Friday, 24 June 2016

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बंगल्यावर अतिक्रमण, हे ऐकूनच धक्का बसतो

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या बंगल्यावर अतिक्रमण, हे ऐकूनच
धक्का बसतो. मात्र, हे खरे आहे. 54
वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळेगाव
दाभाडे येथील बंगल्यावर
डिसुझा नावाच्या व्यक्तीने
अतिक्रमण केले. त्यानंतर बाबासाहेबांचे नावच
त्या बंगल्यावरून मिटविले गेले. मात्र,
बाबासाहेबांचा हा बंगला शोधला विदर्भातील
भीमसैनिक किसन कान्हबाजी थूल
यांनी; आणि आठ
वर्षे न्यायालयीन लढा लढून तो बंगला
भीमराव
रामजी आंबेडकरांच्या नावावर केला. धम्मचक्र
प्रवर्तनदिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमीवर
आले
असता किसन थूल यांनी त्यांच्या लढ्याचा इतिहास
सांगितला. किसन थूल. रा. महाडोळी.
तालुका वरोरा. जिल्हा चंद्रपूर.
पत्नी शिक्षिका असल्याने ते सध्या पुणे
जिल्ह्यातील
तळेगाव दाभाडे येथे वास्तव्याला आहेत.
कोट्यवधी भीमसैनिकांचे प्रेरणास्थान
असलेल्या डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांची 50 एकर
शेती आणि बंगला येथेच. मात्र,
त्याची कोणालाही माहिती
नाही.
बाबासाहेबांचा तो बंगला जीर्ण झाला. त्यावर
डिमेलो डिसुझा यांचे अतिक्रमण होते. येथे
बाबासाहेबांचा बंगला असल्याची माहिती
किसन
थूल यांना मिळाली. त्यांच्यातील
भीमसैनिक
जागा झाला. येथून न्यायालयीन लढ्याला सुरवात
झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अभ्यासाचे फार
मोठे व्यासंगी होते, हे सर्वांनाच माहीत
आहे.
समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे,
याकरिता त्यांनी पीपल्स एज्युकेशन
सोसायटीची स्थापना केली. मुंबई
आणि औरंगाबाद
येथे जगविख्यात महाविद्यालय आजही सुरू आहे.
त्याचप्रमाणे पुणे परिसरातसुद्धा असेच महाविद्यालय
व्हावे म्हणून त्यांनी मावळ तालुक्यातील
तळेगाव
दाभाडे येथे 26 नोव्हेंबर 1948 रोजी 37 एकर सहा
आर
तसेच 6 नोव्हेंबर 1951 ला पुन्हा 13 एकर जमीन
घेतल्याची कागदोपत्री नोंद आहे. त्या
गावामध्ये
नयनरम्य ठिकाणी त्यांनी बंगला बांधला.
मोठमोठ्या सभा गाजविल्यानंतर आराम
करण्यासाठी तसेच अभ्यासासाठी ते
या निवांतस्थानी असलेल्या बंगल्यामध्ये येत. मात्र,
येथील बंगल्याची कल्पना इतरानांच काय,
तर
त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा नव्हती. त्यामुळे
2004
पर्यंत तळेगाव दाभाडे येथे बाबासाहेबांचा बंगला आहे,
याची पुसटशी कल्पनासुद्धा
येथील
ग्रामस्थांना नव्हती. चंद्रपूर
जिल्ह्यातील किसन थूल
यांच्या पत्नी माधुरी थूल येथे शिक्षिका
आहेत.
त्यांना एका ग्रामस्थाकडून बाबासाहेब
आंबेडकरांचा येथे
बंगला असल्याची माहिती
मिळाली.
ही माहिती त्यांनी
पती किसन
यांना सांगितली.
लगेच किसन थूल यांनी किरण साळवे यांच्या
मदतीने
बंगला शोधला. शहा-ऍल्टोनो कॉलनीमधील
प्लॉट
क्रमांक 35 वर भीमराव रामजी आंबेडकर
यांच्या नावाने बंगल्याची नोंद आहे. ही नोंद
1956
ते
59 पर्यंतच आहे. त्यानंतर
ही जागा डिमेलो डिसुझा यांच्या
मालकीची झाली.
बाबासाहेबांचा बंगला मिळवायचाच,
असा दृढनिश्चय किसन थूल यांनी केला. यानंतर 2004
पासून सर्व कागदपत्रे गोळा केली. 26
जानेवारी 2006
मध्ये त्यांनी 70 लोकांच्या उपस्थितीमध्ये
पहिली बैठक घेतली. त्यानंतर किसन थूल
यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने स्मारक
समितीची स्थापन केली.
2012 पर्यंत ते न्यायालयीन
लढा लढले. अखेर
न्यायालयाला बाबासाहेबांचा बंगला असल्याचे
मान्य करावे लागले आणि 26 एप्रिल 2012
रोजी हा बंगला अखेर भीमराव
रामजी आंबेडकर
यांच्या नावावर करण्यात आला. हे निवासस्थान
स्मारक व्हावे म्हणून नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात
आला. आठ वर्षे न्यायालयीन लढाईत बाबासाहेब
जिंकले. विदर्भातील खेड्या गावातील किसन
थूल
या भीमसैनिकाने
बाबासाहेबांना त्यांचा बंगला मिळवून दिला.
बाबासाहेबांच्या स्मारकासाठी स्मारक
समितीच्या अध्यक्ष ऍड. रंजनाताई भोसले, लिंबराज
कांबळे, सहदेव डोंबे, तुकाराम मोरे, लक्ष्मण सोनवणे,
श्रावण गायकवाड, देवानंद बनसोडे, गंगाधर सोनवणे,
अंकुश मोरे, रवींद्र शिंदे, युवराज सोनकांबळे,
माधुरी थूल,
रोहिणी आव्होळ, प्रभाकर ओव्हाळ, सुरेश कांबळे,
दिनेश
गवई, विजय नाईक, बी. डी. गायकवाड
प्रयत्नशील
आहेत. या बंगल्यामध्ये बाबासाहेबांच्या अनेक
आठवणींची जपणूक करण्यात
आली आहे.
बाबासाहेबांच्या
बंगल्याची माहिती महाराष्ट्रात
कुणालाही नाही.
ही माहिती सर्वांना व्हावी

No comments:

Post a Comment