बुद्ध, धम्म आणि संघाला नियमित अभिवादन केल्याने होणारे चार प्रकारचे लाभ. पंचशीलचे काटेकोरपणे पालन केल्याने होणारे सात प्रकारचे लाभ. मैत्री भावना सतत जोपासल्याने होणारे अकरा प्रकारचे लाभ आणि सतत बुद्ध विहारात येत असल्याने होणारे 32 प्रकारचे लाभ असे एकूण 54 प्रकारचे लाभ तो वर्ग मिळवतो मनुन त्यांच्यावर कोणतीही आपत्ती सहसा येत नाही. बुद्ध धम्म आणि संघाच्या प्रतापा ने आणि प्रभावाने त्यांचे सदैव कल्याण होते रक्षण होते. त्यांच्या घरामध्ये सुख शांती,वैभव सदा खेळत नांदते, म्हणून तर डॉ. बाबासाहेबांनी प्रत्येकाला आपल्या कुटुंबासह दर रविवारी बुद्धविहारात जाण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
आपल्या लेकरांना हा आदेश देताना डॉ. बाबासाहेबांनी सांगितले असे नाही. तर प्रथम ते स्वतः बुद्धविहारात गेले. त्यांनी वरील सर्व लाभ मिळवले आणि नंतर त्यानी आपल्याला सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे बुद्धत्वाकडे वाटचाल करणारे सत्व म्हणून त्यांना बोधिसत्व असे म्हणतात. त्या बोधिसत्वाचे ज्यांनी ऐकले व ऐकून तसे आचरण केले, कल्याण त्यांचेच झाले. मंगल त्यांचेच झाले. राक्षणही त्यांचेच झाले आणि त्यांचे जीवन सार्थकी लागलंए आणि ज्यांनी ऐकले नाही, ते मात्र कुठचेच राहिले नाहीत. याला इतिहास साक्षी असून वर्तमानात आम्ही पाहत आहात कि, त्यांचे काय होत आहेत आणि हे त्रिकाल सत्य आहे.
No comments:
Post a Comment