Wednesday, 1 June 2016

पॉलीटिकल पॉवर

पॉलीटिकल पॉवर
      तत्कालीन अस्पृश्यांचा राजकारणात 100% शिरकाव डॉ. बाबासाहेब  आंबेडकरामुळे झाला. पहील्या प्रथम अस्पृश्याच्या सामाजिक उध्दारासाठी डॉ. आंबेडकरांनी जो लढा उभारल त्यात मोठ्या प्रमाणात अस्पृश्यांनी भाग घेतला व त्यास नमविण्यासाठी कॉग्रेस व गांधीनी अस्पृश्यांमधील असलेल्या जातीभेदाचा फायदा घेत डॉ. आंबेडकरांशी तेवढे भावनिक नाते, तोपर्यंत न जोडलेल्या अस्पृश्यातील काही जातीना हाताशी धरुण डॉ. आंबेडकरांचे सामाजिक आंदोलन हानुन पाडण्याचा प्रयत्न केला. डॉ. आंबेडकराना अस्पृश्यातील या जातीभेदाचा किती ञास झाला होता, हे त्यांनी स्वता वेळोवेळी बोलुन दाखवले होते. एकुनच बहुजन समाजासाठी अहोराञ झटलेल्या या महापुरुषाला राजकीयरित्या सर्व बहुजन समाजाने जरी कमी जास्त प्रमाणात स्विकारले असले तरी 1956 पर्यत, व धाडसाने बोलायचे झाल्यास 1978 पर्यत दलितातील काही जाती सोडुन इतर बहुजन समाजाने माञ सामाजिक रित्या नाकारले होते, हि वस्तुस्थिती आहे. भारतातील 13% अनुसुचित जातीचा जरी विचार केला तरी हे सर्वाना माहीती आहे की 13% अनुसुचित जातीच्या प्रत्येक श्वासावर डॉ. आंबेडकरांचे न फेडता येण्याजोगे ऋण आहे पण तरीही1956 च्या ऐतिहासीक धर्मातर सोहळ्यास किती अनुसुचित जातीनी सहभाग घेतला होता, यावर चर्चा करणे खरच गरजेचे वाटते का? धर्मातर तर फारची दुरची बाब राहीली सामाजिक जिवनात 'जय भिम' म्हणणारे किती होते, किती आहेत?  डॉ. आंबेडकरांचा धम्म स्विकारण्याचा निर्णय न आवडणारे अनुसुचित जातीतील अनेक जाती डॉ. आंबेडकरांना त्यांचा सामाजिक उत्थानाचा नायक म्हणुन मानण्यास व म्हणुन त्यांची तसबीर घरात लावण्यास व मुखात जय भिम ठेवण्यात का कमी पडली, याचे उत्तर, याची कारणे व याचा इलाज 1978 पर्यत कुणीच का केला नाही?  या उलट ज्या गांधीनी अनुसुचित जातीच्या सामाजिक, राजकिय व आर्थिक प्रगतीचा विरोध केला, तो त्यांचा हिरो कसा ठरला, याचाही शोध घ्यायचा विचार कुण्याही नेत्याच्या, विचारवंताच्या मनात निर्मान का झाला नाही.
परंतु आज परिस्थिती माञ बदलली आहे, डॉ. आंबेडकर व आंबेडकरी विचार हा राजकीय पक्षांची मजबुरी बनली असुन सामाजिक चळवळीचे नेतृत्व आज डॉ. आंबेडकरी विचारात दिसुन येत आहे. अनुसुचित जातीच नव्हे तर अनुसुचित जनजाती, भटके विमुक्त, ओबीसी, अल्पसंख्याक व महाराष्ट्रातील मराठ्यासारखे ताकदवर जातीदेखील डॉ. आंबेडकरांचे गुणगाण गातांना दिसुन येत आहे. याउलट एकवेळी अस्पृश्याचां नायक म्हणुन समोर आलेले गांधी खलनायक वाटु लागले आहेत, गांधीची वाहवा करणारे अनुसुचित जातीचे लोक गद्दार असतात, असे म्हण्यापर्यंत मजल गेल्याची जी कारणे आहेत, त्यालाच मी "कांशीरामलीला" असे नाव दिले आहे.
कुणाला 'लीला' हा शब्द जर ब्राम्हणी वाटला तर त्यांनी 'लीला' ऐवजी 'किमया' शब्द वाचला तरी त्यांना त्याचा योग्य तो अर्थ उमजेल.
आंबेडकर समजुन घ्यायला आम्हाला कांशीरामची गरज नाही, असे म्हणणारे अनेक जण आपणास भेटले असतील, त्यांचे म्हणणे असे आहे की कांशीरामचे गुणगाण गाणारे कांशीरामजीना बाबासाहेबापेक्षा मोठे समजतात. हे साफ चुकीचे आहे. डॉ. आंबेडकरांशी कुणाचीही तुलना होवु शकत नाही, पण डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर विश्वास ठेवुन आंबेडकरी राजकारण व समाजकारण यशस्वी करण्याची लीला दाखवण्याची किमया डॉ. आंबेडकरांसोबत सावलीसारख्या राहीलेल्या नेत्यांनाही जमली नाही, ती माञ कांशीरामजीनी करुण दाखवली म्हणुन ते ग्रेट आहेत. आमच्या नजरेत, मनात डॉ. आंबेडकर व कांशीरामजी हे पिता-पुञ आहेत.

