Monday, 6 June 2016

........" हम कभी नही सुधरेंगे " ............

  ( महाराज माफ करा- हर्षल बागल)
     आत्ताच कानावर बातमी आली,  स्वराज्याची राजधानी सर्व गडकोटांचा राजा म्हणजे रायगड येथे "6 जुन " रोजी कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याअभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. जोरात प्रसिध्दी सुरू आहे. सोहळा कोल्हापुर च्या राज गादीचे वारसदार छत्रपती संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. संभाजी राजे यांनीच फडणवीस यांना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं,  यावरुन मला वाटतं आपण इतिहासातुन आपन काय शिकलो,  इतिहास हा फक्त वाचायचा नसतो तर आपल्या इतिहासातुन बोध घ्यायचा असतो व सुधरायचं देखील असते, याच विषयावर चितंन मंथन करित बसलो.
     मन भुतकाळात गेलं अचानक समोर घोड्याचा लगाम खेचत छत्रपती शिवाजी महाराज आले. राजे घोड्यावरुन खाली ऊतरतच म्हणाले , " माझ्या राज्याअभिषेकाला फडणवीसला बोलावलंत मोठा पराक्रम केला,  अरे ज्यांनी माझ्या याच राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशेवर्षापुर्वी गल्ली ते दिल्ली ब्राम्हणांनी विरोध केला त्यांच्याच छावणीत तयार झालेल्या फडणवीसला तुम्ही प्रमुख म्हणुन बोलवलं,  अरे स्वराज्यात एकही ब्राम्हण तयार झाला नाही माझा राज्याभिषेक करायला , त्यासाठी मला काशीवरुन गागाभट्टाला लाच देऊन हजारो होन देऊन , सोन्या चांदीच्या मोहरा देऊन मला त्याला बोलवावं लागलं,  आणी त्याच गागाभट्टाने पायाच्या अगंठ्याने कुंमकुम तिलक लावुन माझा राज्याभिषेकाचा अपमान केला, शिवरायांचे हे खडे बोल ऐैकत असतानाच समोर ......
       संत तुकोबाराय आले व म्हणाले मी माझ्या लेखणीतुनच अभंगात लिहुन ठेवलय, की मी स्वता वैकुठं नाकारला आहे. तरी मला यांच फडणवीसच्या जातभाईंनी मला एकट्यालाच वैकुठांला पाठवलं.  बरं ठिक मग ते वैकुठांत सोडायला आलेले विमान कोठे ऊतरले यांच संशोधन अमेरिकेतील शास्त्रन्यांनी करावं अशी सुपारी येथील देशभक्तांनी द्यावी. युवराज तुम्ही ज्यांना रायगडावर पाहुणे म्हणुन बोलवलतं त्यांच्याच पुर्वजांनी मला इंद्रायणीच्या पाण्यात बुडबुवुन मारलं माझी हत्या केली. आणी भोळ्या लोकांना सांगितले की मी वैकुठाला गेलो. मी शिवरायांना वारकऱ्यांबरोबर धारकरी निर्माण करुन देते होतो म्हणुन माझी हत्या याच फडणविसाच्या पुर्वजांनी केली. आणी त्याच जाणवंधारी फडणविसाला तुम्ही रायगडा र सहा जुनला बोलवलंत मला तर हि अपेक्षाच नव्हती....
    तेवढ्यात शेतकऱ्यांचा असुड हा ग्रंथ घेऊन " महात्मा फुले "समोर आले आणी म्हणाले काय रे विसरलात का तुम्ही याच औलांदीनी तुम्हाला शिक्षण नाकारले यांनीच शिवरायांच्या गुरूत्वाचा वाद निर्माण केला,  यांनीच माझ्या सावित्रीला शिक्षणाचा प्रसार व प्रचार करताना अगांवर शोणाचे गोळे व दगड गोटे फेकुन मारले तरिही सावित्री डगमगली नाही यांच्या नाकावरुन टिचुन पणे सावित्रीने शिक्षण दिले यांचा मार सहन करुन देखील सावित्री मागे हटली नाही, महात्मा फुलेंच हे बोलनं सुरू असतानाच ....
