहिल प्रधानमन्त्री दुनिया के सबसे अधिक पढ़े लिखे व्यक्ति की लिखाई और उसके छपकर जनता के हाथों में पहुंचने की महत्ता को समझ लेगा यह मुमकिन भी नहीं है। आप एक एक कर हमे लीलते जा रहे हैं आपने हमारे रोहित वेमुला को मार है , आप देश के तमाम विष्वविद्यालयों के पहुंचने के हमारे रास्ते बंद करने की नापाक कोशिश तो अंजाम दे रहे हैं। याद रखिएगा हम बाबा साहब डॉ भीमराव आंबेडकर की परम्परा से आते हैं. हम माता सावित्री बाई फुले और ज्योतिबा फुले की संतान हैं। हम थे , हैं और रहेंगे। हम बीज की तरह हैं, जिसे मिटटी में दबाओगे तो कोंपले फूटेंगे... महगा पडेगा मोदी जी.. महगा पडेगा..देवेन्द्र फडणवीस मुर्दाबाद ..नरेंद्र मोदी मुर्दाबाद ..इंक़लाब ज़िंदाबाद.. रोहित वेमुला ज़िंदाबाद ..बाबा साहेब फुले की क्रांतिकारी विरासत अमर रहे...
प्रदीप नागदिओ ने लिखा, ''बीजेपी शासित सत्ता ने संघ के इशारों पर मुंबई दादर वाले डॉ अम्बेड़कर के निवास स्थान पर बुलडोजर चलाया ।जिसमे उनकी प्रिंटिंग प्रेस और निवास स्थान तहस-नहस हो गया है।''
जेएनयू छात्रसंघ अध्यक्ष कन्हैया कुमार ने भी तीखी प्रतिक्रिया देते हुए लिखा, ''कायरों की तरह रात के अंधेरे में मुंबई में आंबेडकर भवन और प्रिंटिंग प्रेस को तोड़ने वाले लोगों की इस हरकत के पीछे ब्राह्मणवादियों का एक बड़ा डर छिपा हुआ है। इस जगह से कई आंदोलनों की यादें जुड़ी हुई हैं। वे इन यादों से भी डरते हैं। यह वही जगह है जहाँ रोहित की माँ और भाई ने हाल ही में बौद्ध धर्म स्वीकार किया था। आंबेडकर ने 1947 में यहाँ प्रिंटिंग प्रेस की स्थापना की थी। प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत जैसे कई अख़बार इसी प्रेस से निकले। क्या आधुनिक भवन बनाने के नाम पर इस तरह की तोड़फोड़ की जा सकती है? क्या किसी और नेता से जुड़े भवनों को इस तरह कभी तोड़ा जा सकता है? न जाने कितने ऐतिहासिक दस्तावेज़ों को नुकसान पहुँचा है। कई पांडुलिपियाँ मलबे के नीचे पड़ी हैं। पीपुल्स इंप्रूवमेंट ट्रस्ट से जुड़े कुछ लोग महाराष्ट्र में भाजपा की सरकार के साथ मिलकर आंबेडकर भवन को तोड़कर जनता के आंदोलनों से जुड़ी यादों को मिटाना चाहते हैं। बाउंसरों को भेजकर यह तोड़फोड़ उन्हीं लोगों ने करवाई है जिन्हें बाबासाहेब का नाम तो वोट के लिए चाहिए लेकिन मनुवाद के खिलाफ उनका विचार नहीं ! हम संविधान के निर्माता का इतना बड़ा अपमान बिल्कुल नहीं सह सकते। आज रात 9.30 बजे जेएनयू में साबरमती ढाबे पर आरएसएस और महाराष्ट्र की भाजपा सरकार का पुतला दहन होगा। हर दिन जनता की नाराज़गी को बढ़ाने वाली सरकार अभी सत्ता के नशे में झूम रही है। इसे जनता ही होश में लाएगी।''

चल रे भाऊ, चळवळीत जाऊ !! !!चळवळीत न येण्याच्या पळवाटा !!

चल रे भाऊ, चळवळीत जाऊ !!
!!चळवळीत न येण्याच्या पळवाटा !!
वय 20 वर्षे - आता शिक्षण चालू
आहे … नंतर येतोच …
25 वर्षे - नोकरीच्या शोधात/ आत्ता नौकरी लागली आहे
30 वर्षे - लग्न करायचं आहे … मुलं लहान आहेत
35 वर्षे - थोडंसंसारात "सेटल"होऊ द्या
40 वर्षे - घर -फ्लॅट साठी पैसा उभा करतोय हो …
45 वर्षे - मुलगा / मुलगी दहावीला आहे…
50 वर्षे - घर प्रोपर्टी च्या जबाबदार्या आहेत…
55 वर्षे - मुलामुलींचे लग्न करायची आहेत …
60 वर्षे - ईच्छा तर खूप आहे, पण गुडघ्याचा त्रास खूप वाढलाय …
65 वर्षे - बहुजन समाजामध्ये प्रामाणिक नेतृत्व व निष्ठावान
कार्यकरते नाहीत… !!
अरे भल्या माणसा, मग आता पर्यंत तू कुठे गेला होता ???
ब्राह्मणाच्या मनुस्मृतिचे सण साजरे करायला वेळ आहे.
वर्षाचे ३६५ दिवस, ३३ कोटी देव व त्यांचे शेकडो सण, अम्मा,
माता, महाराज, बापुजी, दाढीवाले, कफनवाले बाबा यांचे
पायथे झिजवायला आणि त्यांचे वर हजारो, लाखो रुपये खर्च
करायला वेळ आहे .
त्यांचे कधी पाय धरतो, तर कधी पाय चाटतोस.
निंदा करायला,शंका कुशंका, वाद -विवाद करायला मात्र तुला
वेळच वेळ आहे. पण
बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, साठे ज्यांच्या कष्टामुळे जनावरातुन माणसात
आलास त्या बहुजन चळवळी चे काम करायला वेळ नाही.
आणि जे प्रामाणिकतेने काम करतात त्या कार्यकर्त्यांना
सहकार्यही करीत नाहीत.
अशा लोकांना बेईमान-गद्दार यादीत घोषित केले पाहीजे.

श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांची आंबेडकर भवन तोडणाऱ्यांविरोधात सर्व आंबेडकरी जनतेस सहकार्याचे आवाहन



श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांची तमाम जनतेस सुचना अन् सहकार्याची अपेक्षा.