व्यक्तिगत जीवनात अस्पृश्यत्वाचे चटके न भोगणा-या, शैक्षणिक जीवनात आपण अस्पृश्य आहोत याचा कधीही अनुभव न आलेल्या, नौकरी असो की किरायाने घर शोधण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला, अस्पृश्य म्हणुन कधीही मात न खाललेल्या कांशीरामजीना डॉ. आंबेडकरांच्या विचारांने अधिक आकर्षित केले होते, आणि म्हणुनच कांशीरामजीने डॉ. आंबेडकरांना खोलातुन समजुन घेतले. कांशीरामजीचे समाजकारण, राजकारण, धर्मकारण, अर्थकारण हे पुर्णपणे आंबेडकरी विचारावर आधारित असल्यामुळे, त्यांना अपयश येणे शक्यच नव्हते. आंबेडकरांच्या प्रत्येक विचाराला आज्ञेप्रमाणे मानणा-या या भीमपुञाला म्हणुनच कधी अपयश सहन करावे लागले नाही.
महाराष्ट्रात आंबेडकरी राजकारण यशस्वी करण्यासाठी कांशीरामजीनी जी धावपळ केली त्यास इतिहासात दुसरे उदाहरण नाही. सुट्टीच्या एका वादावरुण सुरु झालेला हा कांशीरामनामा उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात सरकार स्थापनेत व देशभरात आंबेडकरी विचाराचा दबदबा निर्माण करण्यासारख्या लीलेत झाल्याचे दिसते. ज्या काही लीला विषयी मला सांगायचे आहे, त्यातली पहीली लीला म्हणजे आंबेडकरी समाजात आत्मविश्वास निर्माण करणे, आंबेडकरी विचार यशस्वी होवु शकतो हे सिध्द करुण दाखवणे ही दुसरी लीला, आणि तिसरी म्हणजे आंबेडकरी विचाराशिवाय देशाचे राजकारण, आंबेडकरी पक्ष सत्तेत, लोकसभेत, विधानसभेत असो व नसो कसे पोकळ होईल हे शञु पक्षाला ही पटवुन देणे, ही होय.

डॉ. आंबेडकरांच्या निर्वाणानंतर आंबेडकरी समाज पोरका झाला होता, वैचारीक वारसा नसलेल्या नेत्याच्यां हाती आंबेडकरी पक्षाची धागेदोरे आल्यामुळे एक तर गुंता वाढला व धागेदोरे अधिक कमजोर होत गेले. शिवाय जी आंदोलने उभारली गेली ती अधिकता भावनेवर आधारीत आंदोलने होती. त्यामुळे आंबेडकरी पक्ष, संघटनेअभावी प्रत्येक निवडनुकीत मात खात गेला, त्याचा परिणाम नेत्याचा व एकंदरीत आंबेडकरी समाजाचा आत्मविश्वास गमविण्यात झाला. गांधी व कॉग्रेसचा सहारा घेतल्याशिवाय निवडनुक जिकंता येत नाही ही भावना, एखादे युध्द हरण्यापेक्षा कमी नक्कीच नव्हती. हा आत्मविश्वास वाढविण्याचे काम कांशीरामजीनी केले. तथागत बुध्दाच्या व डॉ. आंबेडकरांच्या संघटन कौशल्य समजुन त्याचा उपयोग आंबेडकरी विचार आगोदर कर्मचारी व नंतर समाजामध्ये पेरण्यात कांशीराम यशस्वी झाले होते. सरकारी नौकरदार असलेला आंबेडकरी कार्यकर्ता आत्मविश्वास वाढला म्हणुनच गल्लोगल्ली जावुन आंबेडकरी विचार सांगण्याची हिमंत दाखवत होता. कांशीरामजीना आंबेडकरी विचारावर जेवढा विश्वास होता, तेवढा कधीही कुणालाही नव्हता. याचे उदाहरण जर द्यायचे झाले तर कांशीरामजीची एक घोषणा पुष्कळ आहे, ते म्हणतात, "बाबा के बच्चो की मर्जी के बगैर इस देश का शासन नही चलने दुगां". त्याच्यां हयातीत त्यांनी हे सिध्द करुण दाखवले. त्यांच्या मृत्युनंतर बच्चो की मर्जी जरी चालत नसली तरी आत्मविश्वास माञ कायम आहे, आणि खर तर तेच महत्वाचे आहे. युध्द हे आगोदर मनात जिकांवे लागते, नंतर ते युध्दभुमीत जिकंल्या जाते, ते ही सहज. प्रत्येक आंबेडकरी व्यक्तीच्या मनात यशाचा विश्वास निर्माण करणे ही माझ्या ठायी 'कांशीरामलीला' च.

