Wednesday, 8 June 2016

माफ करा बाबा

माफ करा बाबा

बाबा
नका येऊ
परत तुम्ही
कारण
इथं आल्यावर
तुम्हाला
कोणत्या पक्षात
घ्यायचं
याचीच वढातांन
सुरु राहील
अन् विषय राहिला
आमचा बाबा
तर आम्ही
गद्दार झालो आहोत
वेगवेळ्या गटात
वाटलो गेलो आहोत
आमचा निळा झेंडा
फक्त 14 एप्रिललाच फडकतो
बाकी दिवस तो
इतर पक्षात जाऊन अडकतो
खूप केलत बाबा तुम्ही
आम्हाला त्याची जाण नाही
अन् पुन्हा कमरेला
झाडू आल्याशिवाय
स्वतःला तुमचे
अनुयायी म्हणवणारे
बहुदा सुधारणार नाही.

रवींद्र कांबळे 9112143360

No comments:

Post a Comment