आंबेडकर घराणं विरुद्ध संपुर्ण सत्ताधारी सिस्टम आणि त्यांचे दलाल या संघर्षात जर तुम्ही बाबासाहेबांचे खरे अनुयायी असाल आणि एका बापाची औलाद असाल तर आंबेडकर घराण्याला गट तट विसरुन पाठींबा द्याल हीच अपेक्षा.
ही लढाई एका घराण्याविरुद्ध नसुन दलीत चळवळ संपवीण्यासाठी सरकारी दलाल करीत आहेत.
तरी आपण सहकार्य कराल व पाठींबा द्यावा ही नम्र विनंती.

जय भीम
स्वप्निल वाघमारे

Sunday, 26 June 2016

राजर्षी छत्रपती शाहू महाराज Birth Date - 26 June 1874

राजर्षी छत्रपती
शाहू महाराज
Birth Date - 26 June
1874
Birth Place - Kagal
(Kolhapur)
Name -
Yashwantrao
Jaisingrav Ghatge
(यशवंतराव जयसिंगराव
घाटगे)
Death - 6 May 1922 (Mumbai)
* कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या
मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई
यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना
दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले.
* 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
* 1891- श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब
यांच्याशी विवाह झाला
महाराजांचे शिक्षण - *1985 ते 1894 या काळात शैक्षणिक
कार्य पूर्ण केले
*1894 सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड
येथे शिक्षण घेतले
*1898 पर्यंत राजकोट येथे Principal McNoton यांच्या
मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.
* 2 एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक समारंभ झाला.
*1894 - राजे झालेनंतर लगेचंच त्यांनी बहुजन
समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला
व वेठबिगाराची पद्धत बंद केली.
* 1895 साली मोतीबाग
तालीम सुरु केली. शाहू महाराजांना
कुस्ती हा खेळ आवडत असे. याच वर्षी
शाहूपुरी गुळाची व्यापार पेठ सुरु
केली.
* 27 मार्च 1895 - पुणे येथील फर्गुसन
महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले.
* 1887 - आळते महार स्कूल ची स्थापना
केली, दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्ज
दिले.
* 1899 - वेदोक्त प्रकरण याच वर्षी घडले.
तेंव्हापासून ब्राम्हणांच्या मक्तेदारीस शह
देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बहुजनांची
होणारी गळचेपी
थांबवण्यासाठी बहुजन उद्धाराचे कार्य
हाती घेतले. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणांचे समर्थन
केले.
* 1901 साली मराठा समाजातील
विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या बोर्डिंग
ची स्थापना कोल्हापुरात केली. याच
वर्षी नाशिक येथे उदोजी
विद्यार्थी वसतीगृहा ची
स्थापना केली. तसेच गोवध बंदी कायदा
केला.
* 20 जुलै 1902 रोजी संस्थानामध्ये
नोकरी मध्ये 50% आरक्षण देण्याचा आदेश काढला.
* 9 नोव्हेंबर 1906 रोजी 'किंग एडवर्ड मोहमेडन
एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना
कोल्हापूर येथे केली. तसेच शाहू मिल तथा 'शाहू
स्पिनिंग अंण्ड विव्हिंग मिल' ची सुरुवात
केली.
* 1907 सहकारी तत्वावर कापड गिरणी
सुरु केली. अस्पृश्य समाजातील
विद्यार्थ्यांसाठी ' मिस क्लार्क बोर्डिंग
हाउस ची' स्थापना केली.
* 1908 बॉंबस्फोट घडवून महाराजांना
मारण्याचा अयशस्वी प्रयत्न समाजकंटकांकडून केला
गेला.
* 1910 जहागीरदारांचे अधिकार कमी
केले
* 11 जानेवारी 1911 साली कोल्हापुरात
सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
अध्यक्ष म्हणून परशुराम घोसटवाडकर तर प्रमुख म्हणून
भास्करराव जाधव हे काम पाहत. याच वर्षी
विद्यार्थ्यांना 15% नादारी देण्याची घोषणा
केली.
-शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना
व गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना
सुरु केली.
-कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात भोगावती
नदीवर राधानगरी धरण बांधले.
-सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुणे येथे भरवले
* 1912 - खासबाग मैदान या कुस्ती
मैदानाची सुरुवात कोल्हापूर येथे केली.
(याला 2012 साली 100 वर्षे पूर्ण
झाली).
- सहकारी कायदा केला व सहकार
चळवळीला प्रोत्साहन दिले.
-सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक येथे भरवले
*1913 गाव तिथे शाळा असावी असा अध्यादेश काढला.
पाटील शाळांची सुरुवात केली.
-कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरु
केली.
* 1916 साली संस्थानात प्राथमिक शिक्षण
सक्तीचे आणि मोफत केले
-बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून
देण्यासाठी 'डेक्कन रयत शिक्षण
संस्थे' ची स्थापना निपाणी या
ठिकाणी केली.
-आर्य समाजाची तत्त्वे याच
वर्षी स्वीकारली.
* 1917 विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता
दिली
- 25- जुलै पासून संस्थानात प्राथमिक शिक्षण
सक्तीचे केले.
* 1918 आंतरजातीय विवाहास कायद्याने मान्यता
दिली
- कुलकर्णी व महार वतने रद्द
केली.
- जमिनी रयतवारीने कसण्यास दिल्या
- आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात सुरु करून
राजाराम कॉलेज या संस्थेकडे चालवण्यास दिले.
- गुन्हे गारी जमातीच्या
लोकांची पोलीस हजेरी बंद
केली.
- तलाठी शाळा सुरु केल्या.
* 1919 - स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध कठोर
कायदा केला.
- एप्रिल 1919 - कानपूर - "अखिल भारत
वर्षीय कुर्मी क्षत्रिय महासभा" या
संस्थेच्या 13 व्या
अधिवेशनात त्यांच्या अतुल्य कार्याबद्दल
"राजर्षी" पदवी बहाल करण्यात
आली.
- शाळेत अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारा कायदा केला.
* 1920 - घटस्फोटाचा कायदा करण्यात आला
- देवदाशी प्रथा कायद्याने बंद करण्यात
आली
- हुबळी - "ब्राम्हणेतर सामाजिक परिषद" चे
अध्यक्षपद भूषवले
- पूजाअर्चा शिकाऊ उमेदवाराकडून करावी असा
आदेश काढला
* 6 मे 1922 रोजी मुंबई येथे निधन.
*************************************************
******************

Friday, 24 June 2016

बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात हे पुर्ण नक्की वाचा..! लेख मोठा आहे, पण नक्की वाचा!!!

