Wednesday, 22 June 2016

उठ भीमाच्या वाघा...✍

उठ भीमाच्या वाघा...✍

अब्रू लुटली जातीची वैऱ्यांनी
समतेचं माती मागते पाणी
विसरलास का बाबाच्या त्या त्यागा
उठ भीमाच्या वाघा हो आता तरी तु जागा !!

बोलवते तुज खैरलांजीची माती
अन्याय झाला तिच्यावरती अति
घे भीममशाल हो दिन दुबळ्याचा दाता
उठ भीमाच्या वाघा हो आता तरी तु जागा !!

आठव तो जावखेडा हत्याकांडं
पाणी नव्हे, वाहत होता रक्ताचा सांडं
फोड वाचा अन्यायाला त्या, हो भीमक्रांतीचा धागा
उठ भीमाच्या वाघा हो आता तरी तु जागा !!

ओळख तुझा तो वैरी आहे कोण
अब्रू लूटतो, जाळितो चिमूरड्या दोन
अरे हो बलशाली ठेच त्या नागा
उठ भीमाच्या वाघा हो आता तरी तु जागा !!

रोहित होता भीम अनुयायी तो सच्चा
का मजबूर केले त्यास, करण्या आत्महत्या
ज्योत पेटवून क्रांतीची कर साऱ्याना तू जागा
उठ भीमाच्या वाघा हो आता तरी तु जागा !!

उठ लढण्या बांध कफन कपाळी
वैऱ्याची ही रात्र आहे काळी.
घे भीम शपथ कर मनाशी तु वादा
उठ भीमाच्या वाघा हो आता तरी तु जागा !!

🙏 जय भिम 🙏

No comments:

Post a Comment