Thursday, 23 June 2016

देव व दानव -- डॉ दाभाडे

 देव   व    दानव
=========
मानला तर देव,जो दैवावर विसंबला त्याचा कार्यभाग  संपला
अशा प्रकारच्या  उक्ती  फार पूर्वी  पासून समाजात रूढ आहेत.
  याच कारणच हे की जे काही करतो ते मानवच करतो मग ते वाईट असो कि चांगले.
मानवतेला धरून जे चांगले ते कार्य  ईश्वरी  कार्य समजावे व  समाजाला घातक ठरनारे कार्य  हे राक्षसी कार्य  समजावे.
देव दानव या काही शक्ती नसून
मानवाच्या प्रवृत्ती  आहेत.
जो चुकीच्या  मार्गाने जाईल तो चुकीच्या ठिकाणी  पोहचेल व जो मानव हिताच्या मार्गाने  जाईल तो
सन्मान  पावेल.
मानवच फक्त  ईश्वर  वा दानव या बाबी मानतो
ईतर सर्व प्राणी या वादात पडत नाहीत  ते निसर्ग  नियमां प्रमाणे  जीवन जगतात. कसलीही ढवळाढवळ  करत नाहीत.
गाय कधी मांस खात नाही किवा सिंह कधी गवत खात नाही.
माणूस  मात्र सर्वच खातो.
मानवाला बुद्धी  दिली आणि  जगाचं पार वाटोळे  झालं
त्याने स्वार्थापायी सर्व निसर्ग  घटकांचा  नाश करत ईतर प्राणी व वनस्पती  चं जीवन संकटात  आणलं
  प्राणी कुठलाही  भेदभाव  करत नाहीत  भेदभाव  उच्च नीचता हलके भारी गरीब श्रीमंत  हे फक्त  मानवातच.
मानवानेच ईतकी मानव हत्या  केल्या की विचारता सोय नाही
जर बुद्धी  देवून मानवाने हे केलं तर ज्यांना  निसर्गाने  बुद्धी  नाही दिली तेच बरे.मानवाने सदाहरीत व निसर्ग  संपन्न  असलेल्या  पृथ्वी चे वाळवंट  केले आहे .
एवढा भयंकर  नाश मानवाने  केला तर देव कुठं लपला आहे तो सजा का देत नाही .
बालकांवर गोळ्या  झाडताना का रोखत नाही.
महीलावर व अबला वरचा  बलात्कार का? रोखत नाही.भ्रष्टाचार  का रोखत नाही.
अत्याचार  का? रोखत  नाही
समाज सुधारकांच्या हत्या का रोखत नाही.
मानवाने  दुष्काळात बिसलरी पिवून तहान भागवली पण जगंलातील प्राणी तडफडून  मेले तेव्हा  कुठं गेला होता देव व देव माननारे  पाखंडी
माझा साधा प्रश्न  आहे का हिंदू  हिंदू  धर्माला 2000 वर्षापासून  आजतागायत  सोडून  जात आहेत.
का? तूम्हांला  घरवापसी करावी लागते ?
पहीले घर का? सोडले हे पहा.
छ.शिवरायांनी ही घर वापसी साडेतिनशे वर्षांपूर्वी  अंमलात  आणली होती. त्याला तेव्हा  कूणी विरोध केला.1956ला करोडो लोकांनी  डॉ  आंबेडकरासोबत हिंदू  धर्म सोडला का? याच उत्तर  कुणी देईल काय.या महामानवाला किती वेदना झाल्या असतील याचा विचार  आजही होत नाही.
     आमचा विरोध ब्राह्मणांना नाही ब्राम्हण्याला आहे.
का आजही समानता नाही?
आठ आठ वर्षांच्या  कोवळ्या  विधवा मुलींना  सरणावर खूले आम
जाळणा-या प्रवृत्ती ला विरोध  नाही करायचा.
महीलांना  मंदिरात प्रवेश नाकारना-या नालायकांना विरोध करायचा नाही.
(या ठिकाणी  महीला विषमता या अर्थाने  पहावे )
एखाद्या  गैर धर्मिय व्यक्ती ला या धर्मात यायचे असेल तर कुठे यायचे
कोण स्वीकारनार त्याला .कोणत्या जातीत यायच त्याने .
हिंदू  धर्मात  यायचे सर्व दरवाजे बंद आहेत.
ऋषिकेष पवार  घेतील काय त्याच्यांत? शिवरायांनी स्व धर्मात परतलेल्या लोकांशी स्वतःची मुलगी देवून नाते जोडले होते.
आहे का हिमंत हे करण्याची?
आज अब्जावधी  रूपयांची संपत्ती  मंदिरात  आहे का नाही खर्च करीत जनतेच्या  कल्याणासाठी.
  भोगंळया साधू वर 2500 कोटी खर्च करता दुष्काळी  भागात  साधा दौराही नाही.
69 वर्षे झाली स्वातंत्र्य  मिळून
अन्न वस्त्र  निवारा ,पाणी व शिक्षण  नाही.
सर्वाना सत्ता देवून पाहीली सगळेच चोर निघालेत.
मोदी कडून आशा धरली होती  पण
हे देशात कमी परदेशात जास्त असतात वर म्हणतात मला भारतात जन्माला आल्याची लाज वाटते.हे देशाचे पंतप्रधान.
    भारताचे कायम दुर्दैव  आहे या देशाला एकसंघ व ख-या प्रगतीकडे नेणारा व धर्म  जात या पलीकड जावून मानवतावादी  धर्म निर्माण  करणारा
 युग पूरूष मिळाला नाही.
असे महा पुरूष या देशात जन्माला आले नाहीत असे नाही पण व्यवस्थेने त्यांना  नीट जगूही दिले नाही.
 जय भारत .
डॉ  दाभाडे

No comments:

Post a Comment