Wednesday, 15 June 2016

निषेध मोर्चे कुठवर....?

निषेध मोर्चे  कुठवर....?
-------------------------
कोणत्याही  समाजाला स्वजाती उत्कर्ष करुन घ्यावयाचा  तर राजकीय  सत्ता हे त्यांचे साधन आणि एकखांबी नेतृत्व  हा सर्वोत्तम  निर्णयआणि उपाय आहे .तेही  जमले नाही तर प्रखर बुद्धीच्या  जोरावर व्यवस्था बदलविणारे आंबेडकरी रक्त पाहीजे. निषेध,मोर्चे ,हा आंबेडकरी रक्ताचा  गुणधर्मच नाही. गेली साठ वर्ष आंबेडकरी चळवळीची   मिळकत काय..?नामांतर पँथरचा अपवाद वगळता हातात काय तर निषेधाचे  पोस्टर. तरुणानो , तुम्ही श्रेयासाठी रस्त्यावर उतरुन वेळ गमवता त्याच वेळेत बाकी बहूजन लोक विधानसभा लोकसभा गाठतात .कारण तेथेच सर्वहीत सामावले आहे हे त्यानी वाचलय.आपणही हाच वेळ आणि सळसळणारी उर्जा संघटीत करुन सत्ता प्राप्ती केलात तर तुमच्याकडे लोकांच्या निवेदनाचे ढिगारे पडतील. जसे भारतपिता डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर असंख्य देशविदेशी दिग्गजाचे पडायचे ..
मिञहो माझ्या  ह्या विचाराना
नकारात्मक प्रतिसाद मिळेल तसा निषेधही होईल कारण आपली चळवळ मनोरंजनी सामना आणि निषेध शब्दाच्या अहारी गेल्याने हा उपजत् गुणधर्म बनला आहे  . याची मला जाणीव आहे. तरीही ज्यांच्या  बापापुढे हिमालय झूकला,त्या बापाला सुर्याने  माझ्या हून तूम्ही प्रखर तेजस्वी अहात हे बिनशर्त मान्य केले . त्या बापाची लेकर केवळ श्रेयासाठी, नाहीतर आपल्याला  पैशे मिळतात म्हणून ज्यावेळी दुसऱ्यांचा झेंडा खांद्यावर घेऊन  जयजयकार करीत फिरतात त्यावेळी एक तूमचाच भाऊ म्हणून मन अस्वस्थ होते. त्या अस्वस्थ भावाची ही वेदना होय. प्रा. सुनिलचंद्र सोनकांबळे

No comments:

Post a Comment