कांशीरामजीनी एखाद्या शास्ञाज्ञाने सारखे आंबेडकरी विचारांची सत्ता यावी म्हणुन अनेक प्रयोग केले. महाराष्ट्र ही प्रयोगशाळा हवा तो निकाल देत नाही म्हणुन त्यांनी प्रयोगशाळा उत्तर प्रदेशला हलवली. जातीव्यवस्थेचा गड मानल्या जाणा-या या प्रदेशात दो पगडीवाले व एक टाय वाले बाबाचे तत्वज्ञान घेवुन त्यांनी कॉग्रेस, बीजेपी सारख्या राजे पक्षांना पार भिखारी बनवुन टाकले, व स्वता राजा बनवुन आंबेडकरी विचार भीख न मागंता यशस्वी होवु शकतो हे सिध्द करुण दाखवले. त्यांची ही लीला जगभर गाजली, पण मानवी शरीराच्या मर्यादेने घोळ घातला नाही तर आतापर्यत बाबाचा हा शेरबच्चा प्रधानमंञी कधीचाच बनला असता.
तिसरी लीला, माञ कांशीरामजीसह सर्व आंबेडकरी समाजाचीही आहे. आज देशापासुन ग्रामपंचायतीच्या राजकारणापर्यत आंबेडकर हे नाव घेतल्याशिवाय कुणाचेही राजकारण पुर्ण होत नाही. कॉग्रेस, बीजेपी सारख्या 101% मनुवादी पक्षानाही आंबेडकरी तत्वज्ञान, इच्छेविरुध्द का होईना, पण मान्य करावे लागते. आंबेडकरी विचाराशिवाय भारतीय राजकारण अपुर्ण आहे एवढे माञ खरे. एकवेळ गांधी हद्दपार होईल पण आंबेडकर हद्दपार करणे आज कुणालाही शक्य नाही. आंबेडकरांविषयी भावनिक नाते हे नैसर्गिक होते, पण ते वैचारीक करुण कांशीरामजीनी आंबेडकरी समाजाला कितीतरी पटीने अधिक आंबेडकर प्रेमी आणि अनुयायी करुण ठेवले आहे. डॉ. आंबेडकर आता पुन्हा होणे नाही, कदाचित कांशीरामही  नाही परंतु काशिराम यांनी  तयार केलेल सक्षम नेतृत्व मायावती हयांनि खंबीरपणे  मनुवादयांशि दोन  दोन  हात करत फुले शाहू आंबेडकर चळवळीला मजबूत कलेले आहे. मायावतींनी  स्वबळावर  2007 ला उत्तर प्रदेशात सरकार स्थापन करून ईतिहास निर्माण केला व उत्तर प्रदेशला  बुद्धिस्ट राज्य  बनवले.
नुकत्याच पार पडलेल्या  बिहार निवडणूकीत  7 लाख मते मिळवली तेही स्वबळावर. सबब मायावती फुले शाहू आंबेडकर चळवळ यशस्वी पुढे  नेत आहेत. फुले शाहू आंबेडकर  यांचे नाव घेऊन धंदा करणारे इतर अनेक  नेते   मनुवादयांचे तळवे चाटत आहे किंबहुना हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे म्हणून  मनुवादी पक्षांना सहकार्य करत आहेत. परंतु मायावती न घाबरता व डगमगता मनुवादी  पक्षांचा  खातमा करण्यासाठी रात्रंदिवस झटत आहे.
मायावतींनी राज्य सभेत आरक्षण बिल पास करून  घेतले व लोकसभेत पास होण्यासाठी प्रयत्न करत आहे.
  काशिंराम व मायावती यांनि नविकणारा समाज बनविला व बाबासाहेबांना डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन   कॅडर बेस कार्यकर्ते तयार केले. मोर्चा , तोडफोड व विघातक  संस्कृती पासुन समाजाला वळवून बाबासाहेबानी सांगितल्या प्रमाणे कायदेशीर व घटनेचा चौकटीत आपले  अधिकार कसे मिळवायचे हे शिकवले. बाबासाहेबांनि सासांगितले विचार प्रत्येकक्षात राबविले व रूजविले. बाबासाहेबांचि व बौद्ध धम्माचि हत्ती निशाणी परत मिळविली. राजकारण चंगळवाद नसुन आपल्या सामाजिक व आर्थिक मुक्तीचे साधन आहे हे समाजाला समजावून सांगितले.  85 टक्के लोकांचा बहुजन समाज बनविला.
 सबब ब.स.पा. बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण करू शकते.

No comments:

Post a Comment