Thursday, 23 June 2016

एक कूठंतरी वाचलेली गोष्ट आठवली. अकबर बादशहाने बिरबलाला त्याच्या राज्यातील पाच अव्वल महामूर्ख शोधून आणण्याचे फर्मावले.

 एक कूठंतरी वाचलेली गोष्ट आठवली. अकबर बादशहाने बिरबलाला त्याच्या राज्यातील पाच अव्वल महामूर्ख शोधून आणण्याचे फर्मावले. बिरबलाने तीन चार महिने अखंड मेहनत घेऊन पाच महामूर्ख शोधल्याचा आणि उद्या त्याना दरबारात हजर करण्याचा निरोप बादशहाकडे पाठवला. इकडे जनतेची ते पाच महामूर्ख पहाण्याची उत्सुकता शीगेला पोहोचली होती. अखेर दुसरा दिवस उजाडला, ते पाच महामूर्ख पहाण्यासाठी जनता प्रचंड संख्येने दरबारासमोरील मैदानात हजर झाली. कांही वेळाने बिरबलाचे आगमन झाले, पण बिरबला सोबत फक्त दोनच माणसे होती हे पाहून अकबर म्हणाला, "बिरबल, तुला पाच महामूर्ख दाखवायचेत मग दोनच लोक कसे आणलेस?" बिरबल म्हणाला,"महाराज थोडा वेळ थांबा मी पाचही महामूर्ख आपणास दाखवतो" असे म्हणून बिरबलाने शेवटच्या क्रमाने एकेका महामूर्खाची ओळख करूनद्यायला सुरूवात केली. "महाराज हा महामूर्ख क्रमांक पाच! याचे नाव शेखचिल्ली हा ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता" हे ऐकून सारी जनता हसू लागली. नंतर बिरबलाने चौथ्या महामूर्खाची ओळख करूनदिली,"महाराज हा महामूर्ख क्रमांक चार! हा बैलांना ज्वारीच्या पोत्याचे ओझे होऊ नये म्हणून पोते आपल्या डोक्यावर घेऊन बैलगाडीत बसला होता" जनता पून्हा हसली. आता मात्र बादशहा अन जनतेची उत्सुकता वाढली बादशहा म्हणाला, बिरबल, बाकीचे तीन महामूर्ख कूठं आहेत?" बिरबल म्हणाला, "महाराज, तिसरा महामूर्ख मी स्वतः आहे". सारेजण स्तब्ध झाले. बिरबल पुढे म्हणाला," महाराज, राज्यात बेरोजगारी,महागाई, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अशा हजारो समस्या असताना मी असल्या (महामूर्ख शोधण्याच्या कामात) वेळ घालवला म्हणजे तिसरा महामूर्ख मी स्वतः आहे". बादशहा आणि जनता थोडीशी वरमली. पण उरलेलेले दोन महामूर्ख पहाण्याची उत्सुकताही वाढली. बादशहा म्हणाला, "बिरबल, दुसरा महामूर्ख कोण आहे?" बिरबल म्हणाला,"महाराज दुसरे महामूर्ख तूम्ही स्वतः आहात". आता मात्र बादशहाची सटकली, रागानेच बादशहाने विचारले," बिरबला, मी कसा रे मूर्ख? बिरबल म्हणाला,"महाराज, सेम आन्सर! राज्यात इतक्या समस्या असताना आपण असल्या फालतू कामात रस घेता म्हणून तूम्ही दुसर्या नंबरचे महामूर्ख!" संतापलेल्या बादशहाला पहिल्या नंबराचा महामूर्खही जाणून घ्यायची इच्छा होतीच! आपला राग कसाबसा आवरत बादशहाने पहिला महामूर्ख कोण अशी विचारणा केली. बिरबल म्हणाला, "महाराज याचेही उत्तर वरीलप्रमाणेच आहे, राज्यात एवढ्या समस्या असताना त्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येण्याऐवजी ही जनता या फालतू कार्यक्रमात एकत्र येऊन एन्जाँय करते आहे, म्हणून पहिल्या क्रमांकाची महामूर्ख जनता आहे". सुचना : (या गोष्टीचा संबंध योगादिन साजरा करण्याचा आदेश देणारे सरकार आणि ते एन्जाँय करणारी जनता यांचेशी जोडू नये).

No comments:

Post a Comment