Wednesday, 1 June 2016

"माणसाची कविता"

"माणसाची कविता"


मी  "छत्रपतींवर" कविता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही मराठा आहे का?"

मी "बाबासाहेबांवर" कविता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही दलित आहे का?"

मी "फुल्यांवर" कविता लिहिली
त्यांनी मला फोन करून विचारले
"तुम्ही माळी आहे का?"

मीअहिल्या देवींवर कविता लिहीली
त्यांचा मला फोन आला
अन विचारले
"तुम्ही धनगर अहात का"

मी "माणसावर" कविता लिहिली
मला
फोनच आला नाही............

वाट पाहतोय.......

No comments:

Post a Comment