बुध्द धम्माबद्दल  प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात हे पुर्ण नक्की वाचा..!
लेख मोठा आहे, पण नक्की वाचा!!!

:-हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही.
जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत:अन्य प्रवाहांचे आहे.आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो,
त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत.
अनेक अर्थपूर्ण प्रतिकं ही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत.
खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय.
हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे!

बौद्धधर्माचे चेहरे तरी किती लपवणार? ज्यापुरी, शृंगेरी, बद्रीनाथ, द्वारका याठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदू धर्मपीठे स्थापन केली, ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रे होती!

पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धमंदिर होते! (इति. स्वामीविवेकानंद!) शृंगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्धस्तुपाच्या जागेवर झालेला आहे!

श्रीशैलमचे मंदिरही पूर्वीचे बौद्धशिल्प होते! तिरुपतीचा बालाजी, बद्रीनाथचा बद्रीकेश्वर ही सध्या हिंदूंची म्हणवली जाणारी धार्मिकक्षेत्रे पूर्वीची बौद्धधर्माची महत्त्वाची स्थाने होती

 (तिरुपती बालाजी आणि तिथला परिसर नीट न्याहाळला तरी हे लक्षात येते! मुंडन पद्धत ही मूळची बौद्ध परंपरेची!)

बौद्ध धर्माची जी चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चारधाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली. या चारधामांचे यथावकाश अपहरण करण्यात आले. देशातल्या बहुतांश देवदेवता, त्यांच्या मूर्ती आणि मंदिरे मूळची बुद्धिस्टांची आहेत. अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणि तिचे मंदिरही!

अशी असंख्य ठिकाणे हिंदू-वैदिकसंस्कृतीने हडप केली आणि तिथे
पौराणिक कथांचा व वैदिक कर्मकांडांचा बाजार मांडला! बौद्धधर्म सबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच, परंतु महाराष्ट्राच्या अणूरेणूत तो अक्षरश:भिनला होता. लोकसेवेच्या, समतेच्या, ज्ञान-विज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यातून आणि डोंगरपर्वतातून निनादल्या होत्या! यातूनच महाराष्ट्राचे परमवैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसा कायमचा कोरला गेला! नंतरच्या काळात या लेण्यांबाहेर कुठल्यातरी चमत्कृतीपूर्ण शिवाची, देवाची किंवा देवीची उभारणी करून बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले! त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरस कहाण्यांना ऊत आणला गेला!

प्रबोधनकार ठाकरे पुढे म्हणतात,
‘फारदूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पाहा. ही वास्तविक बौद्धांची!
तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली!
तिचे नाव एकविरा!
हिला वेहेरीची देवी असेही म्हणतात. ही पांडवांची बहीण. हिच्यासाठी भीमाने म्हणे एका रात्रीत ही लेणी कोरून काढली! ’किती उदाहरणे सांगायची? आज शाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.

परंतु हा‘गुरू’ कोण  हे कुणाला माहीत नाही!
हा गुरू आहे, गौतम बुद्ध! त्यानि पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली आणि तिथून तो पायंडा पडला! (पण आज गुरुपौर्णिमा बिनबोभाटपणे व्यास महाशयांच्या नावावर खपविली जातेय!)

मंगळसूत्र, मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्धपरंपरेतूनच आलेले आहेत.
थोडक्यात, आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा,
बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे!
भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे.
राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात‘धर्मचक्रप्रवर्तन’ असे कोरलेले आहे.

सन्दर्भ : देवळाचा धर्म आणि धर्माची देउळे
लेखक :- प्रबोधनकार ठाकरे
-----------------------------------------------------------------------
ही माहीती एका तरी मित्रासोबत जरूर शेअर करा.

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यावर अतिक्रमण, हे ऐकूनच धक्का बसतो