      छत्रपती राजर्शी शाहु महाराज वाघाच्या बछड्यावर हात फिरवत पुढे आले तिक्ष्ण नजर माझ्या डोळ्यावर ठेवुन मला सांगू लागले अरे वेदोक्त प्रकरणात मी छत्रपती असतानाही मला या भट्टांनी विरोध केला,  मी पण छत्रपती आहे मागे सरकेल तो कसला,  मी त्यांना पुरून ऊरलो पण भट्टापुढे कधीच नतमस्तक झालो नाही,  मी बहुजन पोरांसाटी शिक्षण संस्था काढल्या मी काँलेज शाळा सुरू केले पण आज दुर्दैव माझं की मी काढलेल्या शाळा व काँलेजमध्ये सुध्दा यांचेच वर्चस्व आहे. स्वताला माझे वारसदार म्हणनारे काय झोपलेत का?  मंध्यतरी फर्ग्युसन काँलेजमध्ये बहुजन पोरांना देशविरोधी गुन्ह्यात अडकवण्याचे राजकारण झाले तिथे माझे आजचे वारसदार काहीच बोलले नाहीत,  अरे युवराजांनो मीच फर्ग्युसन काँलेजच्या इमारतीसाठी देणगी दिली.  आणी आज माझ्याच बहुजन लेकरांना तिथे  दाबलं जातयं कारण तिथे याच भट्टुकड्यांची सत्ता आहे. शाहुमहाराज रागारागात सांगत होते मी फक्त शाहू महाराजांच्या चरणाकडे नजर ठेवुन सगळं ऐैकत होतो.  महाराज पुढे म्हणालेत मीच आरक्षण संकल्पना लागू केली. आण आज रायगडवर येनाऱ्या याच शिवद्रोह्यांनी आरक्षण संकल्पना नाकारली आहे. मराठ्यांचे दिलेले आरक्षण काढुन घेतले तरिही माझे वारसदार यांचेच सत्कार करत आहेत.  शाहू महाराजांच हे सांगत असताना मन भरुन आलते. पण काय करणार आम्ही ज्यांना छत्रपतींचे  वारसदार समजतो त्यांना हे समजलं पाहिजे.
     माझ्या समोर एक एक महापुरूष येत होते.  भारतरत्न डाँ बाबासाहेब सुध्दा हातात घटना घेऊन पुढे आले आणी मला जाब विचारला .... बाबासाहेब म्हणाले " माझ्या दिनदलितांना पाण्याचा समान हक्क ज्या भट्टवादी संस्क्रुतीने नाकारला त्या दिनदलितांसाठी मी याच रायगडाच्या पायथ्याशी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. आणी आज याच रायगडावर हिच भट्टवादी येत आहे. मला बाबासाहेब पुढे म्हणतात ज्यांनी म्हैसुरचं राज्य स्वतंत्र्य राष्ट्र घोषित करा व तसेच  हिन्दूंस्थान व पाकिस्तान अशी दोन राष्ट्रे निर्माण करा अशी सर्वप्रथम मागणी करणारे स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांची माफीमागुन सवलती मिळवणारे माफिवीर वि.दा.सावरकर बरोबर माझ्या कार्याची गनना केली जात आहे . काल परवा शरद पोक्षें नावाचा पक्षी म्हणतो की बाबासाहेबांपेक्षा सावरकारांनी जातीनिर्मुलनांच काम काकणभर जास्त केलं आणी सहा जुनला रायगडावर येणारे फडणवीस या सावरकर च्या विचाराचे समर्थक आजचे नव्हे तर पुर्वीचे आहेत तरी देखील त्याला रायगडावर सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलवलं जातयं " असे म्हणत बाबासाहेबांनी हळुवार मान खाली घातली.
    मी हळुवार या सर्व महापुरषांना ऊत्तरात बोललो ... " काय करणार सत्ता त्यांची राज्य त्यांच विचार त्यांचा " तेवढ्यात छत्रपती शिवराय तलवारीच्या मुठीवर बोटं घट्ट धरत म्हणाले अरे सत्ता व राज्य त्यांच असलं तरी वारसदार तर माझेच आहेच ना त्या माझ्या वारसदारांना समजत नाही का?  माझ्या माँसाहेब या राष्ट्राची माता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ च्या चरत्र्यावर शिंतोडे ऊडवणाऱ्या बाबा पुरंदरे ला पुरस्कार याच फडणवीसने मराठ्यांच्या नाकावर टिचुन दिला आणी आमचे वारसदार जे स्वताला म्हणवुन घेतात त्यांनी काय केलं  बघ्याची भुमिका घेतली.  माझ्या मराठा समाजाला दिलेंल आरक्षण याच फडणवीसने सत्ता येताच काढुन घेतले  . आणी याच फडणविसला आज रायगडावर बोलवलं जातयं वा काय अच्छे दिन आणलेत .... असे म्हणत शिवराय, संत तुकोबाराय , महात्मा फुले,  शाहू महाराज,  बाबासाहेब एक एक निघुन गेले  .
