Wednesday, 8 June 2016

डाॅ. बाबासाहेबांचा शेवटचा संदेश... मंगळवार दि.31जुलै1956.

डाॅ. बाबासाहेबांचा शेवटचा संदेश...
मंगळवार दि.31जुलै1956.
     माझी पहिली खंत ही आहे की, मी माझे जीवन कार्य पुर्ण करू शकलेलो नाही.माझे लोक इतर समाजाशी बरोबरीपुर्वक राजकीय सत्तेचे वाटेकरी होऊन सत्ताधारक वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती.जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा ' मुठभर सुशिक्षितांनी ' घेतला आहे,पण ' त्यांचे विश्वासघातकी वागणे ' आणि दलित शोषितांबद्दची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असेच म्हणावे लागेल.ते माझ्या कल्पना शक्तीच्या पलीकडे गेले आहे.ते फक्त स्वत:साठी आणि त्याच्यां व्यक्तीगत फायद्यासाठीच जगतात.त्याच्यांपैकी एकही जन सामाजिक कार्य करायला तयार नसतो.ते आत्मघाताच्या वाटेने निघाले आहेत.माझ्या ज्या सहकार्याबद्दल ती चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरवसा होता ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकांत भांडत आहेत.त्यांच्या शिरावर येऊ घातलेली जबाबदारी ही किती मोठी आहे त्यांच्या ध्यानी मनीही असल्याचे दिसत नाही.
        मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकठयाच्या बळावर मिळवले आहे.ते करताना पिळवटून टाकणार्या संकटांचा आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला.सगळीकडून विशेषत: हिंदू वृत्तपत्रसृष्टीकडून माझ्यावर शिव्याशापांचा वर्षाव सतत होत राहिला.जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला,माझ्या स्वत:च्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले,त्यांच्याशीही मी दोन हात केले.मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत देशाची आणि पददलितांची सेवा करीतच राहीन.हा काफला(चळवळ)आज जेथे दिसतो तेथे त्याला आणता-आणता मला खूप सायास पडले.हा काफला असाच त्यांनी पूढे आणखी पूढे चालू ठेवावा.वाटेत अनेक अडथळे येतील,अडचणी येतील,अकल्पित संकटे कोसळतील, पण वाटचाल सुरूच ठेवावी.त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्वक जीवन जगायची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी पेलायलाच पाहिजे.जर माझे लोक माझे सहकारी हा काफला पूढे नण्यास असमर्थ ठरलेच तर किमान तो आज जेथे आहे तेथे तरी त्यांनी त्यास राहू द्यावे.कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या काफल्यास परत फिरू देऊ नये.हा माझा संदेश आहे.बहूधा शेवटचा संदेश आहे.मी तो अत्यंत गंभीरपणे देत आहे आणि या गांभीर्याला नजरे आड केले जाणार नाही अशी खात्री मला वाटते.

संदर्भ:डाॅ बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी-
नानक चंद रत्तू.
पृष्ठ 227-230.
(कृपाया, सर्व बौध्दांना आणि इतर आंबेडकरी विचाराच्या कार्यकर्त्यांना पाठवावा.)

No comments:

Post a Comment