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या बंगल्यावर अतिक्रमण, हे ऐकूनच
धक्का बसतो. मात्र, हे खरे आहे. 54
वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव
दाभाडे येथील बंगल्यावर
डिसुझा नावाच्या व्यक्तीने
अतिक्रमण केले. त्यानंतर बाबासाहेबांचे नावच
त्या बंगल्यावरून मिटविले गेले. मात्र,
बाबासाहेबांचा हा बंगला शोधला विदर्भातील
भीमसैनिक किसन कान्हबाजी थूल
यांनी; आणि आठ
वर्षे न्यायालयीन लढा लढून तो बंगला
भीमराव
रामजी आंबेडकरांच्या नावावर केला. धम्मचक्र
प्रवर्तनदिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर
आले
असता किसन थूल यांनी त्यांच्या लढ्याचा इतिहास
सांगितला. किसन थूल. रा. महाडोळी.
तालुका वरोरा. जिल्हा चंद्रपूर.
पत्नी शिक्षिका असल्याने ते सध्या पुणे
जिल्ह्यातील
तळेगाव दाभाडे येथे वास्तव्याला आहेत.
कोट्यवधी भीमसैनिकांचे प्रेरणास्थान
असलेल्या डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांची 50 एकर
शेती आणि बंगला येथेच. मात्र,
त्याची कोणालाही माहिती
नाही.
बाबासाहेबांचा तो बंगला जीर्ण झाला. त्यावर
डिमेलो डिसुझा यांचे अतिक्रमण होते. येथे
बाबासाहेबांचा बंगला असल्याची माहिती
किसन
थूल यांना मिळाली. त्यांच्यातील
भीमसैनिक
जागा झाला. येथून न्यायालयीन लढ्याला सुरवात
झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासाचे फार
मोठे व्यासंगी होते, हे सर्वांनाच माहीत
आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे,
याकरिता त्यांनी पीपल्स एज्युकेशन
सोसायटीची स्थापना केली. मुंबई
आणि औरंगाबाद
येथे जगविख्यात महाविद्यालय आजही सुरू आहे.
त्याचप्रमाणे पुणे परिसरातसुद्धा असेच महाविद्यालय
व्हावे म्हणून त्यांनी मावळ तालुक्यातील
तळेगाव
दाभाडे येथे 26 नोव्हेंबर 1948 रोजी 37 एकर सहा
आर
तसेच 6 नोव्हेंबर 1951 ला पुन्हा 13 एकर जमीन
घेतल्याची कागदोपत्री नोंद आहे. त्या
गावामध्ये
नयनरम्य ठिकाणी त्यांनी बंगला बांधला.
मोठमोठ्या सभा गाजविल्यानंतर आराम
करण्यासाठी तसेच अभ्यासासाठी ते
या निवांतस्थानी असलेल्या बंगल्यामध्ये येत. मात्र,
येथील बंगल्याची कल्पना इतरानांच काय,
तर
त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा नव्हती. त्यामुळे
2004
पर्यंत तळेगाव दाभाडे येथे बाबासाहेबांचा बंगला आहे,
याची पुसटशी कल्पनासुद्धा
येथील
ग्रामस्थांना नव्हती. चंद्रपूर
जिल्ह्यातील किसन थूल
यांच्या पत्नी माधुरी थूल येथे शिक्षिका
आहेत.
त्यांना एका ग्रामस्थाकडून बाबासाहेब
आंबेडकरांचा येथे
बंगला असल्याची माहिती
मिळाली.
ही माहिती त्यांनी
पती किसन
यांना सांगितली.
लगेच किसन थूल यांनी किरण साळवे यांच्या
मदतीने
बंगला शोधला. शहा-ऍल्टोनो कॉलनीमधील
प्लॉट
क्रमांक 35 वर भीमराव रामजी आंबेडकर
यांच्या नावाने बंगल्याची नोंद आहे. ही नोंद
1956
ते
59 पर्यंतच आहे. त्यानंतर
ही जागा डिमेलो डिसुझा यांच्या
मालकीची झाली.
बाबासाहेबांचा बंगला मिळवायचाच,
असा दृढनिश्चय किसन थूल यांनी केला. यानंतर 2004
पासून सर्व कागदपत्रे गोळा केली. 26
जानेवारी 2006
मध्ये त्यांनी 70 लोकांच्या उपस्थितीमध्ये
पहिली बैठक घेतली. त्यानंतर किसन थूल
यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने स्मारक
समितीची स्थापन केली.
2012 पर्यंत ते न्यायालयीन
लढा लढले. अखेर
न्यायालयाला बाबासाहेबांचा बंगला असल्याचे
मान्य करावे लागले आणि 26 एप्रिल 2012
रोजी हा बंगला अखेर भीमराव
रामजी आंबेडकर
यांच्या नावावर करण्यात आला. हे निवासस्थान
स्मारक व्हावे म्हणून नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात
आला. आठ वर्षे न्यायालयीन लढाईत बाबासाहेब
जिंकले. विदर्भातील खेड्या गावातील किसन
थूल
या भीमसैनिकाने
बाबासाहेबांना त्यांचा बंगला मिळवून दिला.
बाबासाहेबांच्या स्मारकासाठी स्मारक
समितीच्या अध्यक्ष ऍड. रंजनाताई भोसले, लिंबराज
कांबळे, सहदेव डोंबे, तुकाराम मोरे, लक्ष्मण सोनवणे,
श्रावण गायकवाड, देवानंद बनसोडे, गंगाधर सोनवणे,
अंकुश मोरे, रवींद्र शिंदे, युवराज सोनकांबळे,
माधुरी थूल,
रोहिणी आव्होळ, प्रभाकर ओव्हाळ, सुरेश कांबळे,
दिनेश
गवई, विजय नाईक, बी. डी. गायकवाड
प्रयत्नशील
आहेत. या बंगल्यामध्ये बाबासाहेबांच्या अनेक
आठवणींची जपणूक करण्यात
आली आहे.
बाबासाहेबांच्या
बंगल्याची माहिती महाराष्ट्रात
कुणालाही नाही.
ही माहिती सर्वांना व्हावी

Thursday, 23 June 2016

संघ परिवार की नजर में अकबर के बाद अब सम्राट अशोक खलनायक और बौद्ध राष्ट्रद्रोही

संघ परिवार की नजर में अकबर के बाद अब सम्राट अशोक खलनायक और बौद्ध राष्ट्रद्रोही
 A A
प्रदेशकीपाठ्यपुस्तकों में अकबर की महानता को लेकर छिड़ा विवाद अभी थमा भी नहीं है कि अब संघ परिवार ने सम्राट अशोक महान को भारतीय इतिहास का खलनायक और बौद्ध मतावलंबियों को राष्ट्रद्रोही घोषित करना शुरू कर दिया है। राष्ट्रीय स्वयं सेवक संघ (आरएसएस) के संगठन राजस्थान वनवासी कल्याण परिषद के मुखपत्र “बप्पा रावल’ में सम्राट अशोक की महानता पर सवालिया निशान खड़े किए गए हैं और बौद्ध मतावलंबियों को देशद्रोही भारत को महान से पतित बनाने वाला बताया गया है। मुखपत्र में कहा गया है कि मौर्य साम्राज्य के भारतीय सम्राट अशोक के कारण ही भारतीय राष्ट्र पर बड़े संकटों के पहाड़ टूटे और यूनानी आक्रांता भारत को पदाक्रांत करने धमके।

राजस्थान वनवासी कल्याण परिषद के मुखपत्र “बप्पा रावल’ के मई-2016 अंक में प्रकाशित “भारत : कल, आज और कल’ लेख माला में स्पष्ट कहा गया है : यह भारत का दुर्देव ही रहा कि जो अशोक भारतीय राष्ट्र की अवनति का कारण बना, उसकी ही हमने “अशोक महान’ कहकर वंदना की। अच्छा होता कि राजा अशोक भी भगवान बुद्ध की तरह साम्राज्य का त्यागकर, भिक्षुत्व स्वीकार कर, बौद्ध धर्म के प्रचार में लग जाते। इसके विपरीत उन्होंने तो सारे साम्राज्य को ही बौद्ध धर्म प्रचारक विशाल मठ के रूप में बदल दिया। इन बौद्ध धर्मावलंबी मगधापतियों के कारण ही यूरोप से फिर एक बार ग्रीक आक्रांता भारत को पदाक्रांत करने धमके। इस संबंध में जब पत्रिका का प्रकाशन करने वाले संगठन वनवासी कल्याण परिषद के राज्य संगठन मंत्री राजाराम से पूछा गया तो उन्होंने बताया कि पत्रिका में प्रकाशित संपादक डॉ. राधिका लढ़ा ने जो लिखा और कहा है, वही सही है।

