Tuesday, 7 June 2016

मी जयभिम घेताच तुले मोठा राग आला -महाकवी नामदेव ढसाळ

मी जयभिम घेताच
तुले मोठा राग आला
दोन वर्ग शिकला नसनं
पण मोठा माज आला ......
        पडुन होता पोयट्यासारखा
         घोंगवत होत्या माशा
          नवता कपडा आंगावर
           खराब होती दशा
आरक्षणच्या मात्यावर
खुप मोठा साहेब झाला
     अन् मी जयभिम घेताच
     तुले मोठा राग आला......
खुप होत्या पोथ्या
अन् खुप होते देव
दररोज वात लावुन
म्हणे मले सुखी ठेव
    पहील्या वर्गापासुन
     खुप सवलत घेत आला.....
अन् मी जयभिम घेताच
तुले मोठा राग आला........
     नवतं त्याच्या पिढीत
    कधी कुणी शिकल
    वावरात नारळ फोडुन
     कधी नाही पिकल
बांधावरच पाणी
दिमाखान घेत आला.....
      अन् मी जयभिम घेताच
      तुले मोठा राग आला.....
ज्यान केला राग त्याचा
त्याच्या माग धावला
त्याच्या सांगण्यावरुन
फोटो नाही लावला
           त्याच जड पारड
            तु हलक करत आला...
       अन् मी जयभिम घेताच
       तुले मोठा राग आला.....
तुले नवत माहीत
तु आहे कोण
कायदयाच्या नावान
करत हात दोन
        तु आता कायदा
        लोकाले सांगत आला......
अन् मी जयभिम घेताच
तुले मोठा राग आला .....
       नाही आपली अक्कल
       भिमावानी केली
       त्याच्या एवढ शिकाव
       हिम्मत नाही केली
दम नाही रक्तात
पण जातीभेद करत आला.....
           अन् मी जयभिम घेताच
           तुले मोठा राग आला......
आतातरी सुधर
सोड आता गर्व
धर्मग्रंथाच्या नावान
करुन दाखव सर्व
    माहीत असुन तुले
   मस्त नाटक करत आला ......
          अन् मी जयभिम घेताच
         तुले मोठा राग आला ......

................

       -महाकवी नामदेव ढसाळ

No comments:

Post a Comment