"रिपब्लिकन चळचळीच महाराष्ट्रातल केन्द्र उध्वस्त-समाज मात्र कृतघ्नच"
आजवर रिपब्लिकन चळचळीच्या वेळोवेळी भुमीका जिथून देशभरात जात होत्या,हजारो बैठका मधून रिपब्लिकन चळचळीला याच भुमीतुन नवि दिशा मिळत होती तेच #आंबेडकरभवन आज अस्ताव्यस्त अवस्थेत पाहण्याचा षंढपणा करणारा करणारा समाज कृतघ्नच ना ??? बाबासाहेबाच्या चळचळ उभारनित मुद्रित शिदोरी पुरवणारी बुद्धभुषण प्रिटींग प्रेस आज भग्न झाली आहे सोबतच भारतीय बौद्ध महासभा,रिपब्लिकन सेना,भारिप बहुजन महासंघ यांचे कार्यालय देखील काल रात्री 2:30 वाजता बेकायदा रित्या जातीयवाद्यांची दलाली करणार्याचा हस्तक रत्नाकर गायकवाड याने खाजगी गुंड व जेसीबी लावून जमिन दोस्त केली वर्षानुवर्षे आंबेडकरी जनतेला मुंबईत आधार वाटणारे आंबेडकर भवन आता सत्ताधारी व दलालांच्या पोटपाण्यासाठी नेस्त नाबुत झाल्याचं पाहण्याची नामुष्की आज आपल्यावर ओढावली आहे.आंबेडकर भवनाशी नाते असणारे आज प्रचंड अस्वस्थ झालेत,परंतु ज्यांना आंबेडकर भवन,राजगृह कोणत्या दिशेला आहे हे माहित नसणारे घरात बसुन पुढच्या घटनेची वाट पहात आहेत.
आज आंबेडकर भवन उद्या औरंगाबाद,महाड,पुणे यांच्यासह देशातील अनेक स्फुर्ती स्थळं आपल्या कृतघ्नते मुळे लयास जातील पण आपल्याला त्याच काय???उद्या राजगृहातले उपरे 'राजगृहा' वर देखील डोळा ठेवतील...
एखाद्या वस्तीवर शासनाची नजर पडली,एखाद्या पेपर टायगर नेत्यांच्या अतिक्रमणावर बडगा आला,कारवाईत घरे गेली की निळे झेंडे घेवून न्यायासाठी रस्ते अडविणारे आज मात्र घरात झेंडा गुंडाळून बसलेत.
कारण,आमची घरे दारे अजून शाबुत आहेत पण बाबासाहेबांच्या सहवासाचा सुगंध असणारे एकेक स्थळ तुडवत दलाल आपली पोळी भाजुन घेताहेत.
पण लक्षात ठेवा यातूनच तुमच्या सहनशीलता तपासल्या जात आहेत आणि आता तर आपल्या जाणीवा बधीर झाल्यात हा दावा करण्याचं धाडस दलालांच्या घोळक्यास झाल्यास नवल वाटु नये एवढी सहनशीलता आपण वाढवली आहे.
बाबासाहेब म्हणायचे की,"सहनशीलतेची मर्यादा जिथे संपते,तिथे क्रांतिचा उदय होतो."पण आपली मर्यादा मात्र संपत नाहीये त्यामुळे या वांझोट्या माणसीकतेत क्रांतिचा जन्म होईल???
आजपर्यंत पुस्तके,पक्ष,माणसे संपवली आता तुमच्या स्फुर्ती स्थळांची बारी आहे.
समाजातील दलाल डोक्यावर घेवून मिरवतो पण बाबासाहेबांच कुटुंब वार्यावर सोडून मोकळा होणारा,जाणीवा बधिर झालेला,दलालांच समर्थन करणारा,चळचळीला कमकुवत करणारा,तोंडाने 'बाबासाहेबांना बाप म्हणणारा' पण बाबासाहेबांच्या कुटुंबाशी असलेलं नातं व त्यांच्या प्रतीचे कर्तव्य विसरणारा समाज कृतघ्न नाही तर कोण???
भलेही राजकीय दृष्या आंबेडकरी कुटुंबाला न स्विकारण्याची कारणं उभी केली जातात, शेकडो अफवा पसरवल्या गेल्यात पण बाबासाहेबांच रक्त म्हणून त्यांचे उपकार विसरणारे कृतघ्नच आहेत.
आपण आपल्या बाप-जाद्यांच्या संपत्तीला जिवापाड जपतो,त्यावर अधिकार दाखवतो,प्रसंगी हाणामार्या,कोर्ट कचेरी करतो,हक्क गाजवतो अन् त्यांची अवहेलना झाल्यास हळहळतो तश्याच भावना आंबेडकर कुटुंबाच्या पिई सोसायटी,पिपल्स ईम्प्रूमेंट ट्रस्ट,बौद्धजन पंचायत समिती,राजगृह व बाबासाहेबांच्या ईतर संस्था व समाजाच्या बाबतीत आहे पण स्वतःला चळचळीचे वाहक समजणारे मात्र आंबेडकर कुटुंबाला या सर्व वास्तुपासुन वंचित ठेवून बाबासाहेबांच्या उपकारचे चांगलेच पांग फेडत आहेत. होय ना??परंतु बाबासाहेबांच्या पुण्याईने जगण्यास समर्थ झालेला सुशिक्षीत समाज आज बाबासाहेबांना धोका देणाराच ठरला आहे हे कडु सत्य आहे अर्थात कृतघ्नच ठरतोय पण आंबेडकर कुटुंबा सोबत असणारा प्रत्येक भिम सैनिक सदैव जिवावर उदार होऊन त्यांचा पाठीशीच राहतो प्रसंगी प्राण पणास लावतोय- लावत राहिल, स्वमग्न लोक मात्र कृतघ्नच राहतील.
-सचिन निकम.
रिपब्लिकन विद्यार्थी सेना,औरंगाबाद
मो.9270049458/8975823580/9096281181

No comments:
Post a Comment