भारत का राष्ट्रीय चिह्न ‘अशोक चक्र’ तथा चार शेरों वाला ‘अशोक स्तंभ’ भी अशोक की ही देन है।

लेखिका डॉ. राधिका लढ़ा ने कहा- अवनति उसी काल में हुई

^अशोकने बौद्ध धर्म अपनाया फिर इसे ही राज धर्म बना दिया। विदेशों से जो भी आता, अगर वो बौद्ध होता तो अशोक तुरंत ही उसे अपना मान लेते थे, जो कि गलत था। उन्होंने इतनी शांति फैलाई कि सीमा पर लगे सैनिक ही हटा दिए। इससे आक्रमण बढ़े और राष्ट्र की अवनति उसी काल में हुई। राष्ट्रीय प्रतीक चिन्ह में सिंह है, जो कि शौर्य का प्रतीक है। वो खूबी थी उनकी इसलिए अपनायी गयी। डॉ.राधिका लढ़ा, बप्पा रावल पत्रिका की संपादक

विदेशियों ने अकबर और अशोक को महान बताया : संघ

^पत्रिकामें छपा दृष्टिकोण आरएसएस का नहीं हो सकता। यह व्यक्तिगत है। सम्राट अशोक में अच्छाई थी तो दोष भी थे। उनके आने से भारत में शक्ति की उपासना खत्म हो गई। इससे राष्ट्र कमजोर बनता गया और विदेशियों के आक्रमण बढ़ते गए। अकबर और अशोक को महान बताने वाले जो भी इतिहासकार हैं, वे सभी विदेशी हैं, जो भारत को जानते ही नहीं। कन्हैयालाल चतुर्वेदी, संपादक, पाथेय कण और संघ के प्रतिष्ठित व्यक्तित्व

अशोक के बाद भी हुए विदेशी हमले, जिम्मेदार कौन: गुप्ता

^एकही गुण या दोष से किसी व्यक्ति का आकलन करना ठीक नहीं। उस समय की परिस्थिति अलग थी। अशोक के बाद सातवीं और आठवीं शताब्दी में भी विदेशी हमले हुए तब तो अहिंसा की नीति नहीं थी, फिर किसे दोष देंगेω। देश की अवनति में आपसी फूट बड़ा कारण थी। प्रो.केएस गुप्ता, इतिहासकार

इतिहास में इसलिए महान माने जाते हंै अशोक

भारतीयइतिहासकारों की नजर में हिंसा और युद्धों के माहौल में कुशल प्रशासक अशोक तीन ही साल में शांति स्थापित करने के लिए जाने जाते हैं। इतिहासकारों ने मानवतावादी भी माना है। चिकित्सा शास्त्र में तरक्की भी उसी काल में हुई।

कनिष्क को भी बताया विदेशी

इस लेख में पेज 12 पर लिखा है : चीनतक के प्रदेशों पर आक्रमण करने में व्यस्त होने के बाद भी कनिष्क का ध्यान आध्यात्मिक और सांस्कृतिक विषयों के प्रति लगा रहता था। यद्यपि कनिष्क ने बौद्ध धर्म स्वीकार कर लिया, परंतु वह था तो विदेशी ही।

वनवासी कल्याण परिषद की ओर से वनवासी अंचल के लिए प्रकाशित इस मुखपत्र के लेख में पेज 11 पर साफ कहा गया है : अनेक बौद्ध भिक्षु प्रचारक भारत की बौद्ध जनता में यह राष्ट्रघातक भारत द्रोही और बुद्धिहीन उपदेश भी देने लगे थे कि बौद्ध धर्म जाति, राष्ट्र अथवा वंश को नहीं मानता। बौद्ध मतावलंबियों ने राष्ट्रद्रोही की भूमिका निभाई। यवन सेनापति मिनियान्दर को भारतीय बौद्धों की सहानुभूति प्राप्त होने लगी। बौद्ध सोचने लगे कि ये ग्रीक सिर्फ वैदिक धर्मावलंबियों से ही लड़ने रहे हैं। यदि ग्रीकों की विजय हुई तो भारत में बौद्ध धर्मावलंबियों का शासन होगा। वे सोचते, “हमें क्या मतलब यदि ग्रीक विदेशी हैं तो’ 

reff link : http://www.bhaskar.com/news-keyreco/RAJ-UDA-OMC-MAT-latest-udaipur-news-065503-417319-NOR.html

संविधान लिहिल्या नंतर आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु

संविधान लिहिल्या नंतर आंबेडकरांच्या डोळ्यात आले अश्रु



संविधान  म्हणजे भारताचा आत्मा ;

1📘📖 - विश्वरत्न  डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान 395 कलमाचे का लिहले ??  ;
394 किंवा 396 कलमाचे का लिहले नाहीत? तर त्याला कारण महात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत ते कसे ?? तर
2📘📖- महात्मा फुले यांनी  बहुजन समाजाला  शिक्षण  ज्या पुण्यातील भिडे वाडयातून दिले ; शाळा चालू केले ; त्या शाळेचा क्रमांक 395 होता ; त्याची व आपल्या गुरूविषयी कृतज्ञता म्हणून संविधान 395 कलमाचे लिहले  

3 📘📖- संविधानाच्या या मसूदा समितीवर  सात लोकांची निवड करण्यात आली होती
त्यापैकी दोघांनी राजीनामा दिला ; एकाचा मृत्यू झाला; एक विदेशात गेला ; एकाची तब्येत ठीक नव्हती;  एक राजकारणात अडकला

4📖- त्या मुळे मसुदा समिती अध्यक्ष या म्हणून  संविधान लिहण्याची सर्वस्वी जबाबदारी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येवून पडलीय व ती त्यांनी समर्थपणे एकट्यानेच  पार पाडली म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे "संविधानाचे शिल्पकार" आहेत  

