Thursday, 23 June 2016

26 वर्षांनंतर नवबौद्धांना दिलासा, नोकरी आणि शिक्षणात मिळणार सवलती...

26 वर्षांनंतर नवबौद्धांना दिलासा, नोकरी आणि शिक्षणात मिळणार सवलती...

तब्बल 26 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नवबौद्धांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. नवबौद्धांना केंद्र सरकारने मोठा दिलासा असून या पुढे आरक्षण, शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये सवलती मिळणार आहे. केंद्रीय समाज कल्याणमंत्री थावरचंद गहेलोत यांनी आज यासंबंधी घोषणा केली आहे.

बौद्ध धर्म स्विकारणार्‍या नवबौद्धांना आरक्षण आणि नोकर्‍यांमधील आरक्षणापासून वंचित राहावे लागत होते. यापूर्वी 1956 नंतर बौद्ध धर्म स्विकारणार्‍यांना केंद्राच्या सवलती मिळत नव्हत्या. त्यांना केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये आणि शिक्षणातल्या सवलती मिळत नव्हत्या. आता मात्र, ही परिस्थिती बदलणार आहे. केंद्रीय समाज कल्याणमंत्री थावरचंद गहेलोत यांनी आज यासंबंधी घोषणा केली. त्यानुसार, नवबौद्धांना यापुढे आरक्षण आणि नोकर्‍यांमध्ये आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातल्या नवबौद्धांना मिळणार आहे. आत्तापर्यंत केंद्राच्या यादीत असलेल्या जातींनाच केंद्र सरकारच्या योजनांच्या सवलती मिळत होत्या. महाराष्ट्रातल्या नवबौद्धांचा त्यामध्ये समावेश नव्हता. त्यामुळे महाराष्ट्रातल्या नवबौद्धांना त्याचा फटका बसत होता. नवबौद्धांना या सवलती मिळाव्यात यासाठी तब्बल 26 वर्षांपासून संघर्ष सुरू होता. अखेर त्याला आता यश मिळालंय.

- http://www.ibnlokmat.tv/archives/220073

No comments:

Post a Comment