हरवला बुद्ध माझा
देवाच्या गर्दीत....
वागतो समाज माझा
स्वतःच्या मर्जीत....
जान नाही कोणा
आता भिमाच्या त्यागाची....
चढली नशा सर्वांना
कागदाच्या नोटांची....
नवस करतो
बोकड कापतो
पीतो दारू
करतो मांसाहार
कळलंच नाही
अजून मला
मी बौद्ध
की महार ! !
जेवढा शिकलो
तेव्हढाच चुकलो
बुद्धाच्या शिलाला
अजूनही मुकलो
टीळा लावतो
चंदन लावतो
सनावाराला
देवाकडे धावतो
उपास तापास करून
करतो स्वप्ने साकार !
कळलच नाही
अजून मला
मी बौद्ध
की महार ! !
पनौती लागते
गरीबी येते
जेंव्हा होतो
संसाराचा खोळंबा
तारतो तेंव्हा मज येऊन
देव माझा खंडोबा
सुख दुखाला मी
देव देवतेलाच आमंत्रण दिले
अजूनही आंबेडकरी विचार
डोक्यात माझ्या नाही गेले
मंदिरात जाऊन दर दिवशी
चढवतो देवांवर पुष्प हार !
कळलंच नाही
मला अजून
मी बौद्ध
की महार ! !
देवाच्या गर्दीत....
वागतो समाज माझा
स्वतःच्या मर्जीत....
जान नाही कोणा
आता भिमाच्या त्यागाची....
चढली नशा सर्वांना
कागदाच्या नोटांची....
नवस करतो
बोकड कापतो
पीतो दारू
करतो मांसाहार
कळलंच नाही
अजून मला
मी बौद्ध
की महार ! !
जेवढा शिकलो
तेव्हढाच चुकलो
बुद्धाच्या शिलाला
अजूनही मुकलो
टीळा लावतो
चंदन लावतो
सनावाराला
देवाकडे धावतो
उपास तापास करून
करतो स्वप्ने साकार !
कळलच नाही
अजून मला
मी बौद्ध
की महार ! !
पनौती लागते
गरीबी येते
जेंव्हा होतो
संसाराचा खोळंबा
तारतो तेंव्हा मज येऊन
देव माझा खंडोबा
सुख दुखाला मी
देव देवतेलाच आमंत्रण दिले
अजूनही आंबेडकरी विचार
डोक्यात माझ्या नाही गेले
मंदिरात जाऊन दर दिवशी
चढवतो देवांवर पुष्प हार !
कळलंच नाही
मला अजून
मी बौद्ध
की महार ! !
No comments:
Post a Comment