5📘-संविधानाची सुरूवात कशी करावी ? यावरून वाद चालू होता
त्यात मौलाना हजरत मोहली म्हणून लागले की ;संविधान "अल्लाहच्या "नावाने सुरू करावे
पंडीत मालवीय म्हणाले की; "ओम नम शिवाय" यां नावाने सुरू करा
एच :पी :कामत म्हणाले की -"ईश्वर "नावाने सुरू करा

मग शेवटी बाबासाहेब आंबेडकर म्हणाले " लोक" नावाने सुरू करा
 मग
  यावर मतदान झाले
मग बाबासाहेब आंबेडकर यांना 68 मते पडली
तर देवाच्या नावाने 41 मते पडलीय
संविधानाची सुरुवात  "आम्ही भारताचे लोक "
या नावाने झाली ;

पहिल्याच मतदानात दगडाचे देव हरले व माणूस जिंकला

6📘 - संविधानाचा कच्चा मसूदा बाबासाहेब आंबेडकर घरी लिहत बसले होते ;
त्या वेळी  बॅ: पंजाबराव देशमुख हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी आले

7📘- यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यां चे स्वागत केले ;
तसेच संविधानाचा लिहत असलेला कच्चा मसूदा  बॅ: पंजाबराव देशमुख  यांना दाखवून  म्हणाले ; "की दादा यावर थोडी नजर मारा व काही सूचना असतील तर सूचवा " मी थोडयावेळात येतो"
 असे म्हणून बाबासाहेब बाहेर गेले

8📘- परत आले तर बॅ :देशमुख यांच्या डोळ्यात अश्रू पाहून बाबासाहेब  म्हणतात की दादा तुम्ही का रडताय ?
 यावर देशमुख यांनी सांगितले की  बाबासाहेब  " माझ्या मराठा कुणबी समाजाच्या आरक्षणाची तरतूद करा " हे सांगण्यासाठी बाबासाहेब मी तुमच्याकडे  आलो होतो;
पण तुम्ही किती महान आहात की मी येण्याच्या अगोदरच तुम्ही तो मसूदा तयार करून ठेवलाय ; यामुळे मला आनंदाश्रू आवरत नाहीत

9📕- महात्मा फुले यांनी असे भाकित केले होते की ज्या वेळी बहुजन समाज मनुवादी धर्मग्रंथ वाचेल ;त्यादिवशी तो जाळल्याशिवाय राहणार नाही ;
पहा बाबासाहेबानी मनुस्मृती नावाचा विकृत ग्रंथ जाहीरपणे जाळला व फुलेचा विश्वास खरा केला व फुले यांनी म्हटले होते की दुसरा राजग्रंथ निर्माण करेल ;
मग तो राजग्रंथ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान  लिहून पूर्ण केला  

10 📙- अमेरिकेतील कोलंबिया विदयापीठाने एक अहवाल तयार केला की त्या कालेजमधे शिकुन गेलेल्या 200 वर्षाच्या इतिहासात जगात सर्वात विदवान कोण ?  त्यांनी जाहीर केले होते की जगात  डाॅ :बाबासाहेब आंबेडकर हे विश्वरत्न ; विदवान आहेत ; father of modern India is Dr  ambedkar

11📕- कोलंबिया विद्यापीठाच्या मैदानात बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ धातूचा पुतळा बनविला आहे व त्यात खाली लिहले होते की    "SYMBOL OF KNOWLEDGE "

12-📙 तेथील  कुलगूरूच्या कार्यालयात बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे
व खाली लिहिले आहे की "आम्हाला गर्व आहे की आमच्या काॅलेजमधे शिकून गेलेला आमचा विद्यार्थी एका देशाचा संविधान शिल्पकार ठरला  "

13-📙 नेल्सन  मंडेला म्हणतात की भारताकडून घेण्यासारखा एकच गोष्ट ती म्हणजे आंबेडकर यांनी लिहलेले संविधान  

14 📕- संविधान लिहून पूर्ण झाल्यानंतर  एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला की डाॅ बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला संविधान लिहताना काही अडचण येत होती का ? यावर बाबासाहेब आंबेडकर यांनी लगेच उत्तर दिले, की माझ्या  डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य उभे होते
म्हणून मला अडचण आली नाही  "

15📙-बाबासाहेब म्हणाले की संविधान कितीही चांगलेच असू दया पण राबवणारे हात वाईट असेल तर ते संविधान  कुचकामी ठरते  ; म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांच्या हताश मनाचा मानबिंदू म्हणजे संविधान  

16📕- संविधान  लिहून झाल्यावर  बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यात अश्रू आले त्या वेळी तेथील पत्रकाराने विचारले की बाबासाहेब तुम्ही मनासारखे संविधान लिहून तुम्ही नाराज का आहात ? यावर बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकाराला उत्तर देताना सांगितले की ;" मी बहुजनाच्या  कल्याणाचा जाहीरनामा लागू करण्यासाठी ज्यांच्या हातात देत आहे ते लोक माझे बहुजन नाहीत " ;
मला यांच्यावर विश्वास बसत नाही  की ते संविधान  जशाच्या तसे लागू करतील

संविधान  निर्मितीची वरील घडामोडी व कर्मकहाणी सगळी कडे पोहचवा व संविधान विषयी कृतज्ञता बाळगा

तुमच्यात उर्जा प्रेरणा धाडस आणि सत्यता निर्माण करणारी महामानवाची काही वाक्य !!!!

तुमच्यात उर्जा प्रेरणा धाडस आणि सत्यता निर्माण करणारी महामानवाची काही वाक्य !!!!

आवडल्यास नक्कीच दाद द्या........

