Thursday, 23 June 2016

* पोस्ट नः 73 ** बुध्द आणि त्यांचा धम्म प्रथम खंडः भाग पाचवा 4) उपनिषदे आणि त्यांची शिकवण

* पोस्ट नः 73 **
    बुध्द आणि त्यांचा धम्म
    प्रथम खंडः भाग पाचवा
4) उपनिषदे आणि त्यांची शिकवण

1) उपनिषदे हे वाडमयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होते उपनिषदे वेदांचा भाग नव्हते कोणताही धार्मिक कायदा यात सांगितला नाही
2) असे असुनही उपनिषदे हा धार्मिक वाड्मयाचाच एक भाग झाला
3) उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे ब्राम्हण पुरोहीत यांच्या विरुध्द असल्याबद्दल गणली जात
4) त्यापैकी काही उपनिषदे वैदिक ब्राम्हण पुरोहीत यांच्या विरुध्द असल्याबद्दल गणली जात
5) वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय याविषयी या सर्वाचे एकमत होते
6) चार वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय याविषयी या सर्वाचे एकमत होते
7) वेद हे ईश्वरनिर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते
8) यज्ञ व त्यांचे फल औध्र्वदेहिक आहुती आणि ब्राम्हणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राम्हणी तत्वज्ञानातील मूलभुत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वाचे एकमत होते
9) तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता त्यांनी केलेली चर्चा ब्रम्ह व आत्मा यांच्यावर केर्दिंत झाली होती
10) विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रम्ह हे सर्वव्यापी तत्व असुन आत्म्याने परमात्याचे ज्ञान करुन घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे
11) उपनिषदांचा मुख्य सिध्दांत असा कि ब्रम्ह हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रम्हच होय उपाधीत गुंतल्यासारखे आत्म्याला मी ब्रम्ह आहे याची जाणीव होत नाही
12) प्रश्न असा होता कि ब्रम्ह हे सत्य आहे काय ? उपनिषदांचे सिध्दांत मान्य करावयाचे कि नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबुन आहे
13) ब्रम्ह हे  सत्य आहे हे सिध्द करणारा  कोणताही पुरावा बूध्दाला मिळाला नाही म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले
14) उपनिषदांच्या कर्त्याना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते
15) अशा प्रकारचे ज्ञान याज्ञवल्क्यासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते बृहदारण्यकोपनिषदांत याज्ञवल्क्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे
16) त्याला विचारण्यात आले ब्रम्ह म्हणजे काय ? आत्मा म्हणजे काय? या प्रश्नावर नेति नेति मला माहीत नाही मला माहीत नाही एवढेच याज्ञवल्क्य सांगु शकला
17) ज्याच्याविषयी कोणालाच काही माहीत नाही ते सत्य कसे असु शकेल ? असा बुध्दांचा प्रश्न होता उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुध्दांना कोणतीही अडचण भासली नाही

क्रमशः
रोज वाचा
 " बुध्द आणि त्यांचा धम्म "
प्रत्येक रविवारी बुध्द विहारात गेलेच पाहिजे
विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर

No comments:

Post a Comment