    जर खरंच छत्रपतींचे वारसदार असतील तर त्यांना  मी हर्षल बागल मराठा म्हणुन मी शिवराय फुले शाहू आबेंडकर चळवळीतला कार्यकर्ता म्हणुन एक हरकत आहे तुम्ही खुशाल फडणवीसला बोलवा  काहीच वाटणार नाही. तुम्ही गडकरी - काय भागवत ला सुध्दा बोलवा  . पण रायगडावर आल्यावर त्या फडणवीसला माफी मागायला लावा कि त्याच्याकडुन लिहुन घ्या.... " आमच्या पुर्वजांनी शिवरायांना राज्याभिषेकाला विरोध करणं चुकिचं होतं,  आमच्या पुर्वजांनी संत तुकोबारांयाची हत्या करायला नव्हती पाहिजे  , आमच्या पुर्वजांनी महात्मा फुले व सावित्री फुले यांना त्रास देणं चुकिचं होतं.  आमच्या पुर्वजांनी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महारांजांना वेदोक्त प्रकऱणावेळी खुप त्रास दिला. आमच्या पुर्वजांनी बाबासाहेबांना शाळेत साधं चिटकुन घेतलं नाही  , आमच्याच जातीचा बाबा पुरंदरे असल्यामुळे मी स्वताच बाबा पुरंदरेला सर्व मराठ्यांचा विरोध डावलुन पुरस्कार द्यायला नको होता. मी तो पुरस्काल परत घेतो. सनातन धर्म वाढवायला नको होता  , दाभोळकर पानसरे यांच्या हत्येचे हत्यारे सनातनवर बंदी घालतो. मराठ्यांना मिळालेलं आरक्षण आम्ही सत्तेत आल्यावर काढुन घेतंल त्याबद्दल मी मराठा समाजांची जाहिर माफी मागतो. तसेच भाडांरकर व वाघ्या कुत्रा या प्रकरणात ज्या कार्यकरत्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांच्या तारखेवर तारिख काढण्याचं काम मीच केले. त्याबद्दल त्या कार्यकर्त्यांचे मी माफी मागतो त्यांच्याच्यावरील सर्व गुन्हे मागे घेतो. असे लेखी अश्वासन देतो तसेच वेळोवेळी आमच्या पुर्वजांनी महापुरषांना जो त्रास दिला त्याबद्दल मी याच रायगडाच्या मातीवर ऊभा राहुन मी देवेंन्द्र फडणवीस माझ्या समाजाच्या वतिने माफी मागतो.
    अशी जर जाहिर माफी मागुन घेण्याची छाताडात रग व धग असेल तर आमच्या सन्मानीय छत्रपतींचे वारसदार युवराज संभाजी राजेंनी त्या फडणविसला रायगडावर बोलवायला काहिच हरकत नाही,  जर तुम्ही त्याला बोलवुन तेथे मान सन्मान देत असाल तर 6 जुन रोजी राज्याभिषेकाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर नसतील याची काळजी घ्या  . कारण सिंदखेडला हाच फडणविस अाला व नंतर पुरंदरेला पुरस्कार दिला  . अकोल्यात देखील गडकरीला बोलाववलं आणी आत्ता तुम्ही रायगडावर सुडबूध्दीच्या व्यक्तीमत्वाला म्हणजेच फडणवीसला बोलवले आहे. थोरल्या आऊसाहेबांनी व आबासाहेबांनी याला कधीच मान्यता दिली नसती व चुकिला माफी सुध्दा दिली नसती.
     इतिहास विसरणारी माणंस कधीच इतिहास घडवु शकत नाहीत हे आपल्याला माहित असुनही जर सुधरत नसतील तर आपली माणसं व हम कब सुधरेंगे.
    अनेकांच मन हे दुखलं असेल पण आमच्या अस्मितेला याच फडणवीसने हात घातला तेव्हा आम्हालाही दुखं झालते व आजही आहे. हेच लेखन करताना सत्य व वास्तव मांडल असल्याने पटेल की नाही माहित नाही पण जो शिवराय फुले शाहू आबेंडकर यांच्या विचारांना मानत नाही,  त्यांच्या आपमानाचा बदला घेत नाहीत त्यांना ही रयत मानत नाहीत. त्यामुळे थोरल्या छत्रपतींना साद घालुन सांगतो की महाराज माफ करा.......  ....

           विद्रोही लेखक व व्याख्याते
                     हर्षल बागल

No comments:

Post a Comment