१) "शिका...!
संघटीत व्हा...!
संघर्ष करा....!"
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर

२) "तुमच्या मताची, किंमत मीठमिरची इतकी समजू नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल तेव्हा ते, मत विकत घेऊ पाहणाऱ्याइतके कंगाल कोणीच नसेल..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

३) "लोकांच्या अंगात देवी, भुतच कां येतात..,
न्युटन आयझॅक, कोपर्निकस यांच्यासारखे शास्त्रज्ञ कां येत नाहीत...?
जेव्हा शास्त्रज्ञ अंगात येतील तेव्हा भारत जगावर राज्य करेल..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

४) "समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व या तीन तत्वावर आधारित जीवनमार्ग म्हणजे लोकशाही.
समता, स्वातंत्र्य, सहानुभूती यानेच व्यक्तीचा विकास होतो."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

५) "माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला पाहिजे ती आपल्या दुर्गुणांची...."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

६) "प्रज्ञा, शील, करुणा, विद्या, मैत्री या पंचतत्वावर प्रत्येक विद्यार्थ्याने आपले चरित्र बनविले पाहिजे..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

७) "मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

८) "जेथे एकता~
तेथेच सुरक्षितता"
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

९) "काम लवकर करावयाचे असेल, तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१०) "दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

११) "आत्मोद्धार हा दुसर्याच्या कृपेने होत नसतो,
तो ज्याचा त्याने करायचा असतो..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१२) "विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही.
आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकणे अगदी अगत्याचे आहे...."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१३) " माणूस हा धर्मा करीता नसून, धर्म हा माणसा करिता आहे..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१४) "सेवा जवळून, आदर दुरून, व् ज्ञान आतून असावे..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१५) "जो प्रतिकूल लोकमताला घाबरून जात नाही,
दुसऱ्यांचे हातचे बाहुले न होण्याईतकी बुद्धी ठेवतात,
स्वाभिमान ज्याला आहे,
तोच माणूस स्वतंत्र आहे असे मी समजतो."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१६) "स्वातंत्र्याचे हक्क भीक मागून मिळत नसतात,
ते स्व-सामर्थ्याने संपादन करावयाचे असतात,
देणगी म्हणून ते लाभत नसतात..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१७) "ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसर्या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही,
त्याचप्रमाणे, कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दूसर्या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

१९) "माझा जन्म सर्वसाधारण जनतेची जबाबदारी घेण्यासाठी असावा."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२०) "तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.
स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे व्यर्थ आहे."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२१) "आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतराने आंधळेपनाने त्याच्या मागे धावत जावे, हे मी तरी कमकुवतपनाचे लक्षण मानतो..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२२) "माणसाने खावे जगण्या साठी,
पण जगावे समाजासाठी...."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२३) "दुसर्याच्या सुख-दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे..."
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

२३) "पती आणि पत्नी यांच्यातील संबंध जवळच्या मित्रांसारखे असावेत..."
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

देव व दानव -- डॉ दाभाडे

 देव   व    दानव
=========
मानला तर देव,जो दैवावर विसंबला त्याचा कार्यभाग  संपला
अशा प्रकारच्या  उक्ती  फार पूर्वी  पासून समाजात रूढ आहेत.
  याच कारणच हे की जे काही करतो ते मानवच करतो मग ते वाईट असो कि चांगले.
मानवतेला धरून जे चांगले ते कार्य  ईश्वरी  कार्य समजावे व  समाजाला घातक ठरनारे कार्य  हे राक्षसी कार्य  समजावे.
देव दानव या काही शक्ती नसून
मानवाच्या प्रवृत्ती  आहेत.
जो चुकीच्या  मार्गाने जाईल तो चुकीच्या ठिकाणी  पोहचेल व जो मानव हिताच्या मार्गाने  जाईल तो
सन्मान  पावेल.
मानवच फक्त  ईश्वर  वा दानव या बाबी मानतो
ईतर सर्व प्राणी या वादात पडत नाहीत  ते निसर्ग  नियमां प्रमाणे  जीवन जगतात. कसलीही ढवळाढवळ  करत नाहीत.
गाय कधी मांस खात नाही किवा सिंह कधी गवत खात नाही.
माणूस  मात्र सर्वच खातो.
मानवाला बुद्धी  दिली आणि  जगाचं पार वाटोळे  झालं
त्याने स्वार्थापायी सर्व निसर्ग  घटकांचा  नाश करत ईतर प्राणी व वनस्पती  चं जीवन संकटात  आणलं
  प्राणी कुठलाही  भेदभाव  करत नाहीत  भेदभाव  उच्च नीचता हलके भारी गरीब श्रीमंत  हे फक्त  मानवातच.
मानवानेच ईतकी मानव हत्या  केल्या की विचारता सोय नाही
जर बुद्धी  देवून मानवाने हे केलं तर ज्यांना  निसर्गाने  बुद्धी  नाही दिली तेच बरे.मानवाने सदाहरीत व निसर्ग  संपन्न  असलेल्या  पृथ्वी चे वाळवंट  केले आहे .
एवढा भयंकर  नाश मानवाने  केला तर देव कुठं लपला आहे तो सजा का देत नाही .
बालकांवर गोळ्या  झाडताना का रोखत नाही.
महीलावर व अबला वरचा  बलात्कार का? रोखत नाही.भ्रष्टाचार  का रोखत नाही.
अत्याचार  का? रोखत  नाही
समाज सुधारकांच्या हत्या का रोखत नाही.
मानवाने  दुष्काळात बिसलरी पिवून तहान भागवली पण जगंलातील प्राणी तडफडून  मेले तेव्हा  कुठं गेला होता देव व देव माननारे  पाखंडी
माझा साधा प्रश्न  आहे का हिंदू  हिंदू  धर्माला 2000 वर्षापासून  आजतागायत  सोडून  जात आहेत.
का? तूम्हांला  घरवापसी करावी लागते ?
पहीले घर का? सोडले हे पहा.
छ.शिवरायांनी ही घर वापसी साडेतिनशे वर्षांपूर्वी  अंमलात  आणली होती. त्याला तेव्हा  कूणी विरोध केला.1956ला करोडो लोकांनी  डॉ  आंबेडकरासोबत हिंदू  धर्म सोडला का? याच उत्तर  कुणी देईल काय.या महामानवाला किती वेदना झाल्या असतील याचा विचार  आजही होत नाही.
     आमचा विरोध ब्राह्मणांना नाही ब्राम्हण्याला आहे.
का आजही समानता नाही?
आठ आठ वर्षांच्या  कोवळ्या  विधवा मुलींना  सरणावर खूले आम
जाळणा-या प्रवृत्ती ला विरोध  नाही करायचा.
महीलांना  मंदिरात प्रवेश नाकारना-या नालायकांना विरोध करायचा नाही.
(या ठिकाणी  महीला विषमता या अर्थाने  पहावे )
एखाद्या  गैर धर्मिय व्यक्ती ला या धर्मात यायचे असेल तर कुठे यायचे
कोण स्वीकारनार त्याला .कोणत्या जातीत यायच त्याने .
हिंदू  धर्मात  यायचे सर्व दरवाजे बंद आहेत.
ऋषिकेष पवार  घेतील काय त्याच्यांत? शिवरायांनी स्व धर्मात परतलेल्या लोकांशी स्वतःची मुलगी देवून नाते जोडले होते.
आहे का हिमंत हे करण्याची?
आज अब्जावधी  रूपयांची संपत्ती  मंदिरात  आहे का नाही खर्च करीत जनतेच्या  कल्याणासाठी.
  भोगंळया साधू वर 2500 कोटी खर्च करता दुष्काळी  भागात  साधा दौराही नाही.
69 वर्षे झाली स्वातंत्र्य  मिळून
अन्न वस्त्र  निवारा ,पाणी व शिक्षण  नाही.
सर्वाना सत्ता देवून पाहीली सगळेच चोर निघालेत.
मोदी कडून आशा धरली होती  पण
हे देशात कमी परदेशात जास्त असतात वर म्हणतात मला भारतात जन्माला आल्याची लाज वाटते.हे देशाचे पंतप्रधान.
    भारताचे कायम दुर्दैव  आहे या देशाला एकसंघ व ख-या प्रगतीकडे नेणारा व धर्म  जात या पलीकड जावून मानवतावादी  धर्म निर्माण  करणारा
 युग पूरूष मिळाला नाही.
असे महा पुरूष या देशात जन्माला आले नाहीत असे नाही पण व्यवस्थेने त्यांना  नीट जगूही दिले नाही.
 जय भारत .
डॉ  दाभाडे

एक कूठंतरी वाचलेली गोष्ट आठवली. अकबर बादशहाने बिरबलाला त्याच्या राज्यातील पाच अव्वल महामूर्ख शोधून आणण्याचे फर्मावले.

 एक कूठंतरी वाचलेली गोष्ट आठवली. अकबर बादशहाने बिरबलाला त्याच्या राज्यातील पाच अव्वल महामूर्ख शोधून आणण्याचे फर्मावले. बिरबलाने तीन चार महिने अखंड मेहनत घेऊन पाच महामूर्ख शोधल्याचा आणि उद्या त्याना दरबारात हजर करण्याचा निरोप बादशहाकडे पाठवला. इकडे जनतेची ते पाच महामूर्ख पहाण्याची उत्सुकता शीगेला पोहोचली होती. अखेर दुसरा दिवस उजाडला, ते पाच महामूर्ख पहाण्यासाठी जनता प्रचंड संख्येने दरबारासमोरील मैदानात हजर झाली. कांही वेळाने बिरबलाचे आगमन झाले, पण बिरबला सोबत फक्त दोनच माणसे होती हे पाहून अकबर म्हणाला, "बिरबल, तुला पाच महामूर्ख दाखवायचेत मग दोनच लोक कसे आणलेस?" बिरबल म्हणाला,"महाराज थोडा वेळ थांबा मी पाचही महामूर्ख आपणास दाखवतो" असे म्हणून बिरबलाने शेवटच्या क्रमाने एकेका महामूर्खाची ओळख करूनद्यायला सुरूवात केली. "महाराज हा महामूर्ख क्रमांक पाच! याचे नाव शेखचिल्ली हा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता" हे ऐकून सारी जनता हसू लागली. नंतर बिरबलाने चौथ्या महामूर्खाची ओळख करूनदिली,"महाराज हा महामूर्ख क्रमांक चार! हा बैलांना ज्वारीच्या पोत्याचे ओझे होऊ नये म्हणून पोते आपल्या डोक्यावर घेऊन बैलगाडीत बसला होता" जनता पून्हा हसली. आता मात्र बादशहा अन जनतेची उत्सुकता वाढली बादशहा म्हणाला, बिरबल, बाकीचे तीन महामूर्ख कूठं आहेत?" बिरबल म्हणाला, "महाराज, तिसरा महामूर्ख मी स्वतः आहे". सारेजण स्तब्ध झाले. बिरबल पुढे म्हणाला," महाराज, राज्यात बेरोजगारी,महागाई, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अशा हजारो समस्या असताना मी असल्या (महामूर्ख शोधण्याच्या कामात) वेळ घालवला म्हणजे तिसरा महामूर्ख मी स्वतः आहे". बादशहा आणि जनता थोडीशी वरमली. पण उरलेलेले दोन महामूर्ख पहाण्याची उत्सुकताही वाढली. बादशहा म्हणाला, "बिरबल, दुसरा महामूर्ख कोण आहे?" बिरबल म्हणाला,"महाराज दुसरे महामूर्ख तूम्ही स्वतः आहात". आता मात्र बादशहाची सटकली, रागानेच बादशहाने विचारले," बिरबला, मी कसा रे मूर्ख? बिरबल म्हणाला,"महाराज, सेम आन्सर! राज्यात इतक्या समस्या असताना आपण असल्या फालतू कामात रस घेता म्हणून तूम्ही दुसर्या नंबरचे महामूर्ख!" संतापलेल्या बादशहाला पहिल्या नंबराचा महामूर्खही जाणून घ्यायची इच्छा होतीच! आपला राग कसाबसा आवरत बादशहाने पहिला महामूर्ख कोण अशी विचारणा केली. बिरबल म्हणाला, "महाराज याचेही उत्तर वरीलप्रमाणेच आहे, राज्यात एवढ्या समस्या असताना त्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येण्याऐवजी ही जनता या फालतू कार्यक्रमात एकत्र येऊन एन्जाँय करते आहे, म्हणून पहिल्या क्रमांकाची महामूर्ख जनता आहे". सुचना : (या गोष्टीचा संबंध योगादिन साजरा करण्याचा आदेश देणारे सरकार आणि ते एन्जाँय करणारी जनता यांचेशी जोडू नये).

मी "छत्रपतींवर" कविता लिहिली त्यांनी मला फोन करून विचारले "तुम्ही मराठा आहे का?"

मी  "छत्रपतींवर" कविता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"

मी "बाबासाहेबांवर" कवि ता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही बौध्द किंवा दलित आहे का?"

मी "फुल्यांवर" कविता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"

मीअहिल्या देवींवर कविता लिहीली
त्यांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का"

मी "माणसावर" कविता लिहिली
मला
फोनच आला नाही............

वाट पाहतोय.......
माणसे  गेली कुठे फ़क्त आणि
फ़क्त जात